Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'खाउचा गाव' अल्बमचे आज मुंबईत प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 07, 2011 AT 12:15 AM (IST)

जळगाव - ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेला बालगीतांचा "खाऊचा गाव' या अल्बमचे प्रकाशन उद्या (ता. 7) सायंकाळी साडेसातला शिवाजी मंदिर, नाट्यगृह, दादर येथे धम्माल नृत्यगाण्यांच्या आविष्कार सोहळ्यात होणार आहे. मुंबई येथील युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपने हा अल्बम तयार केला आहे.
यशवंत देव, करुणा देव, अभिनेत्री सुलभा देशपांडे, संगीतकार श्रीधर फडके, अभिनेते प्रशांत दामले, अविनाश नारकर, ऐश्‍वर्या नारकर आदी यावेळी प्रमुख पाहुणे असतील. नृत्याविष्कार सिद्धी सफळे, चैताली भिरूड, शिवानी चौधरी, शिवानी पाटील, भूमिका पाटील, श्रीया वडोदकर, गौतमी आठवले, कल्याणी मिसर, स्वरमयी देशमुख, शुभम भिरूड आणि अबोल कानडे हे जळगावचे कलाकार सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन रत्नाकर नारदाळकर केले आहे. कार्यक्रमासाठी एस. डी. भिरूड, प्रदीप सफळे, मिलिंद देशमुख, भास्कर पळणीटकर आदीचे सहकार्य आहे.

या अल्बममध्ये गीतकार यशवंत देव, प्रवीण दवणे, राजा मिसर आणि प्रिया सफळे यांनी बालविश्‍वातील विषयांना स्पर्श करून ठेका धरायला लावणारी, गुणगुणावीशी वाटणारी, मोठ्यांनाही पुन्हा बालपण अनुभवावयास देणारी अशी मुग्धगीते लिहिली आहेत. यशवंतदेवांचा संगीत स्पर्श झाल्याने या गीतांचा गोडी अविट झाली आहे. सारेगमच्या लिटल चॅम्पस्‌ आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन आणि जळगावचा बालगायक अबोल कानडे या बालगायकांनी उत्कृष्ट गाणी गायिली आहेत.

"खाऊचा गाव' या धम्माल बालगीतांच्या अल्बमचे निवेदन लेखन जळगावच्या प्रिया सफळे यांनी, तर निवेदन सिद्धी सफळे यांनी केले आहे. संकल्पना पांडुरंग धांग्रेकर यांची आहे.
प्रतिक्रिया
On 08/05/2011 07:31 PM Sumeet R Badha said:
मुग्धा तुझ्या या अल्बम साठी माझ्या खूप खूप शुभेछा. कृपया हा अल्बम नाशिक मधेय सर्वत्र उपलब्ध करून द्या .
On 08/05/2011 02:27 PM Dhiraj Deshmukh said:
"अलीबागची कली चिमुकली, सुगंध अपुला उधलु लागली! मंत्रमुग्ध करी जिचे गायन, नाव तिचे मुग्धा वैशम्पायन! अक्षय राहो जगी सर्वदा,तुझ्या स्वरांची जादूगिरी !!१!! लाखामधले पंचरत्न तुम्ही ,या सृष्टिची किमया न्यारी! मुग्धा तुझ्या "खाऊचा गांव" या नविन अल्बमला माझ्या कोटी-कोटी शुभेच्छा!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: