नवी दिल्ली - सुमात्रा बेटाच्या पश्चिम भागाला आज 5.1 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.25 वाजता हा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू समुद्रात दहा किलोमीटर खोलीवर होता, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. यात जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही.