Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

"कोण काय करतंय, हेच कळत नव्हते..!'
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 03:00 AM (IST)
सातारा - "गाडी नोंदवली आणि लघुशंकेला जाण्यासाठी वळलो. काही पावले पुढे गेल्यावर समोर माझीच एसटी बस जाताना दिसली. गाडीच्या मागे पळालो; पण थांबवता आली नाही. कोण काय करतंय हेच कळत नव्हते...' सातारा-पुणे विनाथांबा गाडी घेऊन स्वारगेटला गेलेले चालक संतोष जनार्दन हेंद्रे (वय 38, सातारा) हतबल होऊन सांगत होते.

पुण्यात माथेफिरू एसटी चालकाने नऊ जणांचे बळी घेतले. त्याचे नाव संतोष मारुती माने. त्याने जी एसटी बस पळवली, तिच्या चालकाचेही नाव "संतोष'च आहे. सातारा आगाराच्या या एसटीचालकाने आज सकाळी स्वारगेटवर घडलेल्या प्रकाराची "सकाळ'ला माहिती दिली.

त्यांनी सांगितले, ""सकाळी सहा वाजता साताऱ्यातून सुटणारी सातारा-स्वारगेट विनाथांबा गाडी (एमएच 14 बीटी 1532) घेऊन आठ वाजण्याच्या सुमारास स्वारगेटला पोचलो. माझ्यासमोर प्लॅटफॉर्मवर दुसरी गाडी उभी होती. त्यामध्ये प्रवासी बसत होते. त्यामुळे मी गाडी मागेच उभी केली. माझ्या गाडीतील सर्व प्रवासी उतरून गेले. प्रवासी दार लॉक केले. गाडीचे हॅंडब्रेक लावले आणि चावी काढून घेतली. खाली उतरून केबिनमध्ये "पहिली गाडी सुटली की माझ्या गाडीचे बुकिंग सुरू करा,' असे सांगितले. मग लघुशंकेसाठी निघालो. काही पावले पुढे गेल्यानंतर माझीच गाडी धावताना दिसली. प्रथम कोण काय करतंय कळलेच नाही. जीवाच्या आकांताने "धरा...धरा...' असे ओरडत गाडीच्या मागे पळत सुटलो. माझ्याबरोबर काही हमालही गाडी थांबविण्यासाठी पळत होते. चालकाने गाडी आगाराबाहेर काढली तेच दोघा-चौघांना ठोकर देत. नंतर परत दुसऱ्या गेटने गाडी आत घेतली. पुन्हा "आउट गेट'मधून बाहेर काढून सेव्हन लव चौकाकडे वळविली.''

""काय करावे काही सुचेना म्हणून साताऱ्याला एसटीचे अधिकारी शेखर चव्हाण यांना फोन करून घटना सांगितली. त्यांनी जवळच्या पोलिस चौकीत तक्रार करायला सांगितले. त्यानुसार सिग्नलजवळील पोलिस चौकीत जाऊन घटनेची वर्दी दिली,'' असेही हेंद्रे यांनी सांगितले.

हेंद्रे हे 2005 मध्ये चालक म्हणून भरती झाले. ते मूळचे बेलसर (जेजुरी) येथील आहेत. त्यांची पत्नी सातारा पोलिस मुख्यालयात पोलिस शिपाई आहे. दोघेही मल्हार पेठेत मुख्यालयाच्या कर्मचारी वसाहतीत राहतात.
प्रतिक्रिया
On 27/01/2012 09:43 PM sagar khot said:
झालेली घटना भयंकर आहे पण संतोष मानेने हे जाणूनबुजून केले नाही असे मला वाटते.त्याच्यावर इलाज झाला पाहिजे
On 27-01-2012 08:30 PM kdchitnis said:
एकूण प्रकार"संतोषजनकच" तर!पुणे सुरक्षित आहे काय?पुणे माथेफिरुंचे शहर आहे काय?पुण्याचा तुलनेत 100 पट मोठे असलेल्या मुंबईत असा एकही प्रकार का घडत नाही?पुण्यात पीएमटी ड्रायव्हर,दुचाकीस्वार,रिक्षावाले हे "संतोष मानेच"आहेत!वेडेवाकडे चालवण्यावरून त्यांना हटकून पहा!त्यांचा अविर्भाव,भाषा आणि प्रतिसाद "संतोष मानेला"लाजवणारा असतो!असे पुण्याचे लोक का वागतात याचा समाजशास्त्रद्यांनी शोध घ्यावा.तुच्छ्हतापूर्ण,तुसडे संवाद हे पुण्याच्या लोकांचे व्ययच्छेदक लक्षण का असावे?याची पाळेमुळे इतिहासात तर नाहीत ना?
On 27/01/2012 12:29 PM ashish alase said:
जोपर्यंत आपल्या लोकांची मानसिकता बदलत नाही तोवर याच नवे तर सगळ्याच बाबतीत काही न काही प्रोब्लेम्स निर्माण होत राहणार कारण जीवन खूप गतिमान झाले असून ताणताणाव आणि असुरक्षितता वाढले आहेत.
On 27/01/2012 11:26 AM madhav tilgulkar said:
माने ची मेडिकल करा, सर्वे चालकाची मेडिकल होणे खूप गरजेचे आहे, चावी नसताना माने ने गाडी कशी चालू केली? ह्याचा तपास होणे जरुरी आहे
On 27/01/2012 09:42 AM mandar said:
स्वारगेट चौकात त्याच बसखाली चिरडून मारा ह्या संतोष मानेला
On 26/01/2012 09:40 PM MOHAN PRABHALE said:
मानेला बुटाने मारा हरामखोराला
On 26/01/2012 09:12 PM som said:
भयंकर आहे सर्व.....
On 26/01/2012 02:45 PM sandesh chavan said:
आत्ता अशेच पाच पन्नास आणखी तयार झाले तर, यापुढे पाकिस्तानला त्यांच्याकडची ट्रेनिंग बंद करावी लागेल, कारण आमचे घरचेच कासाबाच्या बरोबरीचे होतील व बिना एके ४७ ने लोकांना मारतील.
On 26/01/2012 04:44 AM Prakash said:
आपल्या देश्यात्ला १०० नंबर कश्यासाठी आहे आणि तो नंबर फोनवर लावल्यावर त्याचा काय,कितीवेलानंतर,आणि कसा परिणाम होतो याच आता शिक्षण शाळेतून द्याव!!!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: