Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

मुलाच्या चाव्याने सापाचा मृत्यू
- वृत्तसंस्था
Friday, January 27, 2012 AT 01:52 PM (IST)
तेल अवीव - छोट्या मुलाने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाल्याची आश्‍चर्यजनक घटना इस्राईलमध्ये गुरुवारी सकाळी घडली.

आयमद गदिर असे या चावा घेतलेल्या एक वर्षाच्या मुलाचे नाव आहे. इस्राईलच्या उत्तर भागातील शाफरम येथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आयमद खेळत असलेल्या खोलित 35 सेंटिमीटर लांबीच्या सापाने प्रवेश केला. साप त्याच्या जवळ गेला असता, आयमदने त्या सापाच्या डोक्याचा चावा घेतला. त्यात सापाचा मृत्यू झाला. ज्या वेळी आयमदची आई तेथे आली, त्यावेळी तो सापाला चावत होता. घाबरून तिने शेजाऱ्यांना बोलावून आणले. त्यानंतर शेजाऱ्यांनी आयमदच्या हातातून सापाला काढून घेतले.

आयमदने लहान मुलांमधील सवयीप्रमाणे एखादे खेळणे समजून सापाला पकडून तोंडात घातले असणार, असे मत सर्पमित्र इली कोहेन यांनी व्यक्त केले.
आयमदच्या सुदैवाने तो साप विषारी नव्हता. अन्यथा, अनुचित घटना घडली असती. या प्रकारातील सापाच्या दंशाने जीवाला कोणताही धोका पोचत नाही. मात्र, त्यातून कोणतीही ऍलर्जी होऊ शकते. त्या पार्श्‍वभूमीवरच आयमदची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, असे कोहेन यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 29/01/2012 10:48 AM Ashok hingane /jamkhed said:
Aaj kaal jagat kai hoil te sangta at nahi............!
On 27-01-2012 08:12 PM kdchitnis said:
ही खरी बातमी झाली ना?भरताने सिंहाच्या छाव्याचे दात मोजले तेव्हा तोही वर्षादीडवर्षाचाच होता ना?त्याचेच हे भावंड दिसतंय.आता साप माणसाला पाहून का पळ काढतात ते समजले.पण माणूस सापाला पाहून पळ काढतो हे सापाला माहित नसावे,म्हणून ते इतस्ततः पळतात व माणसे त्याला घाबरतात.आता हे लहान मुलांना समजले कि साप ही खायची वस्तू आहे तर काही खर नाही!आयमदने जी बाउन्ड्री मारलीय ती विलक्षणच!डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक गोष्ट उत्क्रांत होते,मात्र अशी उत्क्रांती त्यालाही अपेक्षित नसावी!आयमद"महामदच"झाला हे खरे!
On 27/01/2012 07:54 PM Santosh P.Rokade said:
jakhami sap jivant rahu shakat nahi ya mulane ter tyachya dokyacha chava ghetala. sapabaddal tyala mahiti nasavi.
On 27/01/2012 07:51 PM Amit said:
it is not the poision, snake was too small and the bite was on the head. please don't get confused
On 27/01/2012 07:02 PM Lalit said:
Very innocent kid . Until the age of १४ months babies try to eat everything they see .
On 27/01/2012 06:41 PM Sandip S. Kharmale said:
अति भयंकर.....
On 27/01/2012 04:10 PM vidya said:
the teeths of human being are more poisionous than any other its not an magic................................


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: