Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

"एक्‍स्लुझिव्ह फोटो'चा विचार सोडला अन्‌...
विश्‍वजित पवार
Thursday, January 26, 2012 AT 02:45 AM (IST)
एखाद्या घटनेचे छायाचित्र केवळ आपल्यालाच मिळावे, यासाठी वृत्तपत्रीय छायाचित्रकार आटापिटा करीत असतात; मग ते छायाचित्र एखाद्या अभिनेत्याचे असो वा दुर्दैवी अपघाताचे. मीही त्यांच्यापैकीच एक. बुधवारी मात्र एसटीच्या बेभान चालकाकडून मृत्यूचे तांडव होत असल्याचे समोर दिसत असूनही माझा हात बॅगेतल्या कॅमेऱ्याकडे गेला नाही... खास छायाचित्र काही मिळाले नाही, कारण माझ्यातील माणुसकीने छायाचित्रकारावर मात केली...!

एका कार्यक्रमाचे छायाचित्र घेण्यासाठी आज सकाळी सारसबागेत गेलो. परतताना एका वाचकाचा फोन आला, "स्वारगेटला एका महिलेला एसटीने उडवले आहे. चालक एसटी घेऊन पळून गेला आहे.' मी तडक निघालो. स्वारगेटला एका नागरिकाने सांगितले, की पोलिस एसटीच्या मागावर असून ती बस हॉटेल सेव्हन लव्हजजवळील ढोले पाटील चौकातून डायस प्लॉटकडे गेली आहे. मी मुकंदनगरचा मार्ग पकडला. समोरून अचानक बेफाम जाणारी एसटी दिसली. मागे पाठलाग करणारे दुचाकीवरील पोलिस. मीदेखील पाठलाग करू लागलो. एसटीचालक दिसेल त्या व्यक्‍ती-वाहनांना ठोकरत चालला होता. छायाचित्रांचा विचार सोडून चालकाला पकडण्याचे ठरविले. एव्हाना एसटीने मित्रमंडळ चौकातील दुचाकीवरील तरुणाला धडक दिली होती. त्या जखमी तरुणाला उचलावे की बसचालकाला पकडावे, अशी द्विधा मनःस्थिती झाली. शेवटी चालकाला पकडायचे ठरविले. पाठलाग करणारा प्रत्येक जण चालकाला पकडण्यासाठी एसटीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. एक पोलिस कर्मचारी एसटीच्या टपावर चढून जीव धोक्‍यात घालत चालकाला रोखू पाहत होता.

एसटीचालक प्रवेशबंदी असलेल्या मार्गाने सारसबागेजवळून सिंहगड रस्त्याला लागला. तेथे दोन मोटारींना समोरून धडक बसल्याने एसटी पुढे जाऊ शकली नाही. तिथे गोळा झालेल्या तरुणांनी चालकाला खाली खेचले. पाठलाग करणारे पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी चालकाला ताब्यात घेतले आणि मग पुन्हा जागा झाला माझ्यातील छायाचित्रकार...!
प्रतिक्रिया
On 26-01-2012 03:33 PM swaraj said:
नाही पटत.ज्या पद्धतीने आजकाल जीवघेण्या बातमीचे प्रदर्शन channel वाले आणि पत्रकार करत आहेत ते पाहून असे वाटते कि हि लोक फक्त TRP करता काम करतात.ह्यांचातली माणुसकी खरोखरच संपली आहे.ज्या माणसांवर असा प्रसंग ओढवला त्याचा बाजार मांडून त्याला मनस्ताप देणे आणि वाट्टेल ते प्रश्न विचारून त्याला हैराण करणे हाच तुमचा धंदा आहे.त्यामुळे तुम्ही लोक माणुसकीच्या गप्पा अजिबात मारू नका.
On 26-01-2012 09:41 AM Manus said:
विश्वजीत राव तुमाचातील छायाचित्रकाराच तुम्हाला त्या माणसाचा पाठलाग करण्यास भाग पडला. जर तुमच्या मध्ये माणुसकी असती तर तुम्ही त्या दुचाकी वरून अपघात झालेल्या मुलाला वाचवले असते. तसेही पोलीस आणि इतर लोक त्या बस चा पाठलाग करत होतेच.
On 26/01/2012 07:46 AM prashant rale said:
पवार बस झाली तुमची लाल मोठा झेंडा फडकवला तुम्ही !!!! exclusive झेंडा !!!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: