Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राह बनी खुद मन्जिल... प्रियदर्श तुरे
दीपा देशमुख (uth@esakal.com)
Thursday, June 02, 2011 AT 12:00 AM (IST)

"ब्रिटिश मेडिकल जर्नल' जगातला मान्यताप्राप्त ग्रुप आहे. हा ग्रुप दर वर्षी जगभरातल्या मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या ग्रुपला निवडतात. त्यांनी बिहार पूरग्रस्तांसाठी काम केलेल्या "डॉक्‍टर्स फॉर यू' या ग्रुपला "सार्क नेशन ऍवॉर्ड' नुकताच जाहीर केला आहे. याच ग्रुपमधला एक युवा डॉक्‍टर म्हणजे प्रियदर्श तुरे.


मेडिकलच्या अभ्यासाला सुरवात
प्रियदर्श अभ्यासात यथातथाच असलेला विद्यार्थी, पण प्रियदर्शने अकरावीत असताना बाबासाहेब आंबेडकर यांचं "बुद्ध आणि त्याचा धम्म'े पुस्तक वाचलं. या पुस्तकानं अंतर्मुख होऊन त्यानं स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. हा मुलगा चक्‍क मेडिकलला गेला. २००६ मध्ये प्रियदर्शने ११ वर्षांपासून कार्यरत असलेलं "मेळघाट मित्र' जॉइन केलं. त्यानंतर "मैत्री' या संस्थेसोबत प्रियदर्शने धडक मोहीम राबवली, ज्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. या वेळी त्याला निर्माण उपक्रमाची माहिती मिळाली.

बिहारमध्ये पोचला प्रियदर्श
२००८ या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात बिहारला पूर आला, तेव्हा महाराष्ट्रातून ५० डॉक्‍टर बिहारला रवाना झाले. त्यात इंटर्नशिप करणाऱ्या प्रियदर्शचाही समावेश होता. त्या वेळच्या बिहारमधील अत्यंत भीषण अवस्थेमुळं मिळेल ते खाणं आणि जिथे गरज तिथे सात-आठ तास प्रवास करून पोचणं... अशी दिनचर्या चालू होती. सहरसा, सुपोल आणि खगेरिया या तीन जिल्ह्यांत प्रियदर्श फिरत होता.

मेळघाटमध्ये काम सुरू
त्यानंतर प्रियदर्श मेळघाटमध्ये रुजू झाला. तेथील पाण्याची तीव्र टंचाई, डायरियाचा उच्छाद, स्थलांतर अशा अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केलं होतं. तिथे मूल आजारी असलं, तरी कोणावर तरी सोपवून माणसं कामासाठी इतरत्र निघून जातात. प्रियदर्शला सुरवातीला काम करताना आणि पेशंटसोबत संवाद साधताना अनेक अडचणी आल्या. आदिवासी भागात आजही भगताचा प्रभाव असल्याने, जर त्यानं "डॉक्‍टरकडे जा,' असा सल्ला दिला, तरच हे लोक डॉक्‍टरकडे येणार, अशी स्थिती. पण भरपूर प्रयत्न केल्यानं पूर्वी ओपीडीत रोज ३० रुग्ण येत, त्यांची संख्या १५० झाली आहे.

शासनाला परिस्थिती सांगायचीय
कुठल्याही आजाराला लगेच उपचार गरजेचे असल्यानं, त्यानं ० ते ६ वयोगटातल्या मुलांवर लगेच उपचार केले. त्यातच त्यानं बालमृत्यूचं प्रमाण जास्त असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित केलं. यापुढील काळात एमपीएच करून, शास्त्रशुद्ध संशोधनाच्या पद्घती शिकणं आणि शासनाच्या पॉलिसी मेकिंगमध्ये सहभाग घेऊन या परिसरातील परिस्थिती आणि भावनिक भाषा आकडेवारीच्या स्वरूपात शासनापर्यंत पोचवण्याचं काम प्रियदर्शला करायचं आहे. प्रियदर्शला कामानिमित्त फिरणं जास्त आवडतं. जंगलातले रस्ते हेच मित्र आणि काम हाच त्याचा छंद आहे. "काम हीच तुमची ओळख' असं तो मानतो. या वर्षीच्या तो धडकमोहिमेत तुम्हाला सहभागी व्हायचं आहे? आणि भेटायचंय प्रियदर्शला?
प्रतिक्रिया
On 29/06/2011 06:18 PM Gayatri said:
मानला तुम्हाला....... खूप छान वाटल हा लेख वाचून. मी डॉक्टर नाहीये तरी पण मी "doctors for you " हा group जॉईन करून तिथल्या डॉक्टर्स ना assist करून शकते का?
On 19/06/2011 06:08 PM Pavan Gongale said:
Bravo sonu, and well appreciated. Do good work and goodness will follow your ways.
On 05/06/2011 04:18 PM pramitee said:
एवढया लहान वयात एवढे छान काम अतिशय कौतुकास्पद आहे खरच तुझ्या कडून प्रेरणा मिळते. I really feel lucky to be your friend. :))))
On 05-06-2011 02:12 AM Swati Wankar said:
Great Dear we all are proud of You. Hats Off!!!!!
On 02/06/2011 06:48 PM Yadnesh said:
Hats off Sonu Sir!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: