Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

डॉ. श्री बालाजी तांबे यांना वैभव पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 12, 2011 AT 11:04 AM (IST)

फलटण - पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात राज्यात अग्रगण्य असलेल्या येथील प्रिंट व्ह्यू प्रकाशनातर्फे देण्यात येणारा यंदाचा वैभव पुरस्कार ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री. बालाजी तांबे यांना जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवारी (ता. 14) दुपारी साडेतीन वाजता शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनामध्ये साताऱ्याचे पालकमंत्री रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते डॉ. तांबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकाशन संस्थेच्या संचालिका सौ. विजया पऱ्हाडकर यांनी दिली.

समाजामध्ये आरोग्यविषयक प्रबोधन करून वैयक्‍तिक आणि सार्वजनिक आरोग्याबाबत दिशादर्शक योगदान दिल्याबद्दल डॉ. तांबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पऱ्हाडकर यांनी सांगितले. रोख 15 हजार एक रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ""पुरस्कार प्रदान समारंभामध्ये "सुखी जीवनाचा मूलमंत्र' या विषयावर डॉ. तांबे मार्गदर्शन करणार आहेत. याच कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉ. सौ. सुनंदा गोसावी, प्राचार्य डॉ. डी. एम. मुळे आणि प्राचार्य सौ. सुषमा निळे यांचा विशेष गौरव करण्यात येईल.

वैभव पुरस्काराचे यंदाचे बारावे वर्ष आहे. कार्यक्रमास डॉ. मो. स. गोसावी, डॉ. सौ. वीणा तांबे, संजीवराजे नाईक- निंबाळकर, माजी प्राचार्य विश्‍वासराव देशमुख उपस्थित राहतील. विविध क्षेत्रांत योगदान दिल्याबद्दल यापूर्वी गेल्या 11 वर्षांत अभिनेते रमेश देव, मोहन आगाशे, विक्रम गोखले, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, सुकन्या कुलकर्णी यांच्यासह पंडित प्रभाकर जोग, पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे, ऍड. भास्करराव आव्हाड, डॉ. रमेश धोपटे, रमाकांत पाटील, डॉ. विजया वाड यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.''
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 12/10/2011 04:40 PM Manish Thakkar said:
श्री बालाजी तांबे यांना खूप अभिनंदन ....... प्रिंट व्ह्यू प्रकाशन यांचे आभार.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: