Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'बेस ऑफ पिरॅमिड'
दीपा देशमुख, uth@esakal.com
Saturday, April 23, 2011 AT 11:47 AM (IST)
सातवीच्या सुटीत तन्मय गावी गेला होता. तिथे त्याच्याच वयाच्या एका मुलीच्या लग्नाची तयारी चालू होती. तन्मयला मात्र मुलीची लग्नपत्रिका पाहून आजोबांनी आणि आईने सांगितलेल्या न्याय-अन्यायाच्या गोष्टी आठवत होत्या. या घटनेने अस्वस्थ झालेल्या तन्मयने कोणालाही न सांगता पत्रिका उचलली आणि थेट पोलिस स्टेशन गाठलं. "हा बालविवाह आहे आणि तुम्ही तो थांबवा,' असा आग्रह धरला. अर्थातच पोलिसांनी एवढासा पोरगा समजून त्याला दाद दिली नाही.

लहान वयातच समाजकार्य-
औरंगाबादला शाळेत जाताना रस्त्यात भटक्‍या लोकांची वस्ती लागे. या वस्तीतील मुलं कशी शिकत असतील, ही लोकं कुठं जात असतील, असे अनेक प्रश्‍न त्याला पडत. मग शाळा सुटली, की सायकलवर त्या वस्तीत जाऊन, लोकांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेत असे. दहावीनंतर तन्मय पुण्यात आला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाला. मनात कुठेतरी ती वस्ती, ती लोकं होतीच. पाठ्यपुस्तकातल्या गोष्टी वास्तवात कशा येतील हे कळत नव्हतं...त्यामुळे पुस्तकात मन रमत नव्हतं. मग 18-19 वर्षांच्या या तरुणाने अनुभवासाठी नोकरी करायला सुरवात केली. याच दरम्यान तन्मयची "निर्माण'शी ओळख झाली आणि मनात येणाऱ्या असंख्य प्रश्‍नांना एकट्यानंच उत्तर शोधणाऱ्या तन्मयला अनेक मित्र भेटले.

ग्रुप बीओपीची स्थापना-
नोकरी आणि शिक्षण एकाच वेळी चालू होतं. पुण्यात तो विश्रांतवाडीबरोबरच इतर अनेक वस्त्यांमध्ये फिरत होता. लहान मुलांपासून युवकांपर्यंतची स्थिती पाहताना, इथल्या मुलांनी शिकायला हवं, या भावनेनं तो कॉम्प्युटर, गणित आणि विज्ञान हे विषय शिकवू लागला. हे करत असतानाच एक दिवस तन्मयने वस्तीतल्या मुलांना एकत्रित केलं. ती मुलं काय काम करू शकतात, याविषयी चर्चा केली. त्यातून एक टीम तयार झाली. या टीमचे रूपांतर नंतर ग्रुप बीओपी (बेस ऑफ पिरॅमिड) नावाच्या रजिस्टर्ड संस्थेत झालं.

रोजगारासाठी स्थापना-
आजची अर्थव्यवस्थेची स्थिती पिरॅमिडसारखी आहे. हा पिरॅमिड उलटा व्हायला हवा. जेणेकरून तळागाळातल्या लोकांना रोजगार उपलब्ध होऊन, त्यांचं उत्पन्न वाढवायची गरज त्याला भासली. त्यामुळे त्यानं अगदी अल्प भांडवलावर सकाळी 6 ते 9 या वेळात घरोघर जाऊन "गाडी धुणे' हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवला आहे. या व्यवसायामुळे मुलांमध्ये आत्मविश्‍वास आणि उत्साह आला आहे. तन्मयच्या कामात मदत करू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन त्यानं केलं आहे.

काम करून शिकावे-
आज तन्मय जोशी फक्‍त 21 वर्षांचा आहे. "करता करता कामातून शिकणे' हा त्याचा मंत्र आहे. कला शाखेचा पदवीधर असूनही, तो उत्तम वेबसाइट तयार करून देतो. सध्या मेट्रिक कन्सल्टन्सीच्या वाईमधील कॉल सेंटरच्या कॅम्पससाठी पर्यावरणाशी सुसंगत-सांडपाण्याचं, पावसाच्या पाण्याचं आणि घनकचरा व्यवस्थापन करण्याचं कामही तो करतो आहे.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 23/04/2011 12:20 PM ajit bondre said:
hello tanamayjoshi mala pan mazy gawasathi kahi karyache aahe reguler jivan tar saglech jagatat pan mala kahi tari vegale karayche aahe pl mazy gavakadil collage chy mulana income dyacha aahe mi puny madhe kam karto mi ratnagiri devrukh madhun aahe tuza lekh khup chan aahe avdala mala


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: