Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कॉलेजमधलं प्रेमप्रकरण (तो आणि ती)
विजय लाड (vijay.lad@esakal.com)
Tuesday, November 02, 2010 AT 03:01 PM (IST)

कॉलेज कॅम्पसमध्ये घसघशीत पगाराची नोकरी लागली. कंपनीचं प्रशिक्षण सुरू झालं. प्रशिक्षण कितीही कंटाळवाणं असलं, तरी त्याकडे तितकंच लक्ष देणं गरजेचं होतं. कारण त्यात नोकरी गमावण्याची जोखीम होतीच. पण तरीही नचिकेत-मिथिला आणि आशय-ऋतुजा यांचं फोनवर बोलणं काही कमी झालं नव्हतं. दररोज रात्री ठरावीक वेळी ते फोनवर येत असत. कॉलेजमध्ये प्रेमात पडल्यावर नचिकेतमधला कवी कधीच जागा झाला होता. कुशाग्र प्रतिभेवर हळव्या प्रेमाची फुंकर पडल्यावर शब्दरूपी भावना आपोआप साकारायला लागल्या. त्यानं अशीच एक कविता मिथिलाला ऐकविली. ती तुमच्यासाठी....

कॉलेजच्या पहिल्या दिवशी
तो गप्पा छाटत बसला होता
येत्या-जात्या मुलींना निरखत
मित्रांऐवढाच खोडकर होता

एवढ्यात त्याची शोधक नजर
पार्किंगच्या गेटवर स्थिरावली
मधाळ, मोहक स्मितहास्यात,
भीरभीरत्या डोळ्यांत हरवली.

"लव्ह ऍट फस्ट साइट'
असाच काहीसा तो भास होता
त्याचा तो राहिला नाही
मनासह उंच उंच उडत गेला

ओळख करून घेण्यासाठी
त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली
तिच्या मैत्रिणींशी हाय-बाय करीत
तोकड्या ग्रुपमध्ये जागा मिळवली

पुस्तकांची देवाण-घेवाण आणि
कॅन्टीन वाऱ्या झाल्या सुरू
तिला बघण्यातच दिवस जाई
वर्गातही साक्षात्कार झाले सुरू

एक दिवस त्याने गुलाब आणला
ठेवला तिच्या नाजूक तळहातावर
"आय लव्ह यू लॉट' म्हणत
नजर ठेवली थरथरत्या ओठांवर

तोंडातून अवाक्षरही न काढता
ती रुमालाशी चाळा करीत राहिली
विचार करून सांगते, म्हणत
गोड गोड रहस्यमय हसत राहिली

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच
दोघे भेटले पुन्हा कॅन्टीनमध्ये
धडधडत्या अंतःकरणाने
मन मोकळे केले डोळ्यांमध्ये

तिने आयुष्यभराची साथ मागितली
हातात नाजूक, गार हात देऊन
त्यानेही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या
समर्पणाला विश्‍वासाचे बळ रेलून

चार दिवसात खडकवासला, पानशेत
आणि सहाव्या दिवशी मल्टिप्लेक्‍स
महिन्याभरात अवाढव्य पुण्याचे
सगळे कोपरे अपरिचीतपणे दुमडले

प्रेमाच्या सुखद सोनेरी वाटचालीत
त्यांच्या ग्रुपमध्ये आली एक प्रिंसेस
सौंदर्य आणि पैशांच्या बळावर
उच्छाद मांडला पुरता नॉन्सेन्स

दोघांची निष्पाप, निर्मळ मनं
काही क्षणांसाठी झाली दूषित
शब्दाने शब्द वाढवला गेला
नात्यातली दरी वाढली डोळे पुशीत

शेवटी दोघांनाही पुन्हा आली
कॅन्टीनची कडकडून आठवण
वन-बाय टू वाफाळत्या कॉफीवर
उलगडली मनातली कडवट साठवण

त्याने तिला लगेच "आय एम सॉरी' म्हटले
"इट्‌स ओके', तिची रुसलेली कळी खुलली
तिचा हात हातात घेऊन त्याने हळूच दाबला
असं कधीच होणार नाही, वचनातून वदला
.

--------
भाग नऊ - कार्पोरेट जगात प्रवेश (तो आणि ती)
भाग आठ - 'कॉलेज डेज'ला निरोप (तो आणि ती)
भाग सात - फेअरवेलचे फेअर अफेअर! (तो आणि ती)
भाग सहा - प्रेम रंगात रंगूनी... (तो आणि ती)
भाग पाच - प्रेम हे प्रेम असतं... (तो आणि ती)
भाग चार - नचिकेतचे प्रपोजचे धाडस (तो आणि ती)
भाग तीन - प्रपोजला उत्तर प्रपोजने (तो आणि ती)
भाग दोन - पहिला प्रपोज मिथिलाचा (तो आणि ती)
भाग एक - 'कॅम्पस इंटरव्हू'चा धडाका (तो आणि ती) 
----------
(या लेखाच्या लेखकाशी तुम्हाला संवाद साधायचा असेल किंवा आपल्या समस्या मांडायच्या असतील, तर तुम्ही  vijay.lad@esakal.com या इ-मेल आयडीवर इ-मेल पाठवू शकता. तुमच्या मतावर योग्य ती प्रतिक्रिया पाठविली जाईल. धन्यवाद.) 
---------
प्रतिक्रिया
On 18/02/2011 11:25 AM Pranit Goante said:
खूप छान कविता आहे. खरच दोघांच प्रेम होत म्हणून ते पुन्हा भेटले .जर फक्त मजा मारण्यासाठी प्रेम केल असत तर दोघ एकत्र नक्कीच आले नसते. आणि दोघांपैकी एकच जण प्रेम करत असता ,तर ते भावनांशी खेळण्यासारख झाल असत. आणि मला वाटत स्वताच्या स्वार्थासाठी दुसर्याचा भावनांशी कधी खेळू नये.कारण आपल्याला त्या गोष्टीचा आयुष्यात कधी ना कधी नक्कीच पस्तावा होता.माफी मागावीशी वाटते पण वेळ निघून गेलेली असते. Pranit Gonate Pune Maharashtra **************************
On 16/02/2011 09:19 AM pavan said:
Boring Love Story.
On 08/01/2011 03:57 PM Mahesh Lingayat said:
This is very very good love story,
On 02/01/2011 03:50 PM ashu... said:
मस्त आहे... खरच खूपच छान.....
On 01/01/2011 02:41 PM satish said:
lagech kas tine sorry mhantale......................very nice
On 19/12/2010 02:52 PM vachak said:
वा फारच सुंदर ...........
On 15/12/2010 03:38 PM Abhijit said:
वेरी वेरी गुड
On 13/12/2010 01:06 PM rohan alhat said:
सगळा येड्याचा बाजार आहे . पाहिली ना तरा ?
On 10/12/2010 01:37 PM prasad bhoir said:
कॉलेजच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद .गेले ते दिवस . जवळ राहिल्या त्या फक्त आठवणी .
On 03/12/2010 03:19 PM komal said:
खूप छान कविता आहे. खरच दोघांच प्रेम होत म्हणून ते पुन्हा भेटले .जर फक्त मजा मारण्यासाठी प्रेम केल असत तर दोघ एकत्र नक्कीच आले नसते. आणि दोघांपैकी एकच जण प्रेम करत असता ,तर ते भावनांशी खेळण्यासारख झाल असत. आणि मला वाटत स्वताच्या स्वार्थासाठी दुसर्याचा भावनांशी कधी खेळू नये.कारण आपल्याला त्या गोष्टीचा आयुष्यात कधी ना कधी नक्कीच पस्तावा होता.माफी मागावीशी वाटते पण वेळ निघून गेलेली असते.
On 03/12/2010 07:39 AM ashish said:
लय bhari!!!!!!!!
On 26/11/2010 09:45 PM Omkar deorukhkar said:
वर्गातले साक्षात्कार चागलेच असणार राव
On 18/11/2010 12:25 AM kiran said:
छान होती कविता
On 16/11/2010 04:36 PM Prasad Kulkarni said:
मस्त आहे कथा. पुढचा लेख कधी येणार???
On 15/11/2010 12:30 PM pravin said:
nice
On 14/11/2010 08:14 PM Nagesh tanpure said:
छान!!!
On 14/11/2010 10:04 AM Pratik mali said:
सुंदर आवङली story.
On 14/11/2010 10:03 AM Pratik mali said:
सुंदर आवङली story.
On 13/11/2010 08:27 PM santosh patil said:
very fine.
On 13/11/2010 08:25 PM atul m said:
फारच छान आहे. पण मला असे वाटते कि आता जी सध्याची परिस्थिती आहे त्या बद्दल सर्वांनी गांभीर्य घ्यायला हव.
On 13/11/2010 02:25 PM santosh hol said:
वेरी गुड वेरी Nice इ अं हैप्पी गुड गुड गुड
On 13/11/2010 12:57 PM pravin dashrath shinde said:
खूपच छान कविता आहे आणि गोष्ट हि. बर आता कधी संपवणार का या गोष्टी वर मालिका काढणार आहे काय?
On 12/11/2010 11:39 AM Shubhangi Deokate said:
खूपच छान ......... कविता खूप छान आहे……
On 12/11/2010 11:13 AM rahul a said:
लाड काका गोष्ट संपली का हो???
On 12/11/2010 10:17 AM punam said:
खूप चं छान
On 12/11/2010 10:17 AM punam said:
खूप चं छान
On 11/11/2010 10:47 PM MAYUR DESHMUKH said:
kharach khup chhan.....
On 11/11/2010 03:51 PM meena satkar said:
खूप सुंदर लिहिलं आहे कॉलेजची love स्टोरी
On 11/11/2010 03:46 PM meena satkar said:
खूप छान आहे
On 11/11/2010 01:56 PM rashmi said:
पुढचा भाग का नाही आला? आम्ही वाट बघत आहोत .............
On 11/11/2010 01:25 PM GAYATRI said:
कवितेल्या भावना खूप छान आहेत .
On 11/11/2010 12:00 PM anky said:
तुम्ही खूप नाराज केलात आम्हाला कंटाळा आला आता कविता छान आहे !!!
On 11/11/2010 10:54 AM Priya said:
kavita chan aahe.premachi upeksha karu naye.jyana bore zale tyani vachu naye. If someone isn't what others want them to be, the others become angry. Everyone seems to have a clear idea of how other people should lead their lives, but none about his or her own.
On 10/11/2010 07:20 PM sidharam said:
फार सुंदर आहे .
On 10/11/2010 06:47 PM aditya ud said:
बापरे!संपली एकदाची .............कॉलेजमध्ये जर हेच करायला गेलो तर एक दिवस आत्महत्या करायची वेळ यईल....पण तरीही सुंदर कविता आहे.
On 10/11/2010 05:48 PM Rucha said:
बर झालं संपली एकदाची गोष्ट..बोर झाली होती फार...
On 10/11/2010 05:45 PM Anuja said:
Sampali story????????............Hush!!!!!!!!!!!!
On 10/11/2010 12:32 PM vikas said:
खूप छान कविता आहे. खरच दोघांच प्रेम होत म्हणून ते पुन्हा भेटले .जर फक्त मजा मारण्यासाठी प्रेम केल असत तर दोघ एकत्र नक्कीच आले नसते. आणि दोघांपैकी एकच जण प्रेम करत असता ,तर ते भावनांशी खेळण्यासारख झाल असत. आणि मला वाटत स्वताच्या स्वार्थासाठी दुसर्याचा भावनांशी कधी खेळू नये.कारण आपल्याला त्या गोष्टीचा आयुष्यात कधी ना कधी नक्कीच पस्तावा होता.माफी मागावीशी वाटते पण वेळ निघून गेलेली असते
On 10/11/2010 12:27 PM Yogesh said:
संपली वाटते स्टोरी फार बकवास वाटली
On 10-11-2010 11:20 ?.??. deepak said:
दोघही बावळट
On 09/11/2010 11:05 PM jakir said:
dusare kahi kam nahi ka..................?
On 09/11/2010 05:10 PM vaibhav said:
ओ साहेब बंध करा आता..कॉल्लेगे मधेय प्रेम होत नसते ती फक्त वासना असते...
On 09/11/2010 04:14 PM vivek said:
एखादा आत्महत्या करेल रे बाबा जीव घेतला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 09/11/2010 04:10 PM deepak parab said:
पुढाचा भाग कधी ????????? वाट पाहतोय लवकर लिहा ..........
On 09/11/2010 02:59 PM rahul a said:
आहो लाड साहेब आता बस करा कि राव. आणि हो जर आता पुढे काय लिहायचे असा प्रश्न पडला असेल तर मग द्या सरळ सोडून, पण लोकांना असे बोर नका करू.
On 09/11/2010 02:01 PM sanglikar vachak said:
कथा संपली म्हणायची कि कस?
On 09/11/2010 12:37 PM Suraj said:
खेळ मांडला !!!
On 09/11/2010 11:41 AM keshwar sanjay said:
मी कधी प्रेंम केल नाही ? पण कविता वाचल्यास मला काही तरी feel वाटतय : कविता खूपच छान!
On 08/11/2010 03:13 PM Prachi said:
खूप चं सुंदर आहे कविता. अश्याच छान कविता लिहीत राहा. Belated HAPPY DIWALI FROM PRACHI
On 06/11/2010 07:39 PM Snehal said:
Mala khup bor vatali.
On 06/11/2010 05:29 PM Kunal said:
संपली एकदाची स्टोरी ............. धन्यवाद
On 05/11/2010 12:00 PM praful bhujade said:
छान आहे
On 05-11-2010 06:07 AM asha said:
स्टोरी संपली वाटतं....कारण खाली क्रमशः असं लिहिला नाहीये.... सुरवातीला स्टोरी चांगली वाटली पण नंतर bore झालं... कविता is not bad .....!!!!!
On 04/11/2010 08:24 AM shraddha said:
खूप छान कविता आहे. खरच दोघांच प्रेम होत म्हणून ते पुन्हा भेटले .जर फक्त मजा मारण्यासाठी प्रेम केल असत तर दोघ एकत्र नक्कीच आले नसते. आणि दोघांपैकी एकच जण प्रेम करत असता ,तर ते भावनांशी खेळण्यासारख झाल असत. आणि मला वाटत स्वताच्या स्वार्थासाठी दुसर्याचा भावनांशी कधी खेळू नये.कारण आपल्याला त्या गोष्टीचा आयुष्यात कधी ना कधी नक्कीच पस्तावा होता.माफी मागावीशी वाटते पण वेळ निघून गेलेली असते.
On 03/11/2010 02:14 PM aniket said:
कविता खरच खूप छान आहे
On 03/11/2010 01:50 PM Paresh said:
भन्नाट एकदमच भन्नाट... या गोष्टीचे पुस्तक करून छापले तर बरे होईल.
On 03/11/2010 01:44 PM Mulgi said:
विजयराव,आत्ता जरा जास्तच होतंय.किती दिवस असाच सुरु राहणार आहे हे? खूपच boar होतंय आता.लिखाण थांबवा.उपकार होतील वाचकांवर.thanks in advance .
On 03/11/2010 12:50 PM sagar said:
आता खूप लाड झाले बरं...!!! चांगल चांगल म्हंटल तर लाड साहेब लाडात येवून कविता करत सुटलेत की!!!! बास करा म्हणा आता !!!
On 03/11/2010 12:19 PM Pankaj said:
@ शंतनू खूपच छान कविता केली आहेस..... पंकज...
On 03/11/2010 12:14 PM Samriddhi said:
Please stop this nonsense...!!!
On 03/11/2010 12:08 PM Tee ani Tee... :-P said:
काय बोर करतायेत राव.... यांना आवरा... एकतर फार गुडी गुडी लावलाय जे वास्तवात नसता कधी आणि आता तर ते एकता कपूर ला पण लाजवेल या style ने चाललाय...
On 03/11/2010 11:42 AM ईश्वर आगम said:
कविता छान आहे, पण आत बास करा लय झाल. एखाद्या कादंबरीला सुद्धा शेवट असतो. इथे आपण कादंबरी नाही लिहित आहोत , विजय लाड ! सगळे दमलेत आता तुम्हाला.
On 03/11/2010 09:48 AM pravin said:
ये बस झालाकीर बाबा पुढ आहेकी नाही नाहीतर बंद कर
On 03/11/2010 07:49 AM ishaan said:
बस करा आवारा नाहीतर करण जोहर बोलवायला yeil
On 03/11/2010 07:45 AM MANGESH said:
माझ प्रेम हे असच झाल फक्त जुळवुन घेणारा मी होतो.
On 03/11/2010 02:00 AM a said:
मधेच कविता काय ? स्टोरी कंप्लेईट करा लवकर.
On 03/11/2010 01:26 AM Sunil Nale said:
very nice
On 02/11/2010 11:33 PM Ganesh said:
@ शंतनू nice poem than vijay lad , keep it up
On 02/11/2010 09:01 PM shantanu puranik said:
तुला आठवून हरवते मन असे की तुला सांगू शकत नाही तुला बघून बदलते अवघे जग तुला दाखवू शकत नाही माझ्या डोळ्यांनी एकदा तू तुला बघ आणि मग तुलाही झोप लागणार नाही मला माहित आहे तू ही माझ्यावर प्रेम करतेस पण कधी सांगणार नाही...
On 02/11/2010 08:56 PM nilesh shinde said:
खूपच छान ......... मस्त आहे कविता ........
On 02/11/2010 07:49 PM prakash m shinde said:
मस्त आस वाटतंय कि जुने दिवस आठवले....................@पका@
On 02/11/2010 07:13 PM kl said:
climax point varun storycha graph dhaskan khali padlay...ani aata vatat nahi kahi interesting hoil....
On 02/11/2010 07:12 PM dushyant said:
बास करा आता
On 02/11/2010 06:33 PM Sameer Mulani said:
Ekdum Zakaasss...........
On 02/11/2010 06:22 PM Sudhir Ghevade said:
खूप बोरिंग आहे स्टोरी.
On 02/11/2010 06:19 PM Anti-lad said:
Baass zaal re! band kar aata. kay te palhaal laawal aahe nusat. Band kar.
On 02/11/2010 06:13 PM Ashwini said:
ya kavitetun "Kahani ab tak" cha Episode dakhvilya sarkhe Vatate..............
On 02/11/2010 06:08 PM sc said:
काय उगीच timepass लावला आहे.. स्टोरी काहीच पुढे नाही गेली आज पण..बोर झाला हा लेख आता.. स्टोरी पुढे न्या नाहीतर बंद करा हि गोष्ट !!!!!!!!!!
On 02/11/2010 05:49 PM Suraj said:
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्या !!! .. पण लाड काका हे काय चालवलं आहे आपण ??? की Time Pass करता आहात आपण ?? पुढचं सुचत नसाल तर.. सरळ सांगा न... पुढे सुचत नी म्हणून... वाचक इतके हुशार आहेत कि.. १०० गोष्टी तयार होतील... पण Please असा छळ करू नका हो वाचकांचा .... काय म्हणताय मित्रांनो ???
On 02/11/2010 05:46 PM sanglikar vachak said:
kavita chan ahe
On 02/11/2010 05:21 PM sneha walke said:
khup chan mla avdl
On 02/11/2010 05:20 PM sharad said:
ओ लाडभावू जरा प्रेमातून बाहेर या आणि थोड्या वेगळ्या विषयावर लिहा. नाहीतर तुमचा पण ना सी फडके होएइल हो.
On 02/11/2010 05:16 PM Avadhut said:
अरे बाबा बंद कर आता--आधीचा भाग (भाग ९ ) बारा होता म्हण्याची वेळ आली--याला आवरा रे कोणीतरी! उगाच कविता लिहितो आहे --गद्य जमेना कि पद्य असा खेळ चालविला आहे --आवरा रे लवकर ! सहन नाही होत!------ @सचिन शी मी सहमत आहे!
On 02/11/2010 04:58 PM Arvind said:
अरे पुरे करा, गोष्ट पुढे सरकत नाहीये, एखाद्या एकता कपूर च्या सिरीयल सारखी, दर वेळी वाचा, काही तरी मसाला भरलेला , गोष्ट जीथेच्या तिथेच. टाइम पास पुरे झाला ,, वाचक काम होत आहेत,, गोष्ट पुढे सरकवा
On 02/11/2010 04:46 PM Ranjit Salunkhe said:
नक्की म्हणाना काय हाय तुमचा .. जे आधी लिहिले आहे आणि कविता सगळे वेगळे वेगळे हाय... आता बस करा कि जास्त टाइ म पास नका करू.... उगाच लिहायचे म्हणून काही पण लिहित नका बसू....
On 02/11/2010 04:44 PM Bhushan T said:
Arey kaay hey.....eka avthadyat phakht ek poem or kavita.......LAAD saheb...HAPPY DIWALI...thoda rang aana ki aata .....kissa pudhey sarkudya ki...
On 02/11/2010 04:43 PM Nandini said:
मस्त आहे .............पण आता जरा जास्त ताणू नका .....
On 02/11/2010 04:26 PM vikas said:
अरे हा माणूस फारच बोर करायला लागला आहे..आवरा याला कुणी तरी..
On 02/11/2010 04:25 PM Akash Kharat said:
जुन्या आठवणी ना उजाळा आणलात आपण .धन्यवाद . आजून कविता ची वाट पाहत आहे .
On 02/11/2010 04:24 PM sandy said:
प्रेमाने काही पोट नाही भरत....हे फक्त ऐकण्यासाठी चांगले वाटते....
On 02/11/2010 04:18 PM Sachin J said:
मस्त आहे...............................
On 02/11/2010 03:33 PM Poonam said:
एक नंबर ...........! मस्त आहे . Keep writing..Happy Diwali.
On 02/11/2010 03:32 PM Paresh said:
बहोत खूब... सुंदर .
On 02/11/2010 03:17 PM sujit jadhav said:
देवा वाचव रे
On 02/11/2010 03:11 PM Dr. sachin, japan said:
लाड साहेब आता बस करा नाहीतर लोकांचा मार खाणार तुम्ही............................


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: