Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

नगरमधील व्यावसायिकाचा पुण्यातील घटनेत मृत्यू
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 03:00 AM (IST)
नगर - पुणे येथे माथेफिरू चालकाने एसटी बसखाली चिरडून नऊ जणांचा बळी घेतला, त्यात नगरमधील व्यावसायिक पिंकेश लालचंद खंडेलवाल (वय 35, रा. कापडबाजार, नगर, सध्या रा. पुणे) यांचाही मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा ऋषिक (वय 8) जखमी असून, मेंदू व स्वादुपिंडाला जखमा झाल्या आहेत. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत ऋषिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली होती; पण रक्तदाब वाढल्यामुळे स्वादुपिंडावरील जखमांवर उपचार करण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणी येत होत्या.

पिंकेश खंडेलवाल यांच्याकडे मोबाईलची एजन्सी होती. पिंकेश व्यवसायानिमित्त अलीकडेच पुण्याला स्थायिक झाले होते. सकाळी ते मुलाला शाळेत सोडविण्यासाठी मोटरसायकलवरून चालले होते, तेव्हा बसने त्यांना चिरडले. पिंकेश यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ, असा परिवार आहे. पिंकेश यांचे वडील लालचंद, मोठे बंधू राकेश व गणेश हे नगरला आर्यनिवास लॉज व जुन्या कापडबाजारातील मोहनलाल मिठाईवाला या फर्मचे चालक आहेत. पिंकेश यांचे पार्थिव संध्याकाळी उशिरा येथे आणण्यात आले. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रतिक्रिया
On 27/01/2012 01:50 AM sharad said:
गोरव,पण जसे १ लाख रुपये ची मदत घेवून बाप परत मिळणार नाही, तसेच संतोष मानेला शिक्षा होवून देखील बाप परत मिळणार नाही.म्हणून, १ लाख ऐवजी ५० लाख रुपयांची मागणी सरकारला केली पाहिजे.आजकाल सर्वत्र पैशाला महत्व आहे.
On 26/01/2012 01:31 PM Gaurav said:
१ लाख रुपयाची मदत...देईल का बाप परत मिळवून त्या मुलाला? संतोष माने ला शिक्षा झालीच पाहिजे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: