पिंपरी-चिंचवड "राष्ट्रवादी'ची यादी जाहीर
- सकाळ वृत्तसेवा
Friday, January 27, 2012 AT 11:59 AM (IST)
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीतील 45 उमेदवारांची यादी काल (गुरुवार) रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जाहीर केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन काल रात्री उशिरा 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यातील काही उमेदवारांची नावे अशी- योगेश बहल, मंगला कदम, सुमन पवळे, आर. एस. कुमार, अपर्णा डोके, विलास नांदगुडे, अजित गव्हाणे, नारायण बहिरवाडे, वसंत लोंढे, महेश लोंढे, जावेद शेख, सीमा फुगे, मोहिनी लांडे, तानाजी खाडे आणि शमीम पठाण.