Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

गडचिरोलीत पंचायत समिती सभापतीची हत्या
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 28, 2012 AT 09:52 AM (IST)
गडचिरोली- भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची आज (शनिवार) नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादुरशहा आलम यांची आज सकाळी 7.15 च्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. आरेवाडा परिसरातून ते पंचायत समिती निवडणूक लढवीत होते. ते कॉंग्रेस पक्षाशी निगडित होते. त्यांच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजले नाही.

दरम्यान, आलम यांच्या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या राजकीय नेत्याची हत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: