Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

स्मारकावर नामांतर आंदोलनाचे प्रतीक अंकित असावे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 12, 2011 AT 12:00 AM (IST)
नागपूर - आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोळा वर्षे नामांतराचा लढा लढला. नामांतरासाठी राज्यात 23 कार्यकर्ते शहीद झाले. या शहिदांच्या सन्मानासाठी 16 वर्षांनंतर नागपूर महापालिकेला जाग आली. नामांतर शहीद स्मारक तयार करण्याच्या कामाचा नारळ फुटला. दहा नंबर पुलाजवळ शहिदांचे स्मारक तयार होत आहे. परंतु, या स्मारकावर नामांतराचा इतिहास अंकित नाही. स्मारकाच्या प्रतिकृतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती अंकित करण्याची गरज असल्याचा सूर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या चर्चासत्रातून पुढे आला.

आंबेडकरी चळवळीतील संघर्षात "नामांतर आंदोलन' महत्त्वाचा टप्पा होता. या आंदोलनाने चळवळ बळकट केली. यामुळेच महापालिकेने उत्तर नागपुरात नामांतर आंदोलनातील शहिदांच्या सन्मानार्थ शहीद स्मारक तयार करण्याचा प्रस्ताव संमत केला. परंतु, सोळा वर्षांनंतरही हा प्रस्ताव कागदावरच राहिला. महापालिकेतून कॉंग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली. आता रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे काम सुरू झाले. नामांतर आंदोलनाचे प्रतीक तयार होत आहे. महापालिकेच्या या प्रस्तावाचे आंबेडकरी चळवळीतर्फे अभिनंदन करणारा ठराव संमत करण्यात आला. नामांतर आंदोलनातील शहीद स्मारकाची प्रतिकृती तयार झाली. परंतु, या प्रतिकृतीकडे बघितल्यास नामांतर चळवळीचा कोणताही इतिहास या स्मारकातून पुढे येत नाही. औरंगाबादेतील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार शहीद स्मारकाच्या प्रतिकृतीमध्ये अंकित केल्यास नामांतर आंदोलनाचा इतिहास जिवंत होईल. यातून चळवळीला प्रेरणा मिळेल, असा आशावाद यावेळी रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वहाणे यांनी व्यक्त केला. तर, दिलीप पाटील यांनी महापालिकेने आंबेडकरी चळवळीचा सन्मान करीत नामांतर आंदोलनाच्या लढ्याचा इतिहास स्मारकावर अंकित करावा, अशी मागणी केली. निळू भगत यांनी नामांतर आंदोलनातील इतिहासाचा लढा स्वतःच्या चित्रकृतीतून सादर केला.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: