Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

राहुल द्रविडच्या निवृत्तीचे वृत्त निराधार
- वृत्तसंस्था
Saturday, January 28, 2012 AT 11:10 AM (IST)
ऍडलेड - भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यासह टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे टीम इंडियाच्या व्यवस्थापकांनी आज (शनिवार) सांगितले.

इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियात व्हाइटवॉश मिळाल्यामुळे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त काल होते. यासंदर्भात माहिती देताना टीम इंडियाचे व्यवस्थापक जी. एस. वालिया म्हणाले,""निवृत्तीचे वृत्त निराधार आहे. टीम इंडियाचे व्यवस्थापन याचे स्पष्ट शब्दांत खंडन करते. निवृत्तीच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नाही. क्रिकेटप्रेमींनी त्यावर विश्‍वास ठेवू नये.''

वरिष्ठ खेळाडूच्या निवृत्तीच्या वृत्ताचा वीरेंद्र सेहवाग यानेही इन्कार केला आहे.
प्रतिक्रिया
On 28/01/2012 11:27 PM amarendra said:
तेंडूलकर, द्रविड यांनी निवृत्त व्हायचा काही कारण दिसत नाहीये. अपयश हे सर्वांना येते. द्रविड ला माझ्या माहितीत पहिल्यांदाच आयुष्यात अपयश आले आहे. असे एकदा अपयश आल्याने निवृत्त व्हायचे असेल तर पोन्तिंग आणि मिचेल क्लार्क ने भारता मधल्या सर्व संन्या नंतर निवृत्त व्हायला पाहिजे.
On 28/01/2012 07:01 PM bbm said:
मला वाटते कि श्रीकांतजी तुम्ही आता आस करा: T-२० व वन-डे: सचिन, मुरली, कोहली(कॅप्तैन), पुजारा, रैना, उत्थापा(वी. कि.), अश्विन, जडेजा, प्रवीण, रुद्रप्रतापसिंग. टेस्ट: सेहवाग, गंभीर, रोहित, सचिन(कॅप्तैन), धोनी, हरभजन, झहीर, इरफान, यादव, ........ आस काही करा...............राहुल द्रविड(कोच)
On 28-01-2012 01:00 ?.??. जनार्दन माळी, mangirish.mali@gmail.com said:
इजा,बिजा आणि तिजा.आणखी एक व्हाइटवॉश मिळाल्यानंतर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर निवृत्तीचा विचार नक्की करतील अशी आशा करूया. Go when going is good. उंच कड्यावरून खाली यायला वेळ लागत नाही.
On 28/01/2012 12:03 PM सतीश सोनवणे said:
मुरली विजय, रोहित शर्मा, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल, अजिंक्य राहणे आदी गुणवान क्रिकेट खेळाडूंनी "कसोटी क्रिकेट" खेळायचे कधी......." आता आळीपाळीने खेळविण्याची गरज आहे.....नाहीतर एकदम सेहवाग, गंभीर,द्रविड,लक्ष्मण,धोनी आणायचे कोठून?? .... श्रीमान तेंडूलकर अजून चांगले खेळताहेत...ऑस्ट्रेलियात त्यांच्याच धावा इतर भारतीय खेळाडूंपेक्षा जास्त आहेत....त्यांना योग्य साथ मिळणे महत्वाचे आहे... "भारतीय संघ काही कसोटी जिंकू शकेल..नवीन तयार होतील.".. जे २०-२० खेळतात त्यांना कसोटीत घेवू नये.
On 28/01/2012 11:18 AM anand said:
निवृत्त नाही होणार हे .. यांना धक्के मारून बाहेर काढा . द्रविड , सचिन , लक्ष्मन , सेहवाग चला घरी आता .. रोहित शर्मा , अजिंक्य राहणे , मनीष पांडे , चेतेश्वर पुजारा यांना संधी द्या ..


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: