Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

हार्वेस्टर खरेदीसाठी ऊस उत्पादकच सरसावले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 15, 2011 AT 01:00 AM (IST)
Tags: harvestor,   bhavaninagar,   pune

भवानीनगर - अतिरिक्त उसाचा प्रश्‍न आणि मजुरांच्या अडवणुकीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक होरपळून निघालेल्या छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आता ऊस उत्पादकच हार्वेस्टर खरेदीसाठी पुढे सरसावले आहेत. कारखान्याने यासंदर्भात प्रोत्साहनाचे धोरण जाहीर करताच 30 हार्वेस्टर खरेदीची तयारी शेतकऱ्यांनी दाखविली आहे.

छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मागील वर्षी 17 हजार टन उसाचे क्षेत्र गाळपाविना राहिले. यावर्षी तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडीच ते तीन लाख टन अतिरिक्त ऊस आहे. अनेक दिवसांच्या धावपळीनंतर बराचसा ऊस गाळप करण्यात कारखान्याला यश मिळाले. मात्र, यावर्षी मजुरांची कमतरता जाणवत आहे. मजुरांनी अडवणूक करीत तोडणीसाठी जादा पैसे उकळले. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये अस्वस्थता आहे. अतिरिक्त उसाची समस्या पुढील हंगामातही जवळपास तशीच राहणार आहे. 34 हजार एकरांच्या आसपास उसाच्या लागवडीची नोंद असल्याने ऊसतोडणीची टांगती तलवार पुढील हंगामात आ वासून उभी राहणार आहे. त्यामुळे कारखान्याने आतापासूनच वेगवेगळ्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विस्तारीकरणाच्या मुद्द्याबरोबरच मध्यम आकाराचे हार्वेस्टर यंत्र खरेदीची योजना राबविण्याचे कारखान्याच्या विचाराधीन आहे. त्यातून कारखान्याने हार्वेस्टर खरेदी करण्याऐवजी ट्रॅक्‍टर ट्रेलरप्रमाणेच कारखान्याने शेतकऱ्यांना हार्वेस्टर खरेदीसाठी प्रोत्साहन द्यायचे व त्यांच्या मालकीच्या हार्वेस्टरला तोडणी व वाहतुकीचे भाडे द्यायचे, अशी योजना राबविण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. यासाठी कारखान्याने नुकतेच एक परिपत्रक काढून गळीत हंगामात ट्रॅक्‍टर चालविले जातात, त्याप्रमाणेच हार्वेस्टर चालवायचे आहेत, अशी माहिती सभासदांना दिली. 12 मेपर्यंत यासंदर्भात इच्छुक शेतकऱ्यांनी नावे नोंदवावीत, असे कारखान्याने कळविले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 30 हार्वेस्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी तयारी दाखविली आहे. साधारणतः एक कोटीपर्यंत किंमत असलेले हार्वेस्टर या माध्यमातून खरेदी केले जाणार आहे.

या संदर्भात ऊस विकास अधिकारी बी. एस. घुले यांनी सांगितले की, आतापर्यंत गट व वैयक्तिक स्तरावर ऊस उत्पादकांनी 30 हार्वेस्टर खरेदी करण्याची तयारी दाखविली असून, तशी लेखी पत्रेही कारखान्याकडे दिली आहेत. या शेतकऱ्यांची लवकरच एक सभा बोलावून त्यांना या संदर्भात आवश्‍यक ती माहिती दिली जाणार आहे.
प्रतिक्रिया
On 15-01-2012 11:45 AM Sampat Sawant said:
Congratulation , this is very good news for farmer,today we are required some aduhunik technic for farming, because lot of time and money consume to man power.
On 30/10/2011 02:15 PM Bhalchandra Kulkarni said:
या यंत्राची सद्या खूप गरज आहे . तोडणी कामगार , त्यांच्या नावावर भांडवल करणारे नेते मंडळी यांचे खूप नाकोते उद्योग चालले आहेत . छत्रपती कारखान्याचे हार्दिक आभिनंदन !!!!!!!!!!!!१ तुम्ही हे कराच , बाकी कारखाने देखील तुमच्या मागे येतीलच !!!!!!!!!
On 08-09-2011 07:02 PM sachin said:
Very Good thing, last year i ahve paid more than 80,000? rs for this sugar cane cutting activity. if this workout i think we can save ou money.
On 11/08/2011 08:35 PM shripadmhaswad said:
अकलूज कारखान्याच्या कामगारांनी शेवटी शेवटी २०-२० हजार द्यावे लागले. harvestaar ने उस तोडताना प्रगत harvester आले पाहिजेत कारण फक्त पट्टा पद्धत उस त्याने तोडला जातो आणि पट्टा ठेवला तर नुकसान होतेच. harvester वळायला ज्यास्त जागा लागते त्यातही सुधारणा व्हायला पाहिजे
On 16/07/2011 05:57 PM fattesingh gaikwad said:
खूप चांगली योजना-छत्रपती कारख्ण्याच्या संचालक मांडलाचे व उउस उत्पादक शेत्कार्त्यांचे अभिनंद.हि योजना सर्व कारखान्यांनी राबवावयास पाहिजे. गेल्या हंगामात शेवटी उस तोड कामगारांनी शेतकर्यांना खूप वेठीस धरल्रे. घोडगंगा कारख्या अंतर्गत शेतकर्यांना एकरी रुपये ५००० हजार मोजावे लागले व नाही धीले त्यांचा उस आजही शेतात उभा आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: