Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अतिक्रमणांच्या याद्यांवर आक्षेपासाठी मुदतवाढ
-
Saturday, September 17, 2011 AT 02:45 AM (IST)

उस्मानाबाद - जिल्ह्यातील गायरान तसेच शासकीय पड जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याच्या कार्यवाहीनुसार नियमित झालेली आणि नियमित करण्यात न आलेल्या अतिक्रमणधारकांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीवर आक्षेप दाखल करण्यासाठी ता. 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ता. 17 व 18 रोजी सुटी असल्याने जिल्हा प्रशासनाने ही मुदतवाढ दिली आहे. याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे, की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 14 एप्रिल 1990 पूर्वीच्या अतिक्रमणांच्या प्रकरणातील नियमित करण्यात आलेल्या व नियमित न करण्यात आलेल्या प्रकरणांच्या याद्या गावात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या याद्या संबंधित तलाठी आणि तहसील कार्यालयाकडे पाहण्यासाठी मोफत उपलब्ध असून, जिल्हा प्रशासनाच्या www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावरही पाहता येतील. 14 एप्रिल 1990 रोजी ज्यांची अतिक्रमणे अस्तित्वात होती आणि ज्यांची नावे यादीत समाविष्ट नाहीत त्यांनी कागदपत्रे आणि पुराव्यांसह 19 सप्टेंबरपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. या अर्जासोबत अतिक्रमणधारकाने 1990 मध्ये अतिक्रमणधारकाची नोंद असल्याचा पुरावा, गावनमुना एक- ई, जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 50 अन्वये दंड भरल्याची पावती, तावण, तहसील किंवा मंडळ अधिकाऱ्यांचा 1990 पूर्वीचा वहितीबाबतचा पंचनामा, शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत 14 एप्रिल 90 पूर्वी गुन्हा दाखल असल्यास त्याची प्रत, अतिक्रमित जमिनीपासून अतिक्रमणधारकाचे वास्तव्य आठ किलोमीटरच्या आत असल्याचा पुरावा तसेच अन्य आवश्‍यक कागदपत्रे सादर करणे आवश्‍यक आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: