Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

उत्तम कांबळे यांच्या पुस्तकाचे नारायणगावात उद्या प्रकाशन
-
Saturday, January 21, 2012 AT 03:30 AM (IST)
नारायणगाव - 'सकाळ' माध्यम समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांच्या साहित्यिक व सामाजिक जीवनाचा प्रवास यावर आधारित "अस्वस्थ नायकाचे अंतरंग' या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते रविवारी (ता. 22) होणार आहे. नारायणगाव येथील जयहिंद मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती लोकसंस्कृती विकास संशोधन व संवर्धन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कसबे यांनी दिली. ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एच. सी. शहा अध्यक्षस्थानी असणार आहेत. या वेळी उत्तम कांबळे, अरविंद पाटकर, प्राचार्य सरोज जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: