Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

माजी खासदारांचा "राष्ट्रवादी'त प्रवेश
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 28, 2012 AT 11:48 AM (IST)
Tags: ex-mp,   ncp,   shivajirao mane
मुंबई - शिवसेनेचे माजी खासदार आणि कॉंग्रेसचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी आज (शनिवार) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत शिवाजीराव माने यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, "राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. माने शिवसेनेत असताना परभणीचे खासदार होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

यावेळी शिवाजीराव माने म्हणाले,""कॉंग्रेसमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा विचार होत नसल्याने सर्वत्र नाराजी पसरली आहे. राजीव सातव यांनी माझ्या समर्थकांकडे पुरते दुर्लक्ष केल्याने मी "राष्ट्रवादी'त जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. परंतु, तरीही मला सातत्याने डावलण्यात येत आहे.''
प्रतिक्रिया
On 28/01/2012 10:22 PM vishal patil said:
तुम्हाला लोकसभा लढवायची आहे हे सागा ना . आधी चागली कामे करा.
On 28/01/2012 09:09 PM KISHOR GHOLBA said:
अशा वारंवार दल बदलू नेत्यांना घरी पाठवायला पाहिजे त्याच बरोबर त्यांना मदत करणाऱ्या पक्ष व त्यांच्या मान्यवर पक्ष्श्रेष्टीना निवृत्ती द्यावी.
On 28/01/2012 04:14 PM Hanmant T. Survase said:
शिवसेनेचे माजी खासदार आणि कॉंग्रेसचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी आज (शनिवार) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. हे अगोदर शिव सेनेचे खासदार होते , आता जिल्हा अध्यक्ष कॉंग्रेस चे आणि निघालेत राष्ट्रवादी.... वा यालाच राजकारण म्हणतात तर...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: