Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

कोल्हापुरात आजपासून रंगणार राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव
- सकाळ वृत्तसेवा
Friday, January 13, 2012 AT 03:15 AM (IST)
कोल्हापूर - गेला महिनाभर उत्सुकता लागून राहिलेल्या राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवाला उद्या (ता. 13) दिमाखदार प्रारंभ होत आहे. प्रायव्हेट हायस्कूल मैदानावरील कुसुमाग्रज नगरीत महोत्सवाच्या निमित्ताने सलग चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. त्याशिवाय नामांकित साहित्यिकांशी कोल्हापूरकरांना संवादही साधता येणार आहे.

उद्या सकाळी नऊ वाजता गांधी मैदान येथून ग्रंथदिंडीला प्रारंभ होईल. "एक तरी पुस्तक प्रत्येक घरी' या संकल्पनेवर आधारित विविध फलक आणि चित्ररथांचा दिंडीत समावेश असेल. हजारो शालेय विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने "वाचाल तर वाचाल', असा संदेश या ग्रंथदिंडीतून दिला जाईल. अकराच्या सुमारास कुसुमाग्रज ग्रंथ नगरीत ग्रंथ दिंडी आल्यानंतर मुख्य उद्‌घाटन सोहळा होईल. 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षस्थानी असतील.

दरम्यान, प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तरहून अधिक नामांकित प्रकाशन संस्थांचे स्टॉल महोत्सवात असून मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील सर्व प्रकारची पुस्तके येथे उपलब्ध असतील. त्याशिवाय काही प्रकाशन संस्थांनी ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.

"एनआयई', "यंग बझ'च्या सभासदांना आवाहन
"सकाळ'च्या "एनआयई' आणि "यंग बझ'च्या सभासद विद्यार्थ्यांनी महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी. त्याशिवाय विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन "सकाळ एनआयई - यंग बझ'च्या वतीने केले आहे.

महोत्सवात आज
- सकाळी नऊ वाजता - गांधी मैदान येथून ग्रंथ दिंडीला प्रारंभ
- अकरा वाजता - मुख्य उद्‌घाटन सोहळा
- दुपारी तीन ते पाच - "आम्ही असे घडलो' संवाद : सहभाग - ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, डॉ. बाबा आढाव.
- सायंकाळी सात ते नऊ - माध्यमिक शाळांतील मुलांचा कलाविष्कार
...............


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: