Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

... आणि त्यांना काळानेच गाठले
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 03:00 AM (IST)
पुणे - कोणी नोकरीसाठी, तर कोणी महाविद्यालयात जाण्यासाठी बुधवारी सकाळी घराबाहेर पडले; परंतु बेभान एसटीचालकाच्या रूपाने त्यांच्यावर काळानेच झडप घातली. मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक दुर्दैवी जीवाची कहाणी वाचताना हृदय पिळवटते..

अखेरचे कुरिअर
माळशिरसमधील धर्मपुरीचे अंकुश तिकोणे हे पुण्यातील कुरिअर कंपनीत नोकरीला. सकाळी ते अकलूजला जाणाऱ्या एसटीत बसलेही होते. बस सुटण्याआधी लघुशंकेसाठी उतरले आणि त्यांचा बळी गेला. त्यांची मुलगी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत आठवीत शिकते. वडिलांचा गावाकडे अपघात झाल्याचे सांगून शिक्षकांनी तिला गावी नेले.

बहिणीच्या साखरपुड्यासाठी ...
शुभांगी मोरे आपल्या दोन बहिणींच्या साखरपुड्यासाठी कोकणातील पोलादपूर येथे जाण्यासाठी पतीसह स्वारगेट स्थानकावर आल्या होत्या. त्यांना श्रावणी (वय 11) व स्वरूपा (वय 8) या मुली आहेत. मुलींना घरी आजीजवळ ठेवून ते दोघे साखरपुड्यासाठी चालले होते. उद्या (गुरुवारी) त्यांच्या बहिणीचा साखरपुडा होता. या दोन चिमुकल्यांनी आईसाठी फोडलेला हंबरडा काळीज सुन्न करत होता. त्यांचे पती सूर्यकांत अपघातात किरकोळ जखमी झाले.

स्फोटातून बचावले; पण ...
मिलिंद गायकवाड हे "ओ' हॉटेलचे व्यवस्थापक. स्वारगेट परिसरात झालेल्या अपघाताची बातमी रेडिओवर ऐकून त्यांच्या पत्नीने मोबाईलवर संपर्क साधत त्याची माहिती देत सावधगिरी बाळगण्यास सांगितले. रिक्षात असलेल्या गायकवाड यांनी आपण अन्य मार्गाने जात आहोत, असे सांगत स्वारगेटला रिक्षा सोडली. तेथे रस्ता ओलांडत असताना एसटीखाली त्यांचा मृत्यू. त्यांच्यामागे एक मुलगी आहे. जर्मन बेकरी बॉंबस्फोटातून ते बचावले होते.

मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाताना...
पिंकेश खंडेलवाल हे आपला मुलगा ऋषीला (वय 10) दुचाकीवरून शाळेत सोडण्यासाठी चालले होते. एसटीच्या धडकेत ते जागीच ठार झाले, तर ऋषी याच्या डोक्‍याला मार लागला असून ससून रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ऋषी जे. एन. पेटिट शाळेचा विद्यार्थी आहे. खंडेलवाल मूळचे नगरचे असून, पिंकेश यांचे पार्थिव तेथे नेण्यात आले. मुक्तांगण शाळेसमोर खंडेलवाल यांचे मोबाईलचे तर नगरला त्यांचे मिठाईचे दुकान आहे.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे.

गरोदरपणाच्या चाचणीसाठी जाताना ...
श्‍वेता ओसवाल गरोदरपणाच्या चाचणीसाठी दुचाकीवरून डेक्कन येथील डॉक्‍टरकडे चालल्या होत्या. सेव्हन लव्हज हॉटेलजवळील ढोले-पाटील चौकात त्यांना एसटीने उडविले. दुपारपर्यंत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. चार वर्षांपूर्वी त्यांचा धवल यांच्याशी विवाह झाला होता. शंकरशेठ रस्त्यावरील कल्याण सोसायटीत त्या राहत होत्या. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.

नातेवाईकांना निरोप; पण ...
व्यवसायासाठी उत्तर प्रदेश सोडून पुण्यात आलेला रामललीत शुक्‍ला नातेवाइकांना रेल्वेमध्ये बसवून ते परत पुलगेट येथे आले होते. त्याच वेळी भरधाव वेगाने एसटी चालवत आलेल्या माने यांनी त्यांना धडक दिली. शुक्‍ला हे पुण्यात गेल्या सहा वर्षांपासून भावाला स्टीलच्या व्यवसायात मदत करत होते. त्यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या मित्र परिवाराने माने यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी करत ससून रुग्णालय परिसरात "रास्ता रोको'चा प्रयत्न केला. त्यात इतर मृतांचे नातेवाईकही सहभागी झाले.

अधुरे राहिले स्वप्न...
भारती विद्यापीठात दंतवैद्यक शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या पूजा पाटील वडिलांसोबत गाडीवर निघाली होती. पुलगेटला मैत्रीण भेटल्यावर ती तिच्या गाडीवर बसली. अपघातात तिची मैत्रीण थोडक्‍यात बचावली. पूजाला ठोकरून पुढे आलेल्या एसटीने तिच्या वडिलांनाही उडविले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ते आरटीओ एजंट आणि फटाके व्यावसायिक आहेत.

महाविद्यालयात पोचलाच नाही...
अक्षय पिसे हा पुणे विद्यार्थी गृहाच्या "कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड टेक्‍नॉलॉजी' महाविद्यालयात "इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍन्ड टेलिकम्युनिकेशन'च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. मित्रमंडळ चौकात सिग्नलाला उभा असताना एसटीने त्याला पंचवीस ते तीस फूट फरपटत नेले. त्याच्यासोबतच्या दोन मित्रांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या दोन्ही दिशेला उडी घेत जीव वाचवला. त्याच्या मृत्यूने मित्र, शिक्षकांना अश्रू आवरत नव्हते.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 29/01/2012 10:56 AM amol m. said:
जे झाले ते झाले....! पण नेहमीप्रमाणे त्यांना सरकारी मदत मिळणार कि नाही ???????,(तेवढीच मलमपट्टी), तसेच s.t. महामंडळकडूनही सर्व मृतांना तसेच ज्यांच्या वाहनांचे नुकसानी झाली आहे त्या-त्या सर्वांना मोठी आर्थिक मदत मिळालीच पाहिजे, कारण या घटनेतील प्रत्येकाचीच कहाणी हृदय हेलवणारी आहे.....
On 28/01/2012 11:35 AM Gautam Waghmare said:
माणसाशी माणसासारखे वागा आणि वागवा. पिळवणूक, हुकुमशाही, पैशाचा माज, राजकारण, हे सगळ कारणीभूत आहे. असे अनेक संतोष माने सापडतील. शेवटी कारणीभूत तुम्ही आम्हीच आहोत.
On 28/01/2012 10:43 AM Anil said:
सर्व जण माने याला फाशी द्या वगैरे म्हणताय पण मला अजून देखील वाटतंय कि ही मानसिक दडपणातून निर्माण झालेली घटना आहे. शिक्षा काय मिळावी हा नंतर चा भाग आहे आधी त्याची कारणमीमावासा होणे फार गरजेचे आहे कारण त्यातून परत अश्या घटना घडू नयेत ह्यासाठीची मानसिक बैठक तयार करणे शक्य होईल.
On 27/01/2012 07:07 PM vishal durgade said:
नुसती चर्चा करून काहीही फायदा होणार नाही. अशा घटना का घडल्या आणि त्यावर काही उपाययोजना करता येईल का? यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी काही करता आले पाहिजे. यासाठी सरकार, सामान्य नागरिक, सामाजिक संघटना यांनी काही उपाय, पर्याय शोधले पाहिजेत. हि घटना लक्षात ठेवून सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी सुद्न्य पुणेरी नागरिकांनी सरकारला वेळोवेळी जाणीव करून द्यायला हवी. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्या.
On 27/01/2012 05:43 PM pallavi said:
कसाब सारखे ह्याला पण बिर्याणी खाऊ घाला, म्हणजे सामान्य माणूस रोज असाच मरेल, आणि रोज कोणीतरी असा सहज मारून जाईल. आपल्या इथे कोणीही काहीहि करू, सगळे थोडे दिवस जेल मध्ये राहून बाहेर येतात, आणि हे बघून कोणीही वाईट कृत्य करायला घाबरत नाही. हा तर मनोरुग्ण आहे, हे आधीच जाहीर केल, मग जेल मध्ये तरी कशाला ठेवायचं?????
On 27/01/2012 04:06 PM mangesh panchpor said:
संतोष माने याला सुधा सर्व लोकांनसमोर उबे करून s t बसने उडवा मन्जे त्याला कळेल कि मरण मन्जे काय असते.
On 27/01/2012 03:43 PM prakash said:
त्या चालकाला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे
On 27/01/2012 03:35 PM Shantilal said:
Mane yane aagara baher S.T. nelich kashi. mhanje yacha aarth asa hoto ki S.T. Depo madhe konihi kadhihi kahihi karu shakat. asa ha mahamandlacha karbhar S.T. Mahamadal Atishay Gahal Karbhar Karat Aahe. S.T. Madhe nokari milali mhanje tyana vatat aapan rastyache malak zalo. Rastyavar honare accident he yach mahamandalamule hotat. samorun jar ek vahan aal tar he lok tyala cut marun dusrya gadila dos detat. hech ya Mane yane kele. Ek tar ha mane manorugn nasun ha ek prakarcha kshaitan mhanava lagel
On 27/01/2012 03:19 PM omkarpb said:
ST महामंडळ या घटनेला कारणीभूत आहे. Driver cabin ला lock नाही. सर्व बसेसना एकच masterkey. वोल्वो बसेस ना separate keys असतात. त्याने दरवाजाही उघडता येत नाही आणि बस सुरूही करता येत नाही. मग ST महामंडळाने असं का करू नये ??
On 27/01/2012 03:17 PM Supriya Kothawale said:
Tyala Fashich zali pahije mahje tari tyala kalel ki tya lokache jeev getana tyana ani tychya gharchya na kay yatana zalaya astil te TO MANORUGHN AHE AS MAHNU NAKA NAHI TAR TYACHI SHISHA KAMI HOIL TO KASALA ALAY MANORUGHN ITARACHE JEEV GENARA
On 27/01/2012 03:03 PM PRABHAKAR SURYAWANSHI said:
सगळेजण म्हणतात फाशी द्यावे पण तो मानसिक रोगी असेल तर तो दोषी होऊ शकत नाही जर कामगार वर्गावर कोणी अधिकारी जर जाणूनबुजून त्रास देत असेल तर सुट्या देत नसेल ,दूरची गाडी देत असेल तर तो रागाचे भारामध्ये असे क्रत्य्य करू शकतो पुण्यामध्ये जे खून झाले त्यापैकी बरेच कामगार लोकांनी केले आहेत राठी खून सोन्याचा व्यापारी अजून बरेच कांही हे काम्हीचा नाही याच्या पेक्षा वाईट वेळ येणार आहे संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे नाहीरे वर्ग असच सामान्य लोकावर राग काढणार कारण कमकुवत सामान्य माणूस असतो विचार KARA
On 27/01/2012 02:11 PM mina said:
reservation करून आशा लोकांना नोकरी द्या . त्याचेच हे फळ . पण तरीही सुधारणार नाही, कारण जीव त्यांचा गेलाय. यांना काय त्याचे, सर्व field मध्ये reservation चे हे परिणाम आहेत, तरीही त्याकडे दुर्लक्ष होते. नोकरी देताना योग्य लोकांना द्या, reserved लोकांना नको.
On 27/01/2012 02:01 PM ashish alase said:
फासावर लात्कावा अजिबात दयामाया दाखवू नये मनोरुग्णा असो व कोणी असो त्याचा त्रास दुसर्यांनी का सहन करावा. जे मृतू पावले आहेत त्यांच्या कुटुंबाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे याचा विचार करावा.
On 27/01/2012 01:59 PM BMG said:
अतिशय वाईट आहे त्याला सक्तमजुरीची शिक्षा द्या .
On 27/01/2012 01:15 PM sunita said:
santosh mane jar mansik rugna hota tar tyala nokarivar thevalach kasa ? to roj s.t. chya tripa karat hota mhanje roj kiti lokanche jeev he s.t. mahamandal dhokyat ghalat hote ? mane barobar s.t. mahamandalawar hi kadak karwai karayala pahije.
On 27-01-2012 12:22 PM nitin said:
संतोष माने ला फाशी दिली तर मग सलमान खान ला पण फाशी च दिली पाहिजे... नाहीतर सलमान खान ला सोडला तसा पैसे घेऊन नुकसान भरपाई साठी संतोष माने ला पण सोडला पाहिजे.... शेवटी आपल संविधान कायदा हेच तर सांगतो ....
On 27/01/2012 11:36 AM mangesh said:
अपघाती मृत्यू काळजाचा ठाव घेतो. दुख्खात सहभागी आहोत. माने वर कारवाईने पत्र जीव येणार नाही.
On 27/01/2012 11:11 AM sanjay arde said:
कसाब बरोबर फाशी द्या संतोष माने ला
On 27/01/2012 10:56 AM vaishali Kanade said:
त्याला आजच्या आज भर चौकात फाशी द्या. त्याला तुरुंगात ठेवून पोसू नका.
On 27/01/2012 10:42 AM Nilesh said:
किती विकृत मनाचा माणूस असेल हा.
On 27/01/2012 09:36 AM nil said:
पुण्यातल्या लोकांनी त्याला फार कमी तुडवला. कोर्ट काय शिक्षा द्यायची ते देईन पण कोर्ट आणि पोलिसांच्या हातात पडायच्या आधी ह्याचे दोन पाय कायमचे निकामी करून द्यायला हवे होते, आयुष्यभर जेल मध्ये किंवा घरी सुटल्यावर अंथरुनात सलग कराव लागला असते तर आजूबाजूच्या लोकांनी अजून छळ केला असता त्याची हीच शिक्षा आहे.
On 27/01/2012 03:52 AM DM said:
ह्या नराधमाला लवकर फाशी व्हावी हे आशा! देव मृतात्म्यास शांती देवो! पुण्यातले बस चालक घाणेरड्या वाहन चालना साठी प्रसिद्ध आहेत. कधी बदलणार हे कोण जाणे.
On 26/01/2012 11:41 PM ma said:
First we have to see why this has happened.. Mane is one volcano which has irrupted in this way.. there are many volcano’s hidden in many people’s mind they can irrupt any time may bigger way than this… Need to think.. Govt should do something for society .. In India work culture should be change employer should provide employee happy and peaceful work environment… people should avail mandatory annual leaves and important corruption is big issue for this mentality…
On 26/01/2012 11:30 PM Sagar said:
चावी बसमध्येच असणार. चावीशिवाय बस चालू करणे काय खायचे काम नाही. आणि खरच जर चावीशिवाय बस सुरु झाली असेल तर ती अशी सहज कशी सुरु होऊ शकली? ह्या प्रकरणाची खोल चौकशी करा. अशा गोष्टी पुन्हा झाल्या तर सर्व बसेस पेटवून देऊ.
On 26/01/2012 11:26 PM Girish Rahane said:
I can believe that Mane has lost his control over his mind due to so so reason but this doesn't mean that he should act in such a way and kill the people in such a bad way. Mane should get worst punishment by the law so that no body could dare to do such act in future. I really feel very bad of the victims and their family members. I pray God to give them power to adjust with this condition.
On 26/01/2012 10:56 PM Ek vachak said:
त्या मानेला मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरी जन्मभर बिनपगारी कामाला ठेवा. त्याच्याकडून हवे ते काम करून घ्या आणि त्याला कुठल्याही सोयी सुविधा देऊ नका. त्याला सतत सांगत राहा कि त्याने काय चूक केली आहे.
On 26/01/2012 10:36 PM halade said:
त्या निच्ला बस खालीच चिरडावे आणि वाचलाच तर काय पाण्याची जन्म ठेप द्यावी , कडक शासन असेल तरच पुढचा कुणी असे करणार नाही. पण हे आपल्या सरकारला कधी समजणार. कदाचित तेन्वाच ज्यावेळी त्यांच्या कुटुंबात ली कुणीतरी विक्टीम होतील अथवा बळी पडतील. जीवनाची काही शाश्वतीच राहिली नाहीये. कुठल्या उम्मेडीने जगावं असे कित्येकांना वाटायला लागलेय. स्त्रोंग एक्शन झालीच पाहिजे. जागे व्हा.
On 26/01/2012 10:31 PM Yash said:
परमेश्वर मृत आत्म्य ना शांती देवो ................व मृत आत्म्य च्या सर्व नातेवाईकांना धीर व साहस देवो ............................फार वाईट वाटल ....कल्पना नाही करवत ............एस टी महामंडळा ने जवाबदारी स्वीकारून शिस्त लावली पाहिजे.............सरकारने मदत केली पाहिजे..............लवकरात लवकर शिक्षा हीच मृत आत्म्य ना श्रद्धांजली............हरे कृष्ण
On 26/01/2012 10:01 PM Mahesh said:
आज लिहायला शब्दच अपुरे .........
On 26/01/2012 09:53 PM v.c.badve said:
या घटनेची सखोल चौकशी करावी.एसटी महामंडळात लाच घेऊन वाहक - चालक यांच्या नेमणुका केल्या जातात, पैसे दिलेकी आर ती ओ अधिकारी परवान्याचे नुतनीकरण करून देतात. कोणतीही चौकशी केली जात नाही. संतोष माने मनोरुग्णा आहे तर त्याच्या प्रवासी वाहतूक करण्याच्या परवान्याचे नुतनीकरण कसे करून दिले ? डॉक्टरने खोटा रिपोर्ट कसा दिला . या सर्वांची निष्पक्ष चोकशी करून जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करावी. संपूर्ण यंत्रणाच सडलेली आहे . संतोष माने च्या रूपांत या भ्रष्ट यंत्रणेचे स्वरूप जनते समोर आले आहे .
On 26/01/2012 09:22 PM MOHAN PRABHALE said:
मानेच नालायक मनायचा मानेला शिक्षा हवी ......
On 26/01/2012 09:19 PM Jagdish said:
त्या चालकाला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे, देव मृत आत्म्यास शांती देवो..
On 26/01/2012 09:09 PM alankar said:
Ashya lokana yogya te shiksha zalic havi.
On 26/01/2012 09:06 PM Sudhir Ashok Lamkhade said:
आशा लोकांना नोकरी देताना सरकारने या लोकांची मानसिक चाचणe karayala havi .
On 26/01/2012 08:49 PM NRP said:
या सगळ्याचे मूळ कारण काय , कुठल्या कारणांनी माने सारख्या माणसाला मनोरुग्णा बनवले , हे शोधायला हवे. सर्व कंपन्यांनी योग, मनशांती या सारख्या कार्यक्रम कर्मचार्यांना आठवड्यातून एक दिवस सक्तीचे करावे.
On 26/01/2012 08:34 PM PRASHANT PATIL said:
शब्दात वर्णन करणे अशक्य आहे ??? पण हायला संपूर्ण जबाबदार माने नसून तितक्याच प्रमाणात एसठी महामंडळ सुधा आहे.
On 26/01/2012 08:27 PM reader said:
मानेला शिक्षा द्यायच्या आधी त्याच्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा. त्यांना चौकशीला सामोरे जुड्या. त्यांचा चालक अशी कृत्ये करतो म्हणजे ST ने वेळीच लक्ष न दिल्याचे उदाहरण आहे. त्याला मानसिक problem होता तर असा चालक का ST ने नेमला होता. उद्या त्याने गंभीर उप्घात करून ४०-५० लोकांना मारले असते. त्याला बदली हवी होती का - त्याचा अर्ज ST फेटाळत होते का? गाडी घेऊन असा कोणी पण चालवू शकेल.
On 26/01/2012 07:28 PM Anil said:
Sorry..cannot type in Marathi. But I want to write my thoughts. I am surprised with some reactions here about how the driver should be hanged/crushed etc. If he had gone crazy, what should be done foremost is to check his brain for some neurological disorder. There IS a disease that can cause a stressed/depressed person to do things like this. It's not very different from school shootings in countries like USA.
On 26/01/2012 07:25 PM vilas patange said:
देव मृत आत्म्यास शांती देवो .
On 26/01/2012 06:43 PM Rahul B said:
त्याला एस.टी खाली मारा.निरपराध लोकांचे बळी त्याने घेतले आहेत.
On 26/01/2012 06:41 PM sanjay kapare said:
आंम्ही दुख्खात सहभागी आहोत. देव मृत आत्म्यास शांती देवो. मानसिक स्वास्थ्य फार महत्वाचे आहे हे या कृत्यातून समजते. सर्वांनी जागरूक होऊन अशा समस्यान वरती उपाय शोधायला हवेत.
On 26/01/2012 06:15 PM Kiran said:
यामध्ये सर्व चूक एसटी प्रशासनाची आहे,चार गंभीर अपघात नावे असून तो अजून चालकाची नोकरी करीत आहे.दुसरी चूक म्हणजे कुठल्याही एसटी standvar कोणत्याच प्रकारची शिस्त व सुरक्षा नाही.
On 26/01/2012 05:56 PM shailesh choudhari said:
श्वेता ओस्वाल या गरोदर होत्या त्यामुळे भ्रुण हत्तेचा पण आरोप लावला पाहिजेल आणि त्याला फाशी न देता जन्मभर कायद्यात नसलेली काळ्या पाण्याची सजा ढिली पाहिजेल . फाशी दिलीकी तो काही सेकंद च तडफडेल आणि सुटेल .
On 26/01/2012 05:42 PM Manish S. Kulkarni said:
तेव्हा सुरेश कलमाडी का रस्त्यावर नव्हते, हल्लीच रिलीज झाले आहेत... भ्रष्टाचारी लेकाचा गेला असता तर ह्या सगळ्या दुर्दैवी प्रकरणातून काहीतरी चांगला झाला असता...
On 26/01/2012 05:40 PM sunil.manwatkar.sangamner said:
पोलिसांनी अपघाताचे मूळ कारण शोधले पाहिजे व या घटनेला नेमके कोण कोण जबाबदार आहे त्या सर्वांना शिक्षा द्यायला हवी
On 26/01/2012 05:35 PM sunil.manwatkar.sangamner said:
पोलिसांनी अपघाताचे मूळ कारण शोधले पाहिजे व या घटनेला नेमके कोण कोण जबाबदार आहे त्या सर्वांना शिक्षा द्यायला हवी
On 26/01/2012 05:31 PM sunil.m. said:
आकस्मित मृत झालेल्या सर्व बंधू भगिनींना भावपूर्ण स्राधांजली
On 26/01/2012 05:16 PM Hemant said:
Same like Aliester Pareira he will be imprisoned for only 3 years. Actually he should be jailed for 3x8=24 years.
On 26/01/2012 04:38 PM anil said:
निरपराध लोकांचे बळी त्याने घेतले आहेत.
On 26/01/2012 04:34 PM shekhar said:
त्या हरामखोर ला फाशी ची शिक्षा द्या
On 26/01/2012 03:53 PM NRI said:
रडण्याशिवाय काही करू शकत नाही.. :(
On 26/01/2012 02:31 PM vikas c.kathane said:
देव मृत आत्म्यास शांती देवो .
On 26/01/2012 02:17 PM Rupali said:
मानसिक स्वास्थ्य किती महत्वाचे आहे हे या कृत्यातून समजते. समाजाने जागरूक होऊन या समस्येचा उपाय शोधायला हवा.
On 26/01/2012 02:05 PM dinesh bhamre said:
हि चुकि चालकचि नसुन डेपो मेनेजर चि आहे....... बसेस कधीही दुरुस्ती करत नाही .अपघात झाला कि चालक दारू पिऊन गाडी चालवत होता असे कारणे सांगत असतात हे जेव्हा घाटात-ट्राफिक मध्ये -रस्त्यावर गाडीचा ब्रेअक फेल होतो.तेव्हा चालक सर्वांचा जीव वाचवतो, अपघात होतो तेव्हा चालक मद्य(नशेत ) पिऊन गाडी चालवत होता असे कारणे सांगून news paper ,TV मध्ये सांगतात त्यामुळेच अशे प्रकार घडतात .....मानसिक संतुलन बिघडते चालक तरी काय करणार .....असे आहे महाराष्ट्र महामंडळ ......हे कृत्य करण्यास एस टी महामंडळ जबाबदार आहे.
On 26/01/2012 02:04 PM gangotri bhapkar said:
त्या एस. टी. चालकाला फाशीच झाली पाहिजे .
On 26/01/2012 01:52 PM sushil said:
कसाब बरोबर ठेवा त्याला. मजेत राहा.
On 26/01/2012 01:46 PM Dhananjay Damle said:
तुम्ही सर्व जण माने याला फाशी द्या वगैरे म्हणताय पण मला अजून देखील वाटतंय कि ही मानसिक दडपणातून निर्माण झालेली घटना आहे. शिक्षा काय मिळावी हा नंतर चा भाग आहे आधी त्याची कारणमीमावासा होणे फार गरजेचे आहे कारण त्यातून परत अश्या घटना घडू नयेत ह्यासाठीची मानसिक बैठक तयार करणे शक्य होईल. तश्या प्रकारचे शिक्षण वा समुपदेशन ह्याची आज कामगार वर्गाला जास्त गरज आहे अस मला वाटतंय.
On 26/01/2012 01:37 PM Smita Tandulwadkar said:
माने ड्रायव्हरला फाशी द्यायला हवी.
On 26-01-2012 01:29 PM vicky said:
we have to be very cerfull aftre this sad incident, the Mane shuld have to be very strikt panitionment for his mad kiling.................?
On 26/01/2012 12:41 PM Vikram Bhide said:
त्याला आजच्या आज भर चौकात फाशी द्या. त्याला तुरुंगात ठेवून पोसू नका.
On 26/01/2012 11:44 AM amrut methikar said:
त्या चालकाला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे
On 26/01/2012 10:53 AM sachin shinde said:
इट्स वेरी sad thing.we must think about ST drivers driving along with their mentality.
On 26/01/2012 10:49 AM pankaj said:
माने ड्रायव्हरला चौकात फाशी द्यायला हवी. निरपराध लोकांचे बळी त्याने घेतले आहेत.
On 26/01/2012 10:41 AM vilas todkar (warje) said:
फासी द्या त्याला दगडाने तेचून म मारा
On 26/01/2012 07:43 AM Ghanshyam said:
अपघातात जखमी ची नावे कुठून मिळणार ?
On 26/01/2012 07:01 a.m. m said:
जेंव्हा ज्याच्या वंशा जावे तेंव्हा त्याला कळे....नुसते हेलावून जाण्यात काय आर्थ आहे....ज्यांनी भोगले त्यांनाच माहित हे दुखः ....
On 26/01/2012 05:52 AM dadaji said:
अपघाती मृत्यू काळजाचा ठाव घेतो. दुख्खात सहभागी आहोत. माने वर कारवाईने पत्र जीव येणार नाही.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: