Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

माल्डामध्ये आतापर्यंत 105 बालकांचा मृत्यू
- वृत्तसंस्था
Saturday, January 28, 2012 AT 01:06 PM (IST)
माल्डा (पश्‍चिम बंगाल) - माल्डा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात होत असलेले लहान मुलांचे मृत्यू रोखण्यास आरोग्य सेवेचे संचालक बिस्वरंजन सत्पाठी आणि मंत्री साबित्री मित्रा यांना अजून यश आलेले नाही. गुरुवारपासून आजपर्यंत (शनिवार) अजून सात अर्भकांचा मृत्यू झाला असून, मरण पावलेल्या बालकांची संख्या आता 105 झाली आहे.

मृत पावलेल्या अर्भकांच्या पालकांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातील डॉक्टर्स  नवजात बालकांची योग्य ती काळजी घेत नाहीत. बालकांची कशी काळजी घ्यावी, याचे योग्य मार्गदर्शन येथील डॉक्टर्स रुग्णालयात काम करणारय़ा कर्मचारय़ांना करत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे बालकांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: