बसच्या आकाराची उल्का आली पृथ्वीजवळ
- वृत्तसंस्था
Saturday, January 28, 2012 AT 12:28 PM (IST)
नवी दिल्ली - बसच्या आकाराची उल्का शुक्रवारी रात्री पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजेच चंद्रापेक्षाही जवळ आली होती, अशी माहिती खगोलशास्त्रज्ञांनी आज (शनिवार) दिली. या उल्केमुळे पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्लॅनेटरी सोसायटी ऑफ इंडियाचे संचालक रघुनंदन कुमार म्हणाले,""उल्का क्रमांक 2012 बीएक्स24 शुक्रवारी रात्री 9 वाजता पृथ्वीपासून 59,044 किलोमीटर अंतरावर आली होती. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र 3,86,000 किलोमीटर एवढ्या अंतरावरून पृथ्वीची परिक्रमा करतो. 25 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा दिसलेली ही उल्का जवळपास 11 मीटर लांब आहे. त्यामुळे उल्केपासून पृथ्वीला धोका नाही.''
2012 बीएक्स24 ही उल्का 242 दिवसांमध्ये सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते.