Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

...अन्‌ त्यांचे प्राण वाचले!
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:45 AM (IST)
पुणे - स्वारगेट बसस्थानकावर एसटीने एकाचा बळी घेत आणखी दोघांना चिरडल्यानंतर तेथे गदारोळ होत असतानाच दोन मिनिटांत ती गाडी पुन्हा बसस्थानकाच्या आवारात शिरली. तिच्या चाकाखाली सापडलेल्या महिलेची किंकाळी ऐकून त्यापुढेच असलेल्या गाडीतून उतरणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने तीन-चार प्रवाशांचे प्राण बचावले. बस आगाराच्या कार्यशाळेतील त्या कर्मचाऱ्याचे नाव अनिल गायकवाड. मावडी-पिंपरी गावाहून ते स्वारगेटला आले. प्रवेशद्वाराजवळ गाडीतून त्यांच्यापाठोपाठ तिघे-चौघे उतरत होते. मागून भरधाव येणाऱ्या गाडीच्या चाकाखाली सापडलेल्या महिलेची किंकाळी ऐकताच गायकवाड गाडीच्या पुढील बाजूला धावले. मागून आलेली गाडी त्यांच्या गाडीपासून वेगाने पुढे गेली. त्यांच्या गाडीतील प्रवासी उतरले असते, तर ते त्या गाडीच्या चाकाखाली सापडले असते. गायकवाड यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाची माहिती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितली. 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: