Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

"पाटलां'चा घुमणार "झेडपी'त आवाज!
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 21, 2012 AT 12:15 AM (IST)
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत "पाटलां'नी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मराठा, धनगर, लिंगायत अशा समाजातील "पाटील' आडनाव असलेले 11 सदस्य विजयी झाले आहेत. 2002 च्या सभागृहात 11 पाटील होते. 2007 मध्ये तो आकडा घसरून आठवर आला. यंदा तो पुन्हा 11 झाला आहे. त्यामुळे सभागृहात पाटलांचाच आवाज घुमणार हे निश्‍चित.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या आखाड्यात आडनाव पाटील असलेल्या 26 जणांनी आपले नशीब अजमावले. त्यापैकी 11 पाटलांना यश मिळाले आहे. त्यात पाच महिला पाटील आहेत. आजतागायत सभागृहात कधीही एवढ्या प्रमाणात महिला आलेल्या नाहीत. महिला आरक्षणामुळे यंदा 34 महिला सभागृहात आल्या आहेत. त्यामध्ये पाच "पाटील' महिलांचा समावेश आहे. 1997 च्या निवडणुकीच दहा "पाटलां'चा विजय झाला होता. त्यामध्ये तीन महिला "पाटील' होत्या. 2002 मध्ये 11 पाटलांचा विजय झाला. त्यामध्ये 2 महिला होत्या. 2007 मध्ये आठ "पाटलां'चा विजय झाला. त्यामध्ये 2 महिला होत्या.

यंदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्यांमध्ये 15 "पाटील' आहेत. त्यापैकी चार महिला आहेत.  राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रूपाली पाटील (होटगी), भानुदास पाटील (फोंडशिरस), कॉंग्रेसतर्फे विठ्ठल पाटील (भंडारकवठे), संजय पाटील (टेंभुर्णी), प्रसिद्धी पाटील (कुर्डू) या पाटलांनी नशीब अजमावले होते. भाजपतर्फे अशोक पाटील (सलगर), कुमोदिनी पाटील (महाळुंग), कालिदास पाटील (टाकळी सिकंदर), शिवसेनेतर्फे अरविंद पाटील (पांगरी), मनसेतर्फे फूलन पाटील (तुंगत), आघाडीतर्फे पांडुरंग पाटील (करकंब) व अपक्ष म्हणून बाळासाहेब पाटील (नागणसूर), संजय पाटील, रवींद्र पाटील (भोसरे) यांनी आपले नशीब अजमावले. परंतु, त्यांना यश मिळाले नाही.

2012
शीतल पाटील (शेटफळ, राष्ट्रवादी), सीमा पाटील (अनगर, राष्ट्रवादी), अर्जुनसिंह मोहिते-पाटील (खुडुस, राष्ट्रवादी), धैर्यशील मोहिते-पाटील (अकलूज, राष्ट्रवादी), शिवानंद पाटील (मरवडे, राष्ट्रवादी), संजय पाटील (पांगरी, कॉंग्रेस), महादेव पाटील (बीबी दारफळ, कॉंग्रेस), श्रीदेवी पाटील (होटगी, कॉंग्रेस), ऊर्मिला पाटील (बोराळे, कॉंग्रेस), वृषाली पाटील (महूद, कॉंग्रेस), सुभाष पाटील (फोंडशिरस, आघाडी) एकूण 11. त्यापैकी पाच महिला.

सन 1997
सिद्रामप्पा पाटील (मंगरूळ, अपक्ष), मायादेवी पाटील (आहेरवाडी, कॉंग्रेस), बाळासाहेब पाटील (वळसंग, कॉंग्रेस), चित्राबाई पाटील (बोरामणी, कॉंग्रेस), संजय पाटील (टेंभुर्णी, कॉंग्रेस), भारत पाटील (रोपळे क., कॉंग्रेस), प्रकाश पाटील (तुंगत, कॉंग्रेस), फत्तेसिंह माने-पाटील (खुडुस, कॉंग्रेस), मदनसिंह-मोहिते-पाटील (यशवंतनगर, कॉंग्रेस), संजीवनी पाटील (माळशिरस, भाजप). एकूण : 10. त्यापैकी महिला तीन.

सन 2002
बाबासाहेब पाटील (बोराळे, राष्ट्रवादी), साहेबराव पाटील (जवळा, राष्ट्रवादी), पांडुरंग पाटील (भोसे, राष्ट्रवादी), मदनसिंह मोहिते-पाटील (खुडुस, राष्ट्रवादी), नारायण पाटील (वांगी, राष्ट्रवादी), जयश्री पाटील (टाकळी सिकंदर, राष्ट्रवादी), संजय पाटील (टेंभुर्णी, कॉंग्रेस), राजकुमार पाटील (मंगरूळ, कॉंग्रेस), संजय पाटील (भोसरे, शिवसेना), दिनकरराव पाटील (श्रीपत पिंपरी, शिवसेना), संजीवनी पाटील (माळशिरस, भाजप). एकूण 11. त्यापैकी महिला 2.

सन 2007
विक्रांत पाटील (अनगर, राष्ट्रवादी), नारायण पाटील (वांगी, राष्ट्रवादी), मदनसिंह मोहिते-पाटील (महाळुंग, राष्ट्रवादी), भानुदास पाटील (फोंडशिरस, राष्ट्रवादी), मल्लिकार्जुन पाटील (जेऊर, राष्ट्रवादी), पद्मजादेवी मोहिते-पाटील (यशवंतनगर, कॉंग्रेस), सुभाष पाटील (माळशिरस, आघाडी), प्रफुल्लता पाटील (भोसे, आघाडी). एकूण आठ. त्यापैकी महिला दोन.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: