Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अंगारकीसाठी वीस लाख भाविक येणार
सकाळ वृत्तसेवा
Monday, October 25, 2010 AT 12:15 AM (IST)
मशीद बंदर - येत्या मंगळवारी 26 ऑक्‍टोबर रोजी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी वीस लाखाहून अधिक भाविक येणार असल्याने चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाविकांसाठी इतर सोई-सुविधांबरोबरच हृदयविकारासारख्या रोगावर तातडीने उपचार करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, यंदा व्हीआयपी पास देण्यात येणार नसल्याचे मंदिराच्या विश्‍वस्तांनी स्पष्ट केले आहे.

मंदिरातर्फे सोमवारच्या मध्यरात्रीपासून (12 वाजल्यापासून) मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत; तसेच मंगळवारी रात्री 8 ते बुधवारी पहाटे 2 वाजेपर्यंत दादर रेल्वेस्थानक ते सिद्धिविनायक मंदिर - दादर अशी विनामूल्य बस सेवा ठेवण्यात आली आहे. तसेच गणेशभक्त अनिल चुगानी यांनी सव्वा लाख रुपये किमतीचे ए.ई.डी. (क्रिटीकॅम मेडिकल सिस्टिम) उपकरण श्री सिद्धिविनायकचरणी अर्पण केले आहे. हृदयविकार असलेल्या वा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता असलेल्या रुग्णांसाठी प्रथमोपचार म्हणून हे वैद्यकीय उपकरण काम करते. त्याचबरोबर दोन रुग्णवाहिकांसह सुमारे 25 डॉक्‍टरांचे पथकही आपत्कालीन स्थितीत भाविकांवर उपचार करण्यासाठी सिद्ध असणार आहे. अग्निशमन दलाचेदोन बंबही सज्ज आहेत, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे व्यवस्थापक नरेंद्र कोरे यांनी दिली.

भाविकांसाठी शुद्ध केलेले दहा टॅंकर पाणी पिण्यासाठी उपलब्ध असणार आहे. शिवाय एका भक्ताने दोन लाख मिनरल वॉटरचे ग्लास; तसेच सीताराम अग्रवाल या भक्ताने अडीच लाख लाडू प्रसादासाठी अर्पण केले आहेत. गिरनार आणि हसमुख राय या कंपन्यांमार्फत मोफत चहा-कॉफीची सोय भक्तांसाठी असणार आहे. दर्शन मंडपात मोठ्या स्क्रीनवर भक्तांना सिद्धिविनायकाचे दर्शन होणार आहे.

महापालिकेतर्फे फिरत्या स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. हॅथ वे केबल, इंडसईंड मीडिया, वायरलेस इंडिया नेटवर्कच्या सौजन्याने मुंबईत केबल चॅनेलद्वारे सिद्धिविनायकाचे लाईव्ह दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा व्ही.आय.पी. पास कुणालाही देण्यात येणार नसल्याचे श्री सिद्धिविनाक मंदिराचे विश्‍वस्त नितीन विष्णू कदम यांनी सांगितले.

अंगारकीसाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार असून भाविकांनी मौल्यवान वस्तू, मोठ-मोठ्या बॅगा शक्‍यतो आणू नयेत, अशी विनंती परिमंडळ-5च्या पोलिस उपायुक्त अश्‍विनी दोरजे यांनी केली आहे. तसेच भाविकांनी प्रसादासाठी धातूचा डबा आणू नये आणि महागडे मोबाईल घेऊन येऊ नयेत, असे आवाहन विश्‍वस्त नितीन विष्णू कदम यांनी केले आहे.

सुरक्षा व्यवस्था
- न्यासातर्फे 74 सुरक्षा रक्षक,
- दोन चेक पोस्टवर लगेज स्कॅनर,
- इक्‍स्पोजिव्ह डिटेक्‍टर, 17 मेटल डिटेक्‍टर
- तातडीच्या संपर्कासाठी 61 वॉकीटॉकी
- न्यासातर्फे 500; तर अनिरुद्ध बापू अकॅडमीचे 450 स्वयंसेवक
- मंदिरात 32; तर मंदिर आवारात 34 सीसीटीव्ही कॅमेरे 
प्रतिक्रिया
On 25/10/2010 01:16 AM rajan bhambure said:
सर्व विश्व्स्ताचे अभिनंदन.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: