Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

समाजकारणाचा निवडून रस्ता... डॉ. अमित नागरे
दीपा देशमुख uth@esakal.com
Thursday, June 16, 2011 AT 12:46 PM (IST)
बहुतांश मुला-मुलींप्रमाणेच दहावी-बारावीपर्यंत मजेत आयुष्य घालवणारा अमित नागरे. त्याला बाहेरच्या जगाचं फारसं भान नव्हतं. पुढं काय करायचंय हेही माहीत नव्हतं. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून पास व्हायचं, असं रूटीन त्याचं होतं. आई-वडिलांच्या इच्छेमुळं तो डॉक्‍टर झाला. पण वैद्यकीय व्यवसाय न करता हा समाजकारणाकडे वळला.

कॉलेजमध्ये असताना अमित निर्माणमध्ये आला. त्यानंतर त्याला "व्यक्‍त होणं' कळालं. मग त्यानं स्वतःमध्ये डोकावून पाहिलं. विचार केला. स्वतःच्या प्रवासाविषयी सजग झाला. त्यानं आजूबाजूचं जग खऱ्या अर्थानं बघायला सुरवात केली. गावात जाऊन राहावं लागल्यावर त्याला तेथील लोकांचं जगणं कळालं.

अनेक कामांमध्ये सहभाग
जव्हार या आदिवासी भागामध्ये अमितने कुपोषण या विषयावर वर्षभर काम केलं. त्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास वाढला आणि पुढल्या प्रवासाची दिशाही मिळाली. आपण स्वीकारलेल्या लोकशाहीरचनेत लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशासकीय यंत्रणेत काम करताना काही मर्यादा येतात. तेव्हा आपण राजकीय प्रक्रियेत सहभागी होऊन काम केलं पाहिजे, या विचारानं अमितनं यशवंतराव चव्हाण, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानासोबत काम करायचं ठरवलं.

युवा धोरणात मोलाचं कार्य
नवमहाराष्ट्र युवा अभियान ही युवकांची संघटना असून, गेली वीस वर्षं ती अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्रातल्या युवकांसाठी "युवा धोरण' बनवण्यात अमितची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. परिणामी, या वर्षीच्या अर्थसंकल्पात राज्यशासनानं युवकांसाठी पंचवीस कोटी निधीची तरतूद केली आहे. डॉ. अभय बंग आणि दत्ता बाळसराफ हे अमितचे आदर्श... आयुष्यातलं शिस्तीचं महत्त्व, सहज शिक्षणाची पद्धत, सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन या गोष्टी अमितला डॉ. अभय बंग यांच्याकडून शिकता आल्या. दत्ता बाळसराफ यांचा अफाट उत्साह, नवनव्या संकल्पना आणि युवकांशी नातं जोडण्याची पद्धत अमितला आकृष्ट करते.

आणखी जोमानं कार्य
प्रायोगिक तत्त्वावर युवा अभिसरण, व्हीजन करिअर फेअर ः शैक्षणिक पद्धत आणि व्याख्यानमाला, यशवंत युवा फेलोशिप, युवती मेळावे आणि युवा साहित्य संमेलनं असे अनेक उपक्रम त्यानं राबवले आहेत. आज राज्यात अठरा ठिकाणी व्हीजन करिअर उपक्रम सुरू आहे. अमित सहसंघटक या नात्याने युवकांशी जोडून आहे. या उपक्रमांतून युवकांच्या सामाजिक जाणिवा विकसित होऊन, त्यांनी राजकारणाकडे वळावं, असं अमितला वाटतं. बचतगटासाठीही तो नवनवे उपक्रम राबवतोय.

कम्युनिटी रेडिओची जबाबदारी
कुठलही काम गतीनं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं करण्याचं प्रशिक्षण तो विश्‍वास ठाकूर यांच्याकडे घेत आहे. ते नाशिकच्या विश्‍वास ज्ञानप्रबोधिनी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. केंद्र सरकारच्या कम्युनिटी रेडिओ संकल्पनेद्वारे स्थानिक लोकांच्या कला, प्रश्‍न, शासकीय योजना, मनोरंजन आणि प्रबोधनातून मांडल्या जाणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात येत्या 15 जुलैपासून हा कम्युनिटी रेडिओ सुरू होणार असून, विश्‍वास ज्ञानप्रबोधिनीद्वारे अमितने या कामाचीही जबाबदारी घेतली आहे.
प्रतिक्रिया
On 18/11/2011 01:37 PM Dr Pawan S Chandak said:
डॉ अमितला त्याच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा . काही शिबीर , कार्यक्रम, युवा उपक्रम असल्यास कालवणे. डॉ पवन चांडक ९४२२९२४८६१ परभणी
On 02/10/2011 02:21 AM sudha said:
Dr . अमित यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
On 21-08-2011 01:30 PM samrat yadav- patil said:
आपणास सम्राटचा मानाचा मुजरा आपण भरारी घ्या .आमच्या महाराष्ट्र युवाचा आपल्याला मानाचा मुजरा आमचा फोन-९७६२१६२३३३/०२०३२३९३३९३ /९९२०२३८९०९ कोणत्याही सेवेसाठी फोन करा .सम्राट .
On 22/06/2011 11:57 AM Amol said:
jabardast. go a head. hich khari terunaichi identity
On 21/06/2011 06:59 PM HEMANT MOHOLKAR said:
jivnat येवून tumhala भेटण्याची इच्छा aahe. call me plse 9270847973.hemant


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: