Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गरिबांचा कळवळा असेल तर झोपडपट्टीत रहा
सकाळ वृत्तसेवा
Monday, October 11, 2010 AT 12:15 AM (IST)
सोलापूर - पुणे जिल्ह्यातील "लवासा' प्रकल्पात गरिबांच्या झोपड्या गेलेल्या नाहीत. त्याबाबत काहीच माहिती नसताना उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, त्यांना जर गरिबांबद्दल खराच कळवळा असेलतर त्यांनी "मातोश्री' सोडून झोपडपट्ट्यांमध्ये रहायला जावे, असा टोला महसूलमंत्री नारायण यांनी लगावला.

येथील रंगभवन सभागृहाच्या उद्‌घाटनानंतर पत्रकारांनी राणे यांना "लवासा' प्रकल्पाबाबत प्रश्‍न विचारले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरेंना या विषयात अज्ञान आहे. त्यांना कामाचा कोणता अनुभव नाही. लवासा एक प्रकल्प आहे. महाराष्ट्रात अनेक वेगवेगळे प्रकल्प येताहेत. "लवासा'मध्ये 46 हजार कोटी गुंतवणूक आहे. चुकीचे काही घडले नाही. काही सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. झोपड्या तोडलेल्या नाहीत आणि तोडणारही नाही. सरकार आजपर्यंत नेहमीच झोपडपट्ट्यांना संरक्षण देऊन त्या नियमित करीत आले आहे. या ठिकाणीही असे काही असेलतर ते केले जाईल. उद्धव ठाकरेंना यातील फरकच समजलेला नाही. "लवासा'ला परवानगी देताना चुका झाल्याबद्दलच्या आरोपावरून अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्‍न विचारला असता "आता काहीच नाही, करणार' असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले.
प्रतिक्रिया
On 13/10/2010 09:30 PM Gautam said:
१.ह्या प्रोजेक्ट चे काम हे सर्व नियम धाब्यावर बसवून बनवले आहेत २. ह्या प्रोजेक्टची महाराष्ट्राला आणि देशाला काय गरज आहे...३ राणे नि उद्धव ठाकरेंचा विरोधाला उत्तर द्याचा प्रयत्न केला नाही ४. प्रोजेक्टला ५० हजार कोटी खरच होणार आहेत = १/३ ऑफ defence budget ....खरच काय गरज आहे ह्या projectchi
On 11/10/2010 07:16 PM jeetendra said:
udhav thakre thanyachya zopadpatti baddal bolat hote . rane tumhi vishay badlun bolat ahat . pahil udhav thakrechya bolnyacha arth samjun ghya
On 11/10/2010 06:46 PM Satyaagrahi said:
झोपड्या उठवल्या गेल्या आणि आदिवासींच्या जमिनी बळकावल्या गेल्या हे ढळढळईत सत्य आहे.
On 11/10/2010 03:49 AM nitin said:
मते मागायला गरीबा पुढे येताना राणेला लाज नाहीका वाटत ?
On 11/10/2010 01:03 AM ashish said:
अगदी सडेतोड उत्तर दिलंय.. ज्यांना झोपडपट्टीत राहायचे नाही अशांनी चांगल्या राहणीमानासाठी देश सोडवा यापेक्षा अशी शहरे इथेच निर्माण करणे काय वाईट? उद्धव ठाकरे हे सांगतील का? मि. राणे, प्लिज असाच बाणा दिल्लीश्वरांना पण दाखवत जा..


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: