Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

हमारी मुठ्ठी में आकाश सारा,,,(जयप्रद देसाई)
दीपा देशमुख uth@esakal.com
Thursday, May 26, 2011 AT 03:09 PM (IST)
Tags: uth tube
सिनेमा अत्यंत खर्चिक प्रकरण आहे. ये अपने बसकी बात नही....'असा विचार करताना "सिनेमा बनवणं, हे तुम्हा-आम्हा कोणालाही शक्‍य आहे,' असं जर मी म्हटलं तर... ? खरं वाटत नाही ना? पण जयप्रद देसाई या तरुणानं जिद्दीनं हे वाक्‍य खरं करून दाखवलं आहे.

सिनेमावेड्यांचे स्पंदन-
जयप्रद मूळचा मुंबईचा. तो कॉम्प्युटर विषय घेऊन इंजिनिअर झाला. कॉलेजला असताना जयप्रदला डोस्टोव्हस्की, निकोलाई गोगोल, चेकॉव्ह, काफ्का आवडू लागले. त्यानं काही जाहिरातींसाठी मॉडेलिंगही केलं. फिल्म्सच्या क्षेत्रात रस निर्माण झाला. त्यानंतर त्यानं अमरजीत आमले यांच्या पुढाकारानं स्पंदन नावाचा एक ग्रुप निर्माण केला. स्पंदन हा अशा दीडशे समविचारी सिनेमावेड्यांचा गट आहे.

जगभरातल्या सिनेमांचा अभ्यास-
सामान्य माणूस कमी खर्चातही सिनेमा बनवू शकतो, या विश्‍वासानं साधा डिजिटल कॅमेरा घेऊन शॉर्ट फिल्म बनवण्याचं काम सुरू झालं. "स्पंदन'नं अनेक कार्यशाळाही घेतल्या. जयप्रद न्यूयॉर्कला "स्टर ऑफ फाईन आर्ट' करण्यासाठी रवाना झाला. न्यूयॉर्कमध्ये जपान, ब्राझील आणि आखाती देशांतून आलेले अनेक विद्यार्थी होते. सगळे एकत्र येऊन निर्माण झालेलं वेगळं जग बघून जयप्रद स्तिमित झाला. इथं जगभरातले सिनेमे त्याला अभ्यासता आले.

"रोज बुश'ची निर्मिती-
जयप्रदनं आपल्या प्रोजेक्‍टअंतर्गत बनवलेली पहिली फिल्म म्हणजे "रोज बुश.' हे सगळं काम करताना त्याला "डीपर यू गो, हायर यू रिच' या मंत्राची शिकवण मिळाली. त्यानं या मंत्राचं पालनही केलं. या फिल्मला राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट स्क्रीन प्ले आणि मोस्ट प्रॉमिसिंग फिल्मचा पुरस्कार मिळाला. एका जिवावर बेतलेल्या आजारपणानंतर काहीच दिवसांत जयप्रदनं हे असाध्य काम सिद्ध करून दाखवलं होतं.

"निर्माण'मध्ये शामील-
एक दिवस जयप्रदला निर्माण उपक्रमाची माहिती मिळाली. त्यानं अनिल अवचट यांचं "कार्यरत' वाचलं. "माझी संवेदनशीलता भारतीय मनाची आहे. मला माझ्या लोकांच्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत,' अशी भावना त्याच्या मनात प्रखर होऊ लागली. परदेशातून परतल्यावर जयप्रद "निर्माण'मध्ये दाखल झाला. "सामाजिक कार्य करताना संवेदनशील असायला हवं; पण त्यात वाहून जाता कामा नये,' या गोष्टीची जाणीव जयप्रदला निर्माणमध्ये झाली.

नव्या जन्माचा अनुभव-
जयप्रदनं "निर्माण' फिल्मची निर्मिती केली. या फिल्ममध्ये त्यानं "निर्माण'ची फेलोशिप घेतलेल्या पाच उच्चशिक्षित युवांचा प्रवास चित्रित केला. गडचिरोलीच्या नक्षलाईट भागापासून ते धडगावसारख्या दुर्गम आदिवासी भागातही जयप्रद भर उन्हात कॅमेरा घेऊन फिरत होता. या दरम्यान "स्वराज्य' ही मराठी फिल्मही तो करत होता. तो आता रेणू गावस्करांसोबत हिंदी फिचर फिल्म करतोय. तसंच मेधा पाटकरांसोबत आदिवासी मुलांच्या जीवनशाळा अभ्यासताना तिथल्या मुलांच्या त्यानं कार्यशाळा घेतल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानद्वारा औरंगाबादमधल्या बशर नवाज या उर्दू शायरीच्या महान हस्तीवर फिल्म करायची ऑफरही त्याला आली. "या प्रत्येक फिल्मनंतर नव्या जन्माचा अनुभव मला येतो' असं जयप्रद म्हणतो.

सिनेमा देतो सामाजिक संदेश-
"स्पंदन'च्या पुढाकारानं मुंबईच्या "निर्माण'च्या ऑफिसमध्ये गेल्या दोन वर्षांपासून फिल्म क्‍लब सुरू आहे. "कुठलाही चांगला सिनेमा सामाजिक संदेश देतो,' असं जयप्रद आवर्जून सांगतो. सत्यजित रे यांचा प्रभाव असणाऱ्या जयप्रदला राज कपूर, विजय आनंदसारखे दिग्दर्शक आवडतात. आज "स्पंदन'बरोबर अनेक मध्यम वर्गातले युवा जोडले जात आहेत. "हमारी मुठ्ठीमे आकाश सारा...' म्हणणाऱ्या जयप्रदसोबत तुम्हालाही बनवायचीय फिल्म?
प्रतिक्रिया
On 06/06/2011 09:25 AM shrimant bhagle said:
मला हि या सगळ्या गोष्टींचीखूप आवड आहे मलाही कॅमेरावोर्क शिकायला अथवा त्या संबंधी माहिती जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद !
On 27/05/2011 09:56 PM Bhagyashree Deo said:
मी लहानपणा पासून सिनेमा वेडी आहे.इथे अमेरिका मध्ये रदिओ वर काम केल. मला बोल्ल्य्वूड च्या बातम्या लिहायला व रदिओ वर वाचायला फार आवडतात. सिनेमा निर्माण करायला फार आवडेल.जयप्रदा मला ए-मैल लिही. धन्यवाद.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: