Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

मानेने बदलीसाठी हे कृत्य केल्याचा एसटीचा इन्कार
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:45 AM (IST)
पुणे - बदलीसाठी संतोष मानेने हे कृत्य केल्याचा "एसटी'ने इन्कार केला आहे. ""माने याच्या गेल्या अकरा वर्षांच्या सेवेच्या रेकॉर्डमध्ये त्याने 180 दिवस रजा घेतली आहे; परंतु यापैकी एकही दिवस त्याने आजारपणाची रजा घेतली नाही अथवा बदलीची मागणी केली नाही. केवळ वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे गतवर्षी त्याने पंधरा दिवस रजा घेतली होती. तसेच आजपर्यंत त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला असल्याचे निदर्शनास आले नाही; परंतु आता तो काय बोलत आहे हे त्याचे त्यालाच समजत नाही,'' असे एसटीच्या स्वारगेट विभागाचे वरिष्ठ आगारव्यवस्थापक विजय दिवटे यांनी सांगितले.

माने याने मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता गाणगापूरची ड्यूटी केल्यानंतर सुट्टी झाली होती. आज सकाळी (बुधवारी) दहा वाजता पुणे ते वांद्रेवडूस्पेची ड्यूटी लावण्यात आली होती. तसेच आंधळे येथे त्याचा रात्रीचा मुक्काम होता; परंतु त्याने असे का केले, याबाबत काहीही सांगत येत नसल्याचे दिवटे यांनी सांगितले.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये एसटीतर्फे देण्यात येत असल्याचे दिवटे यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांना मृत आणि जखमींना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत.
प्रतिक्रिया
On 28/01/2012 10:24 AM Satish said:
very shameful incident by Santosh Mane. He is a very dangerous man and any society will not ready to accept this kind of incident from any human being ( could be marathi, non marathi, any cast, any religion). To mitigate this kind of problems in future goverment should take immediate action to research the root cause of his mentality and punish (hung till death) anyone and everyone involved in this incident. your's, one common man from swargate road.
On 27/01/2012 06:51 PM mahesh said:
सगळी कॉंग्रेस च राजं आहे, म्हणून तर हे सर्व चालल आहे.निशकाळजी पणा बाकी काय नाही,पुण्या च्या एसटी ला चावीच नाही ,तर बटन आहे तर सांगा कुणीपण कधी पण एसटीपळवेल ना? मराठी माणूस ह्य साठी च बनले ना, फक्त झीझान्या साठी ..........................................आता तरी जागे व्हा ........
On 27/01/2012 05:22 AM sandips Bhau Sasane said:
शिवराज, मग तूच घे जबाबदारी. आणि उचल मराठी पावुल. ये आवाज कुणाचा...
On 27/01/2012 12:06 AM Irfan Shaikh said:
बेफामपणे गाडी चालवत असलेला ड्रायव्हर, साक्षात् मृत्यू बनलेली एसटी, गाडीच्या मागेपुढे सैरावैरा पळणारे लोक आणि रक्तबंबाळ जीव... असे थैमान माजवत निघालेल्या संतोष मानेला अखेर एका विद्यार्थ्याने 'बेक' लावला. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एसटीचा पाठलाग करून आणि त्यात चढून मानेला रोखणाऱ्या शरीफ कुट्टीमुळे बुधवारच्या 'रोड रेज'मधील आणखी हानी टळली. कुट्टी हा पुना कॉलेजमध्ये बीसीए करतो. 'बुधवारी सकाळी पल्सर गाडीवरून कॉलेजला निघालो होतो. पुलगेट येथे तेव्हा गाड्या चिरडत उडवत भरधाव निघालेली ती एसटी दिसली. ति
On 26/01/2012 10:37 PM sam said:
आपण अजून कसब ला पोचतो आहे तर बाकी गुनेगारांना पण आयुष्यभर पोहचू त्यात काय नवीन. सामान्य माणूस त्यासाठीच तर कर भरतो. अगदी लाज्यास्पद गोष्ट आहे
On 26/01/2012 08:20 PM reader said:
ST ला लाज वाटली पाहिजे. अकरा वर्षे काम करण्या माणसाला अचानक काय होते आणि तो इतक्या लोकांचा बळी घेतो ह्याची जबाबदारी ST च्या अधिकाऱ्यांवर आहे. उद्या दुसरा कोणी माथेफिरू येऊन ST चालवून शहरात धुमाकूळ घालेल.तुमचा कर्मचारी असा करत होता तर आम्हाला माहित नाही हे निर्लज्ज उत्तर आहे.पुणेकरांनी ह्याचा जाब घेतला नाही तर परत परत अशा घटना होतील. माणसाच्या आयुष्याची किंमत केलीच पाहिजे. आपला माणूस नवता म्हणून ४ दिवस गप्पा मारून लोकांनी विसरता कामा नये.
On 26/01/2012 06:17 PM sandeep yelwande said:
from last more that last 10 years pune municpal administration is doing injustice with me i had written to everybody including chif minister/governer minister all the pmc administration but still i am waiting for justice. these plolitician people comes to us in only election period and the scandle happens like this to show the people that how much they are caring for the citizens. but when somebody is realy asking for help from them they dont gives theire time as they are bussy in money making
On 26/01/2012 04:19 PM shivraj said:
|पुणे तिथे कुणाशी काय घेणे ". हे असेच चालणार पुण्यात . पुण्याची काळजी घेणारा मराठी कारभारीच नाही .पुण्यात महापौर जर पंजाबी आहेत तर बाकी जिल्हा पातळीवर पुण्याची काळजी करणार नक्कीच मराठी नसेल .पुण्याला मराठी वाली राहिला नाही . हि शरमेची बाब पुण्याच्या ब्राम्हनीय मराठी लोकांसाठी . आज पुण्यात एह्वढी वाईट घटना घडली कि जगात न्युज गेली सिस्टम च्या बाबतीत. maharastrachi शहरे अशीच बदनाम होणार का, अपघात ,घोटाळा ,बलात्कार ,प्रतिष्ठ लोकांचे sex राकेट, अजूनही काही, का होते असे!! का कुणी जवाबदारी घेत नाही.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: