Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

"हसण्यासाठी जगा - जगण्यासाठी हसा' रविवारी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 24, 2011 AT 02:45 AM (IST)
जळगाव - सकाळ व सातपुडा हिरो आणि हिरो मोटोकॉर्पतर्फे रविवारी (ता. 27) सायंकाळी पावणे सातला ला. ना. हायस्कूलच्या भय्यासाहेब गंधे सभागृहात हास्य योग तज्ज्ञ मकरंद टिल्लू यांचा हसण्यासाठी जगा- जगण्यासाठी हसा हा कार्यक्रम होईल.

वाढते ताणतणाव घालविण्यासाठी मन प्रसन्न असावे लागते. हाच धागा पकडून जळगावात प्रथमच श्री टिल्लू यांचा कार्यक्रम होत आहे. सर्व आजारांवर हसणे गुणकारी औषध असून जळगावकरांना या कार्यक्रमाद्वारे हास्य औषधाची मात्रा मिळेल.

वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम देण्याची परंपरा "सकाळ' ने जोपासली आहे आणि जपली देखील आहे. वाचकांना चांगले, निर्भेळ आणि दर्जेदार कार्यक्रम देण्यासाठी "सकाळ' कडून प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे वरील कार्यक्रम होय. "सकाळ' आणि "सातपुडा हिरो', "हिरो मोटोकॉर्प' यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे रविवार (ता. 27) मनमुराद हसवत ताण तणाव दूर करणारा कौटुंबिक एकपात्री प्रयोग "हसण्यासाठी जगा जगण्यासाठी हसा' चे आयोजन करण्यात आले आहे. भय्यासाहेब गंधे सभागृहात सायंकाळी पावणेसातला हा कार्यक्रम सुरू होणार आहे. आपले नैराश्‍य विसरण्यासाठी जळगावच्या रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका हातोहात संपल्या असून कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रवेश स्टेट बॅंकेकडून सु. ग. देवकर शाळेच्या प्रवेशद्वाराने असणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व रसिकांकरीता ला. ना. शाळेच्या पटांगणावर कार्यक्रम भव्य पडद्यावर पाहण्याची सोय करण्यात आली आहे.

पंधराशेवर प्रयोग
हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा हा मकरंद टिल्लू यांचा एकपात्री कार्यक्रम असून त्यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत पंधराशेवर प्रयोग केले आहेत. त्रासलेल्या मनाला आनंद देण्यासाठी मकरंद टिल्लू यांनी हास्य योगातून तणावमुक्ती या संकल्पनेवर गेली 12 वर्ष विशेष अध्ययन केले आहे. विनोदी किस्स्यांबरोबरच, रसिकांशी संवाद साधून हा कार्यक्रम फुलवण्याची विलक्षण हातोटी श्री. टिल्लू यांना लाभली आहे. श्री. टिल्लू यांनी पुण्याच्या रूबी हॉस्पिटलमधील हृदयरुग्ण, स्क्रिझोफ्रेनिया रुग्णांसाठी हास्ययोगाचे विशेष कार्यक्रम घेतले आहेत.
प्रतिक्रिया
On 24/11/2011 02:28 PM DHIRAJ KULKARNI, NAVI PETH JALGAON said:
YA PURVI TAPI SAHAKARI PATPEDHI NE MAKRAND TILLU YANCHA HAS NE SATI JAGA HA PAHILA PROGRAM JALGAON MADE KELE LA AAHE


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: