Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

जातपडताळणी दाखला कुटुंबाला द्या
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 22, 2011 AT 03:45 AM (IST)
Tags: cast,   verification,   family,   mumbai
मुंबई - जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याची प्रचलित पद्धत बंद करून, व्यक्‍तीऐवजी कुटुंबालाच प्रमाणपत्र देण्याची सूचना राज्य निवडणूक आयुक्‍त नीला सत्यनारायण यांनी सोमवारी (ता.21) राज्य सरकारला केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील महिला उमेदवारांची फरपट थांबेल, असा दावा त्यांनी केला आहे.

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्‍के आरक्षण दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत पहिल्यांदाच महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत; मात्र जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवताना महिला उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. जातपडताळणी समित्यांकडे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने प्रमाणपत्र मिळवताना महिला उमेदवारांची दमछाक होण्याची शक्‍यता आहे.

प्रमाणपत्रासाठी प्रत्येक व्यक्‍तीला नव्याने जातपडताळणी करावी लागते. त्यामध्ये प्रचंड वेळ जातो. अर्ज सादर करताना उमेदवाराने जातीबाबत दिलेल्या माहितीवर आक्षेप घेतले जातात. अशा आक्षेपांवरील सुनावणीतही मोठा कालापव्यय होतो. उमेदवारांची जातपडताळणी वेळेवर झाली नाही, तर निवडणूक आयोगालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकारने व्यक्तीला नव्हे, तर कुटुबांला जातपडताळणी प्रमाणपत्र द्यावे. शिधापत्रिकांच्या धर्तीवर जातपडताळणी प्रमाणपत्रावर संबंधित कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नोंद करावी. त्यामुळे कुटुंबप्रमुखाचा जातीचा दाखला त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला लागू होईल, अशी सूचना नीला सत्यनारायण यांनी केली आहे.

निवडणुकीत महिलांसाठी अशी पद्धत उपयुक्त ठरेल, असे त्यांचे मत आहे. महसूल विभागाच्या प्रधान सचिव असताना त्यांनी अशी सूचना केली होती; मात्र त्याकडे राज्य सरकारने दुर्लक्षच केले होते. आता राज्य निवडणूक आयुक्‍तपदावर कार्यरत असताना, व्यक्‍तीऐवजी कुटुंबाला जातपडताळणी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राजकीय पक्षांकडून स्वागत
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी नीला सत्यनारायण यांच्या सूचनेचे स्वागत केले आहे. अशी पद्धत अमलात आल्यास महिलांना मोठा आधार मिळेल. त्यासाठी राज्य सरकारने या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी पिचड यांनी केली आहे. या सूचनेवर तातडीने कार्यवाही करावी, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही म्हटले आहे. कुटुंबाला जातपडताळणी प्रमाणपत्र मिळाल्यास संबंधित कुटुंबातील प्रत्येक सदस्याची परवड थांबेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया
On 07/01/2012 08:47 PM vitthal gaikwad said:
वेरी वेरी गुड
On 07/01/2012 08:43 PM vitthal gaikwad said:
वेरी गुड
On 07/12/2011 04:09 PM vijay virnak said:
थोडा उशीर झाला. पण आपण कुटली ही सूचना चांगल्या कामा साटी असेल............ तर तिचे नकीच स्वागत असेल..................
On 22/11/2011 06:40 PM Shree said:
सगळे साले चोर निवडणुका आल्या म्हणून दोघेही जण त्यांच्या शी सहमत आहेत. जेव्हा त्यांनी सूचना केली होती तेंव्हा हे दोघे काय झोपले होते का? गेली १५ वर्षे ह्यांचेह राज्य आहे ना? मग आतातच अक्कल आली का?
On 22/11/2011 05:06 PM rajendra shrimant kamble said:
kutumbala jat padtalni pramanpatra milalyas sadar kutumbatil pratek sadashala tyacha nakich fayada hoel karan nokari nivadnuk &shikshanasathi honari dhavpal thambel yenarya pratek sandhila laglich fayada hoil.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: