Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

एस.टी.ला ठेच, पीएमपी शहाणी
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: pmp,   pune
पुणे - बुधवारी घडलेल्या घटनेने "पीएमपी' चे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. "स्टार्टर दाबा आणि बस चालू करा' अशी "ख्याती' असलेल्या "पीएमपी' ला किल्ली बसविण्याचा विचार सुरू झाला आहे. तातडीचा पर्याय म्हणून चालक आणि वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

पीएमपीच्या बस पळविण्याचे तीन चार प्रकार यापूर्वी झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी कोथरुड येथे एका युवकाने गमतीसाठी बस चालविली होती. तसेच पीएमपीची एक बस शिरुर येथे नेऊन ठेवल्याची घटनाही घडलेली आहे. बुधवारी "एसटी' पळविल्याच्या प्रकाराने पीएमपी खडबडून जागी झाली आहे. पीएमपीचे सुरक्षा अधिकारी, आगारप्रमुख यांची आज बैठक झाली. तीत सुरक्षात्मक उपायांवर चर्चा झाली. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बसला किल्ली असल्याने त्या चालू करणे शक्‍य नाही. मात्र, जुन्या गाड्या असुरक्षित आहेत.
संबंधित बातम्या
प्रतिक्रिया
On 26/01/2012 01:16 AM Ajit Ahwad said:
किल्ली बसविण्याचा फक्त विचार सुरू झाला आहे, अज्जून १०-१२ वर्ष लागतील किल्या बस्वूस्तर. इतके वेळेत अजून १०-१२ संतोष माने बस पाळूवून लोकांना मारतील.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: