Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

केरळचे राज्यपाल फारुख यांचे निधन
- वृत्तसंस्था
Friday, January 27, 2012 AT 07:05 PM (IST)
तिरुअनंतपुरम - केरळचे राज्यपाल एम. ओ. एच. फारुख (वय 74) यांचे काल (ता. 26) रात्री तमिळनाडूतील चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात निधन झाले. गेल्या महिन्यापासून मूत्रपिंडाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.

फारुख यांच्यावर पॉंडिचेरीत आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या वर्षी 25 ऑगस्टला त्यांच्याकडे केरळचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सोपविण्यात ओली होती; मात्र, प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांना अधिक काळ रुग्णालयातच घालवावा लागला. फारुख हे मूळचे पॉंडिचेरीचे होते. ते पॉंडिचेरीचे तीन वेळा मुख्यमंत्री आणि तीन वेळा खासदार राहिलेले होते, तसेच केंद्रात त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलेले होते. विद्यार्थी असताना फ्रेंच राजवटीविरोधात सुरू केलेल्या आंदोलनातून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. केरळ सरकारने फारुख यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
प्रतिक्रिया
On 27/01/2012 10:50 PM pappu said:
वाईट झाले , मी शोक व्यक्त करतो
On 27/01/2012 10:47 PM somanath said:
बरोबर आहे तुझे ६० नंतर सक्ती पाहिजेच
On 27/01/2012 07:29 PM Common Man of India said:
वाईट झाले .... सर्वच राजकिय मंडळीना वयाचा ६० नंतर सक्ती चे निवृत्त करावे... जनते ची कामे तरी होतील .... व पैसा वाचेल .....


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: