Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

विज्ञान के उजालों की ओर ले चलो...
दीपा देशमुख, uth@esakal.com
Thursday, June 09, 2011 AT 01:07 PM (IST)
सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित असलेली अहमदनगरची कल्याणी विज्ञानवेडी तरुणी आहे. शाळेतल्या शिक्षकांमुळे विज्ञान विषयाची गोडी लागली. त्यानंतर अहमदनगरच्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेची कल्याणी कॉम्प्युटरिंग इंजिनिअरिंगसाठी पुण्यात आली.

विज्ञानामध्ये रस असल्यानं पुण्यात आल्या आल्या कल्याणीनं आयुकाला भेट दिली. तिथं ती अरविंद गुप्ता यांना भेटली. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाविषयीची तळमळ आणि आयुकातलं विज्ञानाचं विश्‍व पाहून कल्याणी एकदम हरखून गेली. तिला अचानक खजिना सापडल्यासारखं वाटलं. "काय शिकू आणि काय नको,' असं तिला झालं. अरविंद गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक खेळणी बनवणं, प्रयोग करणं, ओरिगामीच्या वस्तू तयार करणं अशा अनेक गोष्टी ती शिकली. तिनं व्हॉलिंटियर म्हणून कामही केलं. रात्री दहा वाजता झोपणं आणि पहाटे पाचला उठणं या शिस्तशीर दिनक्रमातून वेळ काढून कल्याणी नियमित योगा तर करतेच, शिवाय ती कथ्थक हा नृत्यप्रकारही शिकतेय.

विज्ञानाची सत्रं घेते
बहुतांशी मुलांना विज्ञान आणि गणित या विषयांची भीती वाटते. अशा वेळी विज्ञान हा विषय किती सुंदर आहे, विज्ञान आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, हे ती मुलांना समजावून देऊ लागली. या विषयातील गोडी आणि सोपेपणा आपल्या आसपासच्या अनेक मुलांना कळावा, या तळमळीतून कॉलेजमध्ये जातानाच कल्याणी शाळांमधून संपर्क साधू लागली आणि मुलांसाठी विज्ञानाची सत्रं घेऊ लागली.

'निर्माण'शी झाली ओळख
एक दिवस समविचारी ग्रुपच्या शोधात असलेल्या कल्याणीला "निर्माण'विषयी माहिती मिळाली. कल्याणीला वाचनाची आवड सुरवातीपासूनच होती; पण विचारांची खोली वाढावी, असं तिला मनापासून वाटे. "निर्माण'मध्ये पुस्तकं, फिल्म, राजकारण, तत्त्वज्ञान यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा होई. त्यामुळे अनेक विषयांतला आवाका वाढू लागला. एकटं असण्यापेक्षा चार जणांचं बळ कामाला किती पुढे नेतं, याची तिला जाणीव झाली. नवनवीन गोष्टी शिकणं आणि एक्‍स्प्लोअर करत राहणं तिला जास्त आवडू लागलं.

"कुमार निर्माण'मध्ये सहभागी
निर्माण आणि अरविंद गुप्ता यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाची सांगड घालून मुलांसाठी काय करता येईल, याचा विचार कल्याणी करू लागली. कुमारवयीन मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी कल्याणी निर्माणच्याच "कुमार निर्माण' उपक्रमात सहभागी झाली. आठवीच्या मुलांसोबत कल्याणीनं हा उपक्रम हाती घेतला. मुलांना काय हवंय याचा विचार करून फिल्म, नाटक, खेळ आणि कृतींचा वापर कल्याणीनं केला.

अनेक उपक्रमांचं नियोजन
शाडूच्या मातीपासून इकोफ्रेंडली गणपती बनवणं, मुलांना हस्तलिखित करायला लावणं, फिल्म कशी बघायला हवी याविषयी चर्चा, असे उपक्रम ती घेऊ लागली. एका सत्रात अपंग मुलांचे प्रश्‍न काय असतात, हेही समजून घेण्याचा प्रयत्न कल्याणीनं केला. त्यामध्ये तिनं खेळाच्या माध्यमातून प्रत्येकाला अपंग असल्याचं समजायला लावून, त्याप्रमाणे कृती करायला लावली. सुरवातीला गंमत, अडखळणं, धडपडणं झालं आणि काहीच क्षणात या प्रश्‍नाचं गांभीर्य मुलांच्या लक्षात आलं. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कल्याणीसोबत तुम्हालाही असं काम करायचंय?
प्रतिक्रिया
On 22/11/2011 08:33 PM ramnath gambhire said:
छंद जोपासा जीवन जगण्याचा मार्ग सापडेल
On 23/10/2011 06:30 PM Vasant Sonawane Abu Dhabi UAE said:
कल्याणी यांचा प्रयत्न खरच कौतूकासपद आहे.
On 01/09/2011 10:25 PM Sambhaji P Gaikwad said:
I am intersted to working with kumar mirman and creating awerness on science. also interst to expose scientific toys game amoung school student. Pl guide me
On 26/08/2011 04:00 PM Sanjay Patil said:
To be inspire before u expire...! very nice achievment. keep going. All the best..............
On 26/08/2011 04:00 PM Sanjay Patil said:
To be inspire before u expire...! very nice achievment. keep going. All the best..............
On 12/06/2011 12:30 PM Chetan Patil said:
वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये रूजवण ही काळाची गरज आहे. कल्याणी यांचा प्रयत्न खरच कौतूकासपद आहे.मलाही असं काम करायला आवडयेल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: