Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

माथेफिरू बसचालकाचा सर्व स्तरांतून निषेध
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:45 AM (IST)
पुणे - माथेफिरू चालकाने केलेल्या कृत्याचा शहरातील विविध संघटनांनी निषेध केला. त्याचप्रमाणे मृतांना विविध संघटनांनी श्रद्धांजली वाहिली. काही संघटनांनी जखमींना मदत देऊ केली आहे. आझम कॅम्पसमधील झेड. वी. एम. जनरल हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी व विद्यार्थ्यांनी जखमींना ससून रुग्णालयात दाखल केले. डॉ. मुश्‍ताक मुकादम, डॉ. वाजीद शेख, डॉ. फिरोज शेख यांनी मदत केली. भोई प्रतिष्ठानने जखमी रिक्षाचालकांना आर्थिक मदत दिली आहे. त्यासाठी 9823047544 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे डॉ. मिलिंद भोई यांनी कळविले आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनी या घटनेचा निषेध केला असून, रेल्वेच्या धर्तीवर एसटी पोलिस असा स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आरोग्य सेनेने मृतांच्या व जखमींच्या नातेवाइकांना एसटीमध्ये नोकरी द्यावी, अशी सूचना केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वर्षा गुप्ते यांनी केली आहे. पतित पावन संघटनेने मृतांना श्रद्धांजली वाहिली.
प्रतिक्रिया
On 28/01/2012 04:38 PM Anu said:
आरे आपण सारे भारतीय आहे. असे वाईट कृत्य करून आपल्या भारत देशाला कालीम्बा नका फासु.. आपण भारतीय असल्याची जरा जाणीव ठेवा . जर आपलेच लोक आपल्याशी आसे वागायला लागले तर त्याचा फायदा बाहेरचे लोक घेतील जरा देशाचा विचार करा......
On 28/01/2012 09:46 AM sunil mohan said:
त्या हरामखोराला कुठलीही इझा न होता तुरुंगात ठेवा आपण त्याला ऐशारामात पोसू तो मनोरुग्णा आहे ना त्याची काळजी घेऊ या जसा कसाब आहे तसा हा आपला कसाब आम जनता कर रुपी पैसा भरतोच आहोत तो त्यावर खर्च करूया . काय हो कि नाही ?
On 28/01/2012 08:45 AM nikhil inamdar said:
संतोष माने हा पण अजमल कसब evdhach दोषी आहे.त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी.
On 26/01/2012 12:48 PM Gaurav said:
भरपाई देऊन एखाद्या कुटुंबाची चीराडलेली स्वप्ने अन म्हातारपणाचा आधार..कोणाच कुंकू तर कोणाच्या घरची लक्ष्मी परत येणार नाही..कृपया त्या नराधमाला लौकरात लौकर सजा मिळावी यासाठी प्रयत्न करा..


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: