Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

दुबईत प्रजासत्ताक दिन उत्साहात (फोटो)
तुषार कर्णिक tush0102@gmail.com
Friday, January 27, 2012 AT 08:48 PM (IST)
दुबई - उत्साहात आणि जवळपास चार हजार नागरिकांच्या उपस्थितीत, येथील इंडियन हायस्कूलच्या प्रांगणात भारताचा ६३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

थंडी असूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात असलेली उपस्थिती, हीच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाची साक्ष पटवत होती. शाळेचे अध्यक्ष मोहन वालर यांनी सर्व उपस्थितांचे आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौन्सुल जनरल संजय वर्मा यांचे स्वागत केले.

ध्वजवंदनानंतर वर्मा म्हणाले, की परदेशस्थ भारतीयांचे राष्ट्राच्या प्रगतीमधील अनमोल असे योगदान आहे. यावेळी महात्मा गांधी यांचेही त्यांनी उदाहरण दिले. गांधीजी हे आजच्या समस्त परदेशस्थ भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. परदेशात राहून आल्यावर गांधीजीनी स्वदेशाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य, हे सर्व परदेशास्थ भारतीयांसाठी नेहमीच स्फूर्तिदायक ठरते.

भारताचे संयुक्त अरब अमिरातीबरोबर असलेल्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंधावर, वर्मा यांनी  प्रामुख्याने प्रकाश टाकला. त्याचबरोबर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या संदेशाचे त्यांनी वाचन केले. यावेळी इंडियन हायस्कूलच्या विद्यार्थांनी मान्यवरांना मानवंदना दिली. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगी, बहुढंगी असे नाटक सदर केले. पाचवी आणि सहावीतील मुलींनी "मा तुझे सलाम" या गाण्यावर केलेले नेत्रदीपक नृत्य, सर्वांची वाहवा मिळवून गेले. बालवर्गाच्या मुलांनी केलेल्या नृत्याने तर कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक मंडळांच्या प्रतिनिधींनीही आपली कला सदर केली. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मुलांनी आयोजित केलेले 'फन फेअर'. मुख्य कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सर्व उपस्थितांनी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

एक अत्यंत सुनियोजित आणि उत्साहपूर्ण अशा वातावरणात, दुबई येथे पार पडलेल्या आपल्या मातृभूमीच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहता आले, यामुळे आम्ही मनोमन सुखावून गेलो.














फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 22/02/2012 04:31 AM atul jantre said:
भारतीयांनो आम्हाला तुमचा अभिमान आहे
On 09/02/2012 09:54 AM thackarye said:
तिकडे कोणी राज ठाकरे नाही का?
On 08/02/2012 11:12 PM ramnath gambhire said:
अभिनंदन
On 05/02/2012 06:14 PM sudamchorage said:
सारे जहासे अच्छा हिन्दुसता हमारा हम बुलबुले है इसकी ये गुलासिता हमारा.
On 04/02/2012 05:28 PM DRKAMLAKaRBDESHPANDE said:
फारच चान -आणि गौरवास्पद वाटते - भारताची संस्क्रती उच्च आहे
On 04/02/2012 12:44 PM Hrushikesh said:
मेरा भारत महान....!
On 03/02/2012 11:03 PM aditya dixit said:
परदेशात २६ जानेवारी उत्साहात साजरा होतो पण आपल्या भारतीयांना गणेशोत्सव, दहीहंडी, होळी असे प्रदूषण करणारे सणच साजरे करायला आवडतात...तेही आनंदात नाही तर त्यातही राजकारण करतील...आपल्या पक्षाचे, आपल्या जातीचे वेगळे वेगळे सण साजरे करतील...लोकांनी एकत्र यावे, यानिमित्ताने आपल्या हातून काही विधायक कामे घडवीत ह्या उद्देशाने हे सण टिळकांनी निर्माण केले होते पण आपल्या लोकांनी आणि राजकारणानी ह्या सर्व सणांचा बाजार मांडला आहे...टिळकांचा उद्देश मागे पडत असून ह्या सणांच्या नावाने लोकांमध्ये द्वेषच वाढत आहे...
On 03/02/2012 10:55 PM aditya dixit said:
खूपच छान आहेत सर्वच फोटो...मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे, कसाही असला तरी...मी माझ्या दृष्टीने तरी आपल्या देशाचे चांगले करण्याचा खूप प्रयत्न करतो...कधीही नियमांचे उल्लंघन करत नाही...प्रामाणिकपणे आपले काम करतो पण दुर्दैवाने आपल्या देशातील लोक हि आपल्या देशाशीच प्रामाणिक नाहीत ह्याचे वाईट वाटते...
On 02/02/2012 06:27 AM kaal maadi said:
chaan
On 31/01/2012 10:06 AM Avinash said:
Appreciated the initiative of Indian Embassy in UAE specially Dubai.
On 31/01/2012 04:07 AM kunal doke said:
भारत देशाच काय सांगू....भारत देश हा सर्व लोक मिळून बनलेला देश आहे ..आणि येथील लोक हे प्रेमळ ,प्रेम ,दया ,अहिंसा वादी आहेत .मग आपण कोठेही गेलो तरीही भारत आपल्या मागे असतो ...हे लोंकांना माहित आहे जय हिंद.जय महाराष्ट्र ...
On 30/01/2012 08:38 AM abhu said:
फारच छान, असेः आपले सन सगळी कडे साजरे करा
On 29/01/2012 10:44 AM Nitin said:
बरोबर बोललात Abhijeet शिंदे. तुम्हाला चालेल का पाकिस्तानी किंवा चीनी लोकांनी भारतात त्यांचा प्रजासातक दिन साजरा केलेला ह्याचा विचार करायला हवा.
On 29/01/2012 07:10 AM yogesh tangade said:
यामुळे देशाची शान वाढली आहे.
On 28/01/2012 02:16 PM Shubhangi Vedak said:
खूप छान !! असेच चांगले काम करत जा !! जय हिंद !!
On 28/01/2012 11:53 AM Amit said:
proud to be इंडिअन.
On 28/01/2012 10:09 AM Swapnil R Shelar said:
सारे जहासे अच्छा हिन्दुसता हमारा हम बुलबुले है इसकी ये गुलासिता हमारा.
On 28/01/2012 12:24 AM pundlik said:
मोरया फिल्म मध्ये एक डायलॉग होता..सन साजरे करायचे असतात ते आपला धर्म वाढवण्यासाठी..दुसर्या धर्माचा अपमान करण्यासाठी नव्हे ...तसेच हे कार्यक्रम पण..
On 27/01/2012 11:35 PM ashu said:
khup mast ahet pics... Jai hind
On 27/01/2012 11:01 PM Abhijeet Shinde said:
आणि मग परदेशात हल्ले होतात म्हणून रडायचे. when in Rome, do as the Romans do
On 27/01/2012 09:23 PM Sandesh Nawale. said:
अशी दृश्ये पाहिल्यावर फारच अभिमान वाटतो. परदेशस्थ भारतीयांचा भारताच्या विकासात सिंहाचा वाट आहे, आम्हाला तुमचा अभिमान आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: