Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

संतोष मानेने घातला रक्ताचा सडा
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:45 AM (IST)
पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनासाठी शहरात सडा-रांगोळ्यांची तयारी चालली असतानाच संतोष मानेने शहरात रक्ताचा सडा घालत आठ जणांचे आयुष्य संपविले. एरवी चौकाचौकांत "वाहतूक नियमन' करणारे पोलिस या "काळा'च्या सैतानी कृत्याला का रोखू शकले नाहीत, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. स्वारगेट एसटी स्थानकातून निघाल्यानंतर पूलगेट, रामोशी गेट, सेव्हन लव्ह्‌ज चौक, मुकुंदनगर, लक्ष्मीनारायण चौक, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक ते सारसबागेजवळील समाधान भेळ इथपर्यंत एकेका नागरिकाचा जीव घेत निघालेल्या मानेने सुमारे दहा ते पंधरा किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर कापले. स्वारगेट चौकात एका तरुणाने या माथेफिरूला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही.

जयपूरहून पुण्यातील नातेवाईक अभिचलकुमार यांच्याकडे पहिल्यांदाच सुटी घालविण्यासाठी आलेल्या राजन शुक्‍ला (वय 24) याला शहरात पाय ठेवताक्षणीच अपघाताला सामोरे जावे लागले. सकाळी सव्वासात वाजता पटना-पूना एक्‍स्प्रेसने रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर राजन व अभिचलकुमार दुचाकीवरून स्वारगेटमार्गे सिंहगड रस्त्याकडे निघाले होते. रस्त्यात व्हेगा सेंटरसमारे मानेने एका चारचाकी गाडीला ठोकर दिली; ती गाडी अभिचलकुमारच्या दुचाकीला धडकल्यामुळे दोघांनाही जबर मार लागला. या दुर्घटनेतून ते दोघेही बचावले.
प्रतिक्रिया
On 27/01/2012 04:57 PM vansh said:
not activate wireless devices and fast coummnications ,so pl update
On 27/01/2012 01:21 PM dgp said:
And punishment to this Mane will be to put behind the bars and for lunch musta biryani etc. He will then lead life safe and happily. He should have killed then and there only...
On 27/01/2012 01:20 PM Aniruddha said:
त्याला अटक केलीच का? जागेवरच का नाही मारून टाकले त्याला. कसली करता समिती मार्फत चौकशी. त्याला काय चार पाच वर्ष पाहुणचार द्यायचं का? महापालिका निवडणुकीत त्याची शिक्षा व त्यांनी केलेल्या कृत्याचा विसर पडू देऊ नका. आठ वेळा फाशी द्या त्याला नराधमाला ती पण लवकरात लवकर.............................
On 27/01/2012 11:00 AM Amar Pune said:
आता तपास कसला करताय सर्वांच्या डोळ्या देखत ह्या नराधमाने गुन्हा केला आहे सामोर्ण येणाऱ्या एकाद्या भरदाव गाडी समोर त्याला उभे करा आणि भोगून द्या त्याला हि त्याच वेदना तरच त्या निष्पाप बळी गेलेल्या लोकांच्या आत्म्याला कदाचित शांती मिळेल माने चा अफझल गुरु किंवा कसाब होऊन देऊ नका
On 27/01/2012 09:49 AM amol said:
पोलिसाला शिव्या देण्याआधी हा विचार करा कि पोलीस पण मानव आहेत. आणि वेगाने येणारी एवढी मोठी गाडी कुणीच माणूस वाचवू शकत नाही. पोलिसांनी पण प्रयत्न केला पण मोठी बस एकट्याने थांबवणे शक्य आहे का याचा विचार न करता पोलिसांना शिव्या देणे मूर्खपणाचे लक्षण आहे. नाहीतरी आपल्या इथे वाचाळ मूर्खांचे मोठे पीक आले आहे. विचार न करता बडबड नुसती
On 27/01/2012 01:34 AM Amol said:
भारतातले पोलीस म्हणजे फक्त बुजगावणी आहेत... त्यांना हप्ते घ्यायला फक्त येते बाकी कुणाला वाचवणे वगैरे त्यांची कामे नाहीत.
On 26/01/2012 08:41 PM manik walekar said:
यापुढे असेच viprit घडणार आहे .कारण परिस्थितीच तशी आहे.राजकारणी कोटींनी कमवीत आहेत मग पोलीसही तेच करीत आहेत.सर्व सामान्ण्याचा कोणी वाली नाही .त्यांनी असेच मरायचे का?सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा कधीच वाजले आहेत.
On 26-01-2012 04:17 PM abhijit said:
आजचा सकाळ वाचू नाही असे वाटले. कारण काळ जे काही घडले ते ऐकण्या पलीकडचे होते, कदाचित बाघानाराचा जीवच जाणार. अशा माणसाला खरच शिक्षा hi व्हायलाच पाहिजे. तसेच माननीय पोलीस आयुक्तांनी जर फोन वरून त्या चालकाला गोळी घालण्याची अज्ञ केली असती तर किती बरे झाले असते... पण आपली कडे चोरी झाली कि पोलीस, दरोडा पडला कि मग क्धाणारे, आणि barech काही घडते. .......... खरच बातमी वाचून डोळे रडायला लागले आणि मन स्तब्ध न सुन्न झाले...roj apaghat ghadtat , पण काळ जघडले ते हत्याकांड होते आणि ते हि निरपराध सामन्यांचे....h


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: