Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

संगमेश्‍वरात सत्ता परिवर्तनाचा अंदाज फोल
संदेश सप्रे- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 19, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: konkan,   zp election
देवरूख - गेल्या 20 वर्षांची सत्ता राखण्याचे कठीण आव्हान.. समोर दोन तुल्यबळ नेते प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेले... आघाडी झाल्याने जोरही वाढलेला.. अशा कठीण स्थितीत निर्णायकी सेनेला एक खांबी तंबूनेच तारले.. जिल्ह्याची जबाबदारी असतानाही राजेंद्र महाडीक यांनी संगमेश्‍वरवरही लक्ष केंद्रीत केले आणि त्यांच्याच कौशल्याला यश येत संगमेश्‍वर पंचायत समितीवर पुन्हा युतीचा भगवा डौलाने फडकला.

तालुक्‍यात यावेळी सत्तापरिवर्तन होणार हे छातीठोकपणे सांगितले जात होते. तालुक्‍यात यावेळी आघाडी झाली खरी पण अंतर्गत मतभेदांनी टोक गाठले होते. त्याउलट स्थिती महायुतीत होती. एक गट वगळता सारं काही आलबेल होते. त्यावरही कौशल्याने मात करीत महाडीक यांनी आपला कसबा गटही राखलाच शिवाय धामापूर, कडवई, नावडी, ओझरेखुर्द या गटांमध्ये एकहाती बाजी मारत आपल्या नेतृत्वावर शिक्‍कामोर्तब केले आहेत. या सर्वही गटांमध्ये एकहाती महायुतीचेच वर्चस्व राहिले आहे. दाभोळे, देवरूख व साडवलीचा गड हातून गेल्याची खंत काल राजेंद्र महाडीक यांनी बोलून दाखवली. गेली दोन वर्षे तालुक्‍यातील शिवसेना डळमळीत झाली होती. नेत्यांच्या पक्षांतराने शिवसेनेला मरगळ आल्यासारखे वाटत होते. त्यामुळे या निवडणुकीत काही तरी वेगळे घडणार अशी कुणकुण होती. राजकीय निरीक्षकही सत्ता परिवर्तनाचे अंदाज सांगत होते, तर आघाडीमध्ये छातीठोकपणे सत्ता परिवर्तनच असे सांगण्यात येत होते. या साऱ्यांचे अंदाज चुकवत याहीवेळी शिवसेना - भाजप - कुणबी सेनेच्या महायुतीने आघाडीला पाणी पाजले आहे. अवघड स्थिती असतानाही जि.प. च्या 3 तर पं.स. च्या 6 जागा गमावण्याची वेळ युतीवर आली असली तरी तालुक्‍यात सत्ताधारी आम्हीच हेच जणू युतीने यावेळी पुन्हा सिद्ध केले आहे.
प्रतिक्रिया
On 19/02/2012 03:59 PM Zakir Shekason said:
अगदी barobar


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: