
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताही जातीभेद न मानता जे डोंगराएवढे काम करून ठेवले त्याची तुलना कशाशीही होणार नाही. बाबासाहेबांच्या या कार्यात त्यांना अनेकांची साथ लाभली. यापैकी संभाजी तुकाराम गायकवाड, गोविंद आदरेकर, शिवराम जाधव, गणपत महादेव जाधव, रामचंद्र बाबाजी मोरे आदी मं डळींची मोलाची साथ लाभली. बाबासाहेबांची दैनिके किंवा महाडचा सत्याग्रह या साऱ्या कामात या मंडळीचा मोठा सहभाग होता. बाबासाहेबांची चळवळ ही एका रात्रीत उभारली गेली नव्हती. त्यामागे बाबासाहेबांना दैवत मानणाऱ्या अनेक मंडळीचे कष्ट होते. बाबासाहेबांच्या चळवळींच्या पायाभरणीच्या काळाची माहिती देणारे पुस्तक भाष्य प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. "बिल्डिंग द आंबेडकर रेव्हल्यूशन : संभाजी तुकाराम गायकवाड ऍन्ड द कोकण दलित ' या गेल ओमवेट यांनी लि हिलेल्या पुस्तकात ही सर्व माहिती अत्यंत सविस्तरपणे दिली आहे. भाष्य प्रकाशनाचे संचालक महेश भारतीय मुळचे पत्रकार आणि लोकविज्ञान संघटनेचे कार्यकर्ते. मोजकी पण दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भारतीय यांनी हे पुस्तक आधी इंग्रजीत प्रकाशित केले असून आता हे पुस्तक ते मराठीत आणि हिंदीत आणणार आहेत. या पुस्तकाबरोबरच भारतीय दुसरे महत्वाचे पुस्तक लवकरच प्रसिद्ध करत आहेत ते म्हणजे रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्या लेखांच्या संग्रहाचे. प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला आहे. तीनशेपेक्षा जास्त पानांचे हे पुस्तक होईल.
"अंकुर'ची दहा पुस्तके विदर्भातील अकोला येथील अंकुर प्रकाशनाच्या वतीने दहा पुस्तके येत्या दोन महिन्यांत प्रसिद्ध केली जाणार आहेत. हिंमत शेकोकार आणि रेखा शेकोकार या दोघांकडून चालविल्या जात असलेल्या या संस्थेच्या वतीने आतापर्यंत 160 पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. गेल्या वर्षात त्यांनी 11 पुस्तके प्रकाशित केली आहेत. साहित्य चळवळ समाजात रुजावी यासाठी हे दोघे सातत्याने प्रयत्न करत असतात, यातूनच अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा जन्म झाला. अंकुर साहित्य स ंघाची त्यांनी स्थापना केली. तसेच एक वाचनालयही ते चालवतात. त्याचबरोबर साहित्य चळवळीला वाहिलेले "शब्दां कुर' हे त्रैमासिकही त्यांच्याकडून प्रसिद्ध केले जाते. आता त्यां नी अंकुर संमेलनाच्या निमित्ताने एकूण 50 पुस्तके प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. त्यांपैकी दहा पुस्तकांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये "संत रविदास- समाजचिंतन' यासारखे पुस्तक आहे. हिंमत शेकोकार यांनीच ते लिहिले आहे. याचबरोबर चार काव्यसंग्रहांचाही या संचात समावेश आहे. याच संचात हुतात्मा बाबू गेनू यांचे चरित्रही प्रकाशित केले जाणार आहे.
"स्नेहल'ची आठ पुस्तके पर्यटन विषयावर सातत्याने विविध पुस्तके प्रकाशित करणाऱ्या पुण्यातील स्नेहल प्रकाशन या संस्थेच्या वतीने आठ पुस्तकांचा संच येत्या दोन महिन्यांत प्रसिद्ध केला जाणार आहे. यातील डॉ. जगदीश करमळकर यांचे "रंग माझा वेगळा' हे पुस्तक नावाप्र माणेच वेगळी माहिती वाचकांसमोर घेऊन येणार आहे. या पुस्तकात 40 अशा डॉक्टरांची माहिती असणार आहे, की वै द्यकीय व्यवसाय सांभाळून त्यांनी कला, साहित्य, संगीत आदी क्षेत्रांत विशेष कामगिरी बजावली आहे. नाशिक जिल्ह्यातील 80 किल्ल्यांची माहिती देणारे "साद नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची' हे अमित बोरिले यांनी लिहिलेले पुस्तकही या सं चात आहे. "वेडात दौडले वीर मराठे सात...' या काव्यपंक्तींनी सर्व मराठी माणसांच्या मनात घर करून राहिलेले सेनापती प्रतापराव गुजर यांच्याबद्दल सविस्तर माहिती देणारे चरित्र महेश तेंडूलकर यांनी लिहिले आहे. त्याचाही या संचात समावेश आहे. यंदाचे वर्ष गणित वर्ष म्हणून साजरे होत आहे, ते लक्षात घेऊन "भास्कराचार्य ते गॉस- गणिताचाच ध्यास' हे सुधा रिसबूड यांचे पुस्तक त्याचबरोबर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर "गाजलेले सा हित्य संमेलनाध्यक्ष' हे श्याम भुर्के यांचे पुस्तक याचाही यामध्ये समावेश आहे.
साहित्यिक दिनदर्शिका जानेवारी महिन्यात रोजनिशी दिनदर्शिका यांची खरेदी आवर्जून केली जाते. हे लक्षात घेऊन गेली दहा वर्षे साहित्यिकांना दिनद र्शिकेवर स्थान देऊन "गमभन' प्रकाशन साहित्यिकांची दिनद र्शिका प्रकाशित करत असते. या वर्षी त्यात भर पडली आहे ती "सहित'च्या कवयित्रींच्या दिनदर्शिकेची. पुण्यातील किशोर शिंदे यांच्या "सहित' प्रकाशनाच्या वतीने ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कवितेपासून ते आताच्या जमान्यातील कवयित्रींना यात स्थान देण्यात आले आहे. "गमभन'च्या दिनदर्शिकेत साहित्यिकांचा फोटो व त्यांची नेमकी माहिती मागील पानावर, अशी रचना असते. या वेळच्या दिनदर्शिकेत दिवंगत लोकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवळकर यांना स्थान मिळाले आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार ल. म. कडू आ णि त्यांचा मुलगा जयदीप या दिनदर्शिकेसाठी मेहनत घेत असतात.
उद्योजक मोतेवार यांचे चरित्र मराठी माणूस उद्योगात कमी असतो. उद्योग-व्यवसाय मराठी माणसांसाठी नाहीच, अशी एक ठाम समजूत असते. मात्र, आता हा समज हळूहळू दूर होऊ लागला आहे. उद्योजकांची आत्मच रित्रे, चरित्रे आता प्रसिद्ध होऊ लागलेली आहेत. पुण्यातील प्र सिद्ध उद्योजक महेश मोतेवार यांचे चरित्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सामाजिक बांधिलकी, जात तसेच वेगवेगळ्या उद्योगाचा विस्तार केवळ राज्यातच नाही, तर महाराष्ट्राबरोबरच अन्य सात राज्यांत केला आहे.
मोतेवारांची ही वाटचाल या चरित्रात असेल. पुण्यातील सक्सेस कम्युनिकेशन या संस्थेच्या वतीने हे चरित्र प्रकाशित केले जाणार आहे. मराठी माणसेही उद्योगात कशी यशस्वी होत आहेत, त्याची माहिती अशा चरित्रांमधून समजते. गेल्या वर्षभरात उद्योगांचे आणि उद्योगपतींची यशोगाथा सांगणारी पं चवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
'फेसबुक'वरील सप्तरंगच्या पेजला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.