Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

लिटील चॅम्प्स'च्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 07, 2010 AT 12:00 AM (IST)
चेहेडी - पहाटेच्या बोचऱ्या थंडीत "लिटील चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे यांनी सादर केलेल्या गाण्यांनी रसिकांना आज मंत्रमुग्ध केले. निमित्त होते, नाशिक रोड-देवळाली व्यापारी बॅंकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या दीपमहोत्सव कार्यक्रमांतर्गत "दिवाळी पाडवा पहाट साद स्वरांची' कार्यक्रमाचे. 
 
नाशिक रोड येथील शाळा क्रमांक 125 च्या मैदानावर (कै.) बाबूराव बागूल नगरीत झालेल्या या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नाशिक रोडवासीयांना मिळाली. पहाटेच्या बोचऱ्या थंडीत "जयोस्तुते श्री महन्मंगले' या गाण्याने सुरवात झाली. मुग्धा वैशंपायन हिने "अमृताहुनी गोड नाम तुझे देवा', "चाफा बोलेना', "अक तळ्यात होती', "जंतर मंतर', "छडी लागे छमछम', "पदावरती जरतारीचा मोर नाचरा हवा', "डार्लिंग डार्लिंग काय म्हणतो' ही गीते सादर केली. प्रथमेश लघाटे याने "अबीर गुलाल उधळीत', "रम्य ही स्वर्गाहून लंका', "बगळ्याची माळ फुले', "गालावर खली डोळ्यात धुंदी', "दत्त दर्शनाला जायच', "मल्हार वारी', "उदे ग अंबे उदे' ही गीते सादर केली. शमिका भिडे हिने "इवलेसे रोप', "रामा रघुनंदना', "मी राधिका मी प्रेमिका' आदी गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. अमोल पाळेकर, अभिजित शर्मा, संजय देसाई, अनिल देसाई, नीलेश सोनवणे, रागेश्री देसाई यांनी साथसंगत केली. श्‍याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड. उपाध्यक्षा छाया भट्टड, रामदास सदाफुले, सुधाकर जाधव, सुनील महाले, वामनराव हगवणे, भाऊसाहेब पाळदे, रंजना बोराडे, नगरसेवक रमेश धोंगडे, संजय भालेराव, प्रकाश बोराडे, मनोहर कोरडे, अविनाश अरिंगळे, बाळासाहेब गाडगीळ, प्रशांत कापसे आदी उपस्थित होते. आनंद क्षेमकल्याणी व मनीषा क्षेमकल्याणी यांनी आभार मानले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: