Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

ग्रामसेवक भरती प्रक्रियेत कृषी पदविकाधारक अपात्र
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 18, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: gramsev,   recruitment,   konkan
सिंधुदुर्गनगरी - ग्रामसेवक भरतीसाठीच्या पात्रतेच्या अर्हतेमधून कृषी पदविकाधारक अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे हा शिक्षणक्रम पूर्ण केलल्या हजारो उमेदवारांना ग्रामसेवक भरतीची संधी हुकणार आहे.

ग्रामसेवक या पदासाठी शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा तुल्य अर्हता 60 टक्के गुणांसह आदी शैक्षणिक पात्रता निश्‍चित करण्यात आल्या होत्या. तुल्य अर्हता 60 टक्के गुणांसह यासाठी कृषी पदविकाधारकांना संधी मिळत होती. नुकत्याच एका शासन निर्णयाने ही कृषी पदविका शैक्षणिक आर्हता वगळण्यात आली आहे. त्यामुळे कृषी पदविकाधारकांसाठी ग्रामसेवक भरतीसाठीची संधी बंद झालेली आहे. कृषी पदविकाधारक अनेक उमेदवार असून या सर्वांना आता या पदाच्या भरतीला मुकावे लागणार आहे. या निर्णया विरोधात आवाज उठविण्याच्या दृष्टीने दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी पदविकाधारकांची सभा मंगळवारी (ता. 20) सकाळी दहा वाजता येथील रवळनाथ मंदिरात आयोजित केल्याची माहिती छोटू पारकर यांनी दिली.
प्रतिक्रिया
On 24/09/2011 05:57 PM sujit kumbhare said:
आम्हाला न्याय milalach pahije
On 20/09/2011 03:26 PM Pathan Yunus said:
ग्रामसेवक हि भरती कृषी पदविका या डिप्लोमा या वरच घेण्यात यावी व कृषी डिप्लोमा दहावी वरच ठेवण्यात यावा.gramsevak साठी २ वर्षाचा course nirman केलेला ahe. त्यालाच कृषी padvika ase mahntat . ha nirnay chukicha ahe.
On 18/09/2011 01:04 PM vijay vilas salve said:
ग्रामसेवक हि भरती कृषी पदविका या डिप्लोमा या वरच घेण्यात यावी व कृषी डिप्लोमा दहावी वरच ठेवण्यात यावा आणि ग्रामसेवक व शेतकरी यांचा जिवाल्याचा संबंध असल्यामुळे ग्रामसेवक हि भरती कृषी पदविका या डिप्लोमा या वरच घेण्यात यावी व शेतकऱ्यांना व कृषी पदविका या डिप्लोमा धारकांना ग्रामसेवक हि भरतीत दहावी पासवरच न्याय मिळावा अन्यथा महाराष्ट्र भर आंदोलन केले जातील व शेतकऱ्यांवर व त्यांच्या मुलांवर अन्याय करणाऱ्या शासनाच्या विरोदात ग्रामसेवक हे काळ्या फिती लावून शेवट पर्यंत काम करतील व न्याय मिळवतील म.न.से


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: