Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

दाखले मिळणार "ऑनलाइन'
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 24, 2011 AT 12:39 AM (IST)
पुणे - जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणाऱ्या विविध दाखल्यांसाठी आता ऑनलाइन पद्धतीचा वापर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचे हेलपाटे कमी व्हावेत, या उद्देशाने हा प्रस्ताव करण्यात आला असून, आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांकडे तो सादर होणार आहे. त्यासाठी दोन आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या ग्राहक सुविधा केंद्रात विविध दाखल्यांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात आल्याने ग्राहकांना फायदा झाला आहे. मात्र, अर्ज सादर केल्यानंतर पुढील काळात त्याची नेमकी स्थिती कळत नाही. दिवसभरात किती अर्ज आले, किती अर्जांवर निर्णय झाला, याचा कोणताही खुलासा होत नाही. दाखला कधी मिळणार हेसुद्धा सांगता येत नाही. ही संपूर्ण व्यवस्था ऑनलाइन झाल्यास अर्ज केल्यानंतर ग्राहकास देण्यात येणाऱ्या कोडनुसार कोणत्या अधिकाऱ्याकडे ते प्रकरण आहे, याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे अर्जावर निर्णय लवकर घेता येईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांना त्याचा उपयोग होणार आहे. अर्जदाराची सर्व माहिती ऑनलाइन असल्याने पुढील अर्जांसाठीही त्याचा फायदा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्राहक सुविधा केंद्र एका खासगी संस्थेस चालविण्यास देण्यात आले आहे. त्याची मुदत मार्च महिन्यात संपते. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाचा विचार करून संपूर्ण व्यवस्था ऑनलाइन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नवीन व्यवस्थेत खासगी संस्था अग्रस्थानी काम करतील, तर अर्जासंबंधी निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी घेतील, अशी माहिती हवेलीच्या प्रांताधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दाखल्यांसाठी गर्दी कमी झाली असून, ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिकांना होणारे हेलपाटे कमी होऊन वेळेची बचत होणार आहे, असे कटारे म्हणाल्या. यंदा शाळांमधून 25 हजार दाखले वितरित करण्यात आले, तर मे महिन्यात क्रिमीलेअर दाखल्यांसाठी विशेष मोहीम राबविण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 28/12/2011 08:12 PM pooja said:
आता तरी देवा माझी नाव किनार्यावर येऊ दे...................
On 20/12/2011 11:39 AM mangesh.shinde said:
आरे वा किती छान होईल
On 20/12/2011 06:29 AM sunil malgunde said:
very good idea. thanks.
On 14/12/2011 05:00 PM sbb said:
very good
On 30/11/2011 08:41 AM Avinash kalekar said:
वेरी गुड
On 23/11/2011 04:41 PM vinayak kadam said:
आरे वा किती छान होईल
On 21/11/2011 11:39 AM sarika said:
सुंदर
On 21/11/2011 09:07 AM Anil said:
आभारी आहे .............................
On 31/10/2011 05:37 PM sucheta gokhale said:
उत्तम काम केले. ह्या मुले रांगेत उभे राहणे , मध्यस्तीएन्चे लुडबुड टाळणे, हे सगळे जमेल आणि काम वेळेवर आणि क्लेशाविराहीत होईएल. धन्यवाद.
On 26/10/2011 09:46 PM SACHIN GAIKWAD said:
Khup Changle kaam kele.....online aslyamule vel vachel...Sarkari Karbhar khup badlto aahe
On 07/10/2011 06:49 PM kiran yadav said:
good
On 03-10-2011 12:14 PM Girme said:
´Very Nice. Ration Card, Validity Certificate, Aadhar Card, New Gas connection this facilities should be available online.
On 03/10/2011 09:02 AM Pradeep Tayde said:
थान्क्स, खूप छान प्रक्रिया आहे परंतु हे आमलात लवकर आणा म्हणजे जालं,
On 08/09/2011 08:45 AM prabhakar pagar said:
असा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्याँना वेळेवर दाखले मिळतिल.
On 23/08/2011 01:40 PM MANISHA said:
विध्यार्थी आणि वेळ या दोघांच्या दृष्टीने हा निर्णय लाख मोलाचा आहे .असेच महत्वाचे निर्णय घेणे गरजेचे छान !!!!
On 30/07/2011 04:29 PM ashad shaikh said:
त्रास व हेलपाटे पासून मुक्ती व वेळेची बचत =============आभारी आहोत . थान्क्स
On 28/07/2011 08:12 AM Navanath Jagannath shinde said:
खरे तर हि सारी ई-सुविधा केंद्र एजे ट झाले आहेत... एक नॉन- क्रीमिलायेर दाखलायासाठी २५० रु. खर्च कसा येतो ? आणि काही एजेंट तर ३००-४०० रु घेतात... हे कोन थांबवणार ?
On 30/06/2011 10:27 AM vijay kumbhar said:
छान !!!!
On 30/06/2011 09:24 AM akshay said:
nice project of government
On 25/06/2011 05:11 PM Manoj said:
VERY NICE DECISION
On 17/06/2011 03:42 AM j m vibhandik said:
खरे तर जन्माच्या दाखल्यावरच मुलाचे नाव, वडिलांची जात,पोट जात, नोंद करून मिळावी व तीच नोंद सगळीकडे ग्राह्य मानवी.त्यामुळे पुढची सगळी धावपळ थांबेल. तसेच आत्ता आधार कार्डसाठी जी धावपळ सुरु आहे तो आधार नंबर सुद्धा त्या बाळाला जन्माच्या वेळेसच मिळावा.आणि तोच नंबर सगळीकडे वापरावा.मात्र मुलाचे नाव आधी ठरवावे लागेल.
On 16/06/2011 04:16 PM KAPIL GORE said:
YOU ARE GREAT
On 25/05/2011 03:40 PM sunil sasane said:
निर्णय लाख मोलाचा आहे लवकर अमलlत अlणlवल
On 25/05/2011 03:40 PM sunil sasane said:
निर्णय लाख मोलाचा आहे लवकर अमलlत अlणlवल
On 29/04/2011 08:22 AM AMOL PATIL AKOLA said:
विध्यार्थी आणि वेळ या दोघांच्या दृष्टीने हा निर्णय लाख मोलाचा आहे .असेच महत्वाचे निर्णय घेणे गरजेचे आहेत .
On 13/04/2011 05:56 PM sonawane Prakash said:
चांगली सोय होणार आहे, आभारी आहे
On 19/03/2011 05:31 PM Omkar Jagtap said:
It is good, dakhle online miltil pan, privatisation karu naye karan yacha fayda private companyana honar aahe. tya aaivaji jar governmentnich jar computer kshetratlya garju ani hushar tarunana sandhi dilya tar te nakkich sandhicha sona kartil ani private company la dile janarya paishanchi sudha bachat hoil........
On 24/02/2011 07:58 AM BLM said:
खरोखर ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिकांना व कर्मचारी यांना होणारा त्रास व हेलपाटे कमी होऊन वेळेची बचत होणार आहे, इतर कार्यालयात ग्रामपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषदा इ. ठिकाणी सुध्दा ऑनलाईन सुविधा चालू करावी.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: