Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

जुन्नरला मटका अड्ड्यावर छापा
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: gambling,   junnar,   crime,   police
जुन्नर - जुन्नर शहरात मध्यवस्तीत सुरू असलेल्या मटका व जुगाराच्या अड्ड्यांवर पुणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात अठ्ठावीस जणांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी चोवीस आरोपींना पकडण्यात आले. गुन्हा दाखल झालेल्यांत माजी नगरसेवक व कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अंबर परदेशी यांचा समावेश आहे.

जुन्नर मधील धान्यबाजार येथील इंदिरा प्लाझा या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये मुंबई मटका व पत्त्याचा जुगार चालत असल्याची खबर मिळाल्याने मंगळवारी रात्री गुन्हे शाखेकडून ही धाड टाकण्यात आली. यावेळी एका फ्लॅट मध्ये मुंबई मटका तर दुसऱ्या फ्लॅट मध्ये पत्त्याचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. हे ठिकाण जुन्नर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. परंतु याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती नसल्याबद्दल नागरिकांत आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस नाईक ईश्‍वर नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबर परदेशी व पडवळ हे दोघे आपल्या आर्थिक फायद्याकरीता मुंबई मटका व जुगाराचा अड्‌डा चालवीत असताना गणेश मुसळे, दत्तात्रेय ढोबळे, श्‍याम बोऱ्हाडे, अनिष पंडित, बाळू रासीनकर, अब्बास नायकोडी, भारत ढेकणे, नितीन भोकरे हे याठिकाणी मटका व जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडे 28 हजार 415 रुपये व मटक्‍याच्या पावत्या मिळून आल्या. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याशेजारी असणाऱ्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये छापा टाकला असता येथे पत्त्यांचा जुगार खेळणारे इम्तियाज तिरंदाज, रहीम इनामदार, रामू शिंदे, मुराद सय्यद, अशोक फुलपगार, आमोद जोशी, दिनेश खंडागळे, भागू बडकुंद्र, बाळकृष्ण गायकवाड,अरुण घोडेकर, महमंदशफी शेख, नीलेश कुंभार, अरुण आल्हाट असे एकूण पंधराजण आढळून आले. त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य व 85 हजार 590 रुपये जप्त करण्यात करून त्यांना अटक करण्यात आली. या बाबतची फिर्याद सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे. बेकायदेशीर जुगाराचा अड्‌डा चालविणारे सुभाष पांडे व अरुण आल्हाट यांचा देखील आरोपींत समावेश आहे.

या प्रकरणी अंबर परदेशी, पडवळ तसेच सुभाष पांडे व अरुण आल्हाट यांना अटक करण्यात आली नाही. अन्य चोवीस जणांना पकडण्यात आले आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: