Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांना परमविशिष्ट सेवा पदक
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 12:30 AM (IST)
Tags: republic day,   medal,   pune
पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेनादलातील शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पुण्यातील दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांना परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे, तर लडाख येथील लष्कराच्या 14 तुकडीचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख कमांडंट लेफ्टनंट जनरल जतिंदर सिंग यांना दुसऱ्यांदा अतिविशिष्ट सेवापदक मिळाले आहे.

पुरस्कारांमधील मराठा लाइट इन्फन्ट्रीचे काही अधिकारी, तसेच इतर मराठा अधिकारी पुढीलप्रमाणे - अशोक चक्र - लेफ्टनंट नवदीप सिंग - मराठा लाइट इन्फ्रंट्री (मरणोत्तर), अति विशिष्ट सेवा पदक - मेजर जनरल रवींद्र वसंतराव थोडगे - इन्फ्रंट्री, शौर्य चक्र - शंकर गणपती मेंगरे - मराठा लाइट इन्फ्रंट्री, सेना पदक - मेजर बॉबी जसरोटिया - मराठा लाइट इन्फ्रंट्री, सेना पदक - मेजर समीर पुरुषोत्तम संखे - एएडी, सेना पदक - लेफ्टनंट हृषीकेश चंद्रकांत कुलकर्णी- राजपुताना रायफल्स, सेना पदक - सुभेदार सुभाष दत्तात्रेय इंगळे - मराठा लाइट इन्फ्रंट्री, सेना पदक - एचएव्ही बापू भागोजी झोरे, मराठा लाइट इन्फ्रंट्री, सेना पदक - कर्नल प्रशांत चव्हाण, मराठा लाइट इन्फ्रंट्री, विशिष्ट सेवा पदक - ब्रिगेडियर अविनाश लक्ष्मण चव्हाण - गोरखा रायफल्स, विशिष्ट सेवा पदक - ब्रिगेडियर सुनील दत्तात्रेय वझे - मराठा लाइट इन्फ्रंट्री, विशिष्ट सेवा पदक - कर्नल रवी आर. पाटील - आर्टिलरी, विशिष्ट सेवा पदक - कर्नल धनंजय जोशी - गढवाल रायफल्स, विशिष्ट सेवा पदक - गिरीश उपाध्याय - मराठा लाइट इन्फ्रंट्री.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: