Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

निर्माण : एक शोध
दीपा देशमुख uth@esakal.com
Monday, April 11, 2011 AT 01:05 PM (IST)
Tags: uth tube
आजच्या भेडसावणाऱ्या समस्यांना समजून घेत, त्या कशा सोडवता येतील, यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले अनेक युवा "निर्माण' या उपक्रमातून प्रयत्नशील आहेत. त्यांच्या अर्थपूर्ण जीवनाच्या दिशेने सुरू असलेल्या शोधाचे आपणही साक्षीदार होऊयात...

चला गावाकडे...
मन्याळी हे उमरखेड तालुक्‍यातलं सातशे ते आठशे लोकसंख्या असलेलं चिमुकलं गाव. मन्याळीतला गुरं हाकणारा संतोष गवळे हा मन्याळी ते पुणे असा शिक्षणाचा प्रवास करून शहरात स्थायिक न होता मन्याळीत परततो, त्याची ही विलक्षण कथा.

पुण्यात मिळाली दिशा
बी.ए. झाल्यावर एका अवस्थेतून संतोष पुण्यात आला. पुणे विद्यापीठात पत्रकारितेची मास्टर डिग्री "कमवा आणि शिका' योजनेंतर्गत त्याने पूर्ण केली. याच दरम्यान संतोषने निर्माण उपक्रमाचं कुतुहल वाटल्याने "निर्माण'चा अर्ज भरला. निर्माणद्वारा संतोषला एक नवीन जगच सापडलं. यामध्ये असणाऱ्या मुला-मुलींचं अफाट वाचन, चर्चा आणि डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंगसहित अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन.. यांमुळे संतोषच्या जाणिवा विकसित होऊ लागल्या. घट्ट चिकटलेल्या पारंपरिक कल्पना गळून पडल्या. स्त्री-पुरुष समानतेपासून अनेक गोष्टींचं भान त्याला येत गेलं. स्वप्नंही खरी होऊ शकतात, हा विश्‍वास "निर्माण'ने संतोषला दिला.

गावच्या अनेक समस्या
"निर्माण'च्या तीन वर्षांच्या वाटचालीत संतोषने महाराष्ट्रातल्या अनेक गावांत फिरून पाणी प्रश्‍न समजून घेतला. शिक्षणानंतर संतोष गावाकडे परत गेला. परतल्यावर संतोषने सर्वांत प्रथम गावाचा सर्व्हे केला. गावात शौचालय नसल्याने आजार मोठ्या प्रमाणावर असल्याचे त्याला जाणवले. त्याचप्रमाणे लग्न करून देताना कर्जाचा आधार घेऊन अवास्तव खर्च होत असल्याचे त्याला आढळले. त्याचप्रमाणे व्यसनाधीनता (विशेषतः) दारू, स्वस्त धान्य व रॉकेल न मिळण्याबरोबरच महिलांच्या अनेक समस्या दिसून आल्या.

कायमस्वरूपी तोडगा
समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संतोषने प्रथम तालुक्‍यातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सरकारी योजना समजून घेतल्या. त्यानंतर लगेचच त्यानं गावातील शौचालयाचं काम हाती घेतलं. "आधी केले, मग सांगितले'प्रमाणे त्याने शौचालय पूर्ण झाल्यानंतर लोकजागृतीसाठी बैठका घेतल्या. गावाच्या श्रमदानातून 40 शौचालयाचं काम सुरू केलं.

व्यसनाधीनतेचा अडसर केला पार
व्यसनाधीनतेमुळे युवांना एकत्र करणं शक्‍य होत नव्हतं. मन्याळी गावात होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सगळेच स्त्री-पुरुष दारू पितात. व्यसनाधीनतेचा हा गंभीर प्रश्‍न नष्ट करण्याच्या उद्देशाने संतोषने व्हॉलिबॉल खेळाची सुरवात केली. त्याचबरोबर त्याने वाचनालयही सुरू केले, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या या वाचनालयात सातशे पुस्तकं आणि वर्तमानपत्र उपलब्ध आहेत. संतोषच्या प्रयत्नांनी, ठाणेदारांच्या पुढाकाराने आणि लोकांच्या संमतीने गावातल्या चार ते पाच दारूच्या भट्ट्या कायमस्वरूपी बंद झाल्या.

गावकऱ्यांनीच मिळवला हक्क
संतोषने बचतगटाच्या महिलांना एकत्र करून महिलांचे आपसातले मतभेद मिटवण्यात पुढाकार घेतला. यातूनच त्यानं गावातल्या स्वस्त धान्य दुकानांतून प्रत्येकाला हक्काचं धान्य किंवा रॉकेल मिळत नसल्याचं दिसून आलं. त्यासाठी त्याने संपूर्ण गावाला एकत्र आणले, ज्यामुळे गावाला हे धान्य आणि रॉकेल मिळू लागले. महिलांचा मुख्य प्रश्‍न होता पाणी. तो सोडविण्याकरता संतोषने विहिरीचं काम हाती घेतलं. या कामात दिवसा बचतगटाच्या महिला आणि रात्री गावातले तरुण कामाला लागले आहेत. आता हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

स्वप्न उतरणार सत्यात
शासकीय योजना आणि गाव सहभागातून संतोषला आपलं गाव हिरवगार करायचं आहे. गावातल्या प्रत्येकाच्या हाताला काम असलं पाहिजे, असं त्याला वाटतं. सध्या गावातला शौचालयाचा प्रश्‍न सुटला आहे. लग्नसमारंभातला अवास्तव खर्च टाळण्याचा आदर्श तो स्वतःच नोंदणी पद्घतीने लग्न करून गावासमोर ठेवणार आहे. संतोषनं लहानपणापासून स्वप्नात पाहिलेलं सुंदर गावाचं स्वप्न हळूहळू त्याच्याच प्रयत्नानं साकार होताना दिसतंय.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 19/04/2011 04:31 PM Suresh S. Mitkari said:
संतोष गवळीचे अभिनंदन .... ग्रामीण तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी. व्यसनाधीनतेचा अडसर प्रत्येक खेडेगावात आहे. त्याच प्रमाणे. लोकांचा विश्वास एकमेकावर नाही. तो तयार करावा लागणार ,फार चांगले विचार आहेत.
On 19/04/2011 04:29 PM Suresh S. Mitkari said:
संतोष गवळीचे अभिनंदन .... ग्रामीण तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी. व्यसनाधीनतेचा अडसर प्रत्येक खेडेगावात आहे. त्याच प्रमाणे. लोकांचा विश्वास एकमेकावर नाही. तो तयार करावा लागणार ,फार चांगले विचार आहेत.
On 14/04/2011 11:07 AM kailas ghanshyam supe said:
Dear Santosh, You doing God's Work.keep it up....
On 12/04/2011 05:07 AM MN Dhokale said:
संतोष गवळीने फारच चांगला उपक्रम राबवला आहे. संतोष गवळीचे अभिनंदन ग्रामीण तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी. व्यसनाधीनतेचा अडसर प्रत्येक खेडेगावात आहे. त्याच प्रमाणे. लोकांचा विश्वास एक मेकावर नाही. तो तयार करावा लागणार आहे.
On 12/04/2011 02:17 AM danny said:
Kharech फार चांगले विचार आहे आणि हे सर्वे युवकानीन हे अवलंबले फाहीजे तरच भारताचा विकास होईल. नाही तर आम्ही परदेशात राहून कुटुंबाची सुखे pahat आहोत शरमेची goshta आहे pan नाईलाज आहे????????
On 11/04/2011 04:50 PM sandip said:
Gud work ...keep it up......


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: