Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची तयारी - अब्दुल सत्तार
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 22, 2012 AT 01:15 AM (IST)
औरंगाबाद - ""जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नसल्याने अध्यक्षपदासाठीच्या चाव्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्या आहेत. मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच सत्तेसाठी कुणाची विनवणी करणार नाही. कॉंग्रेस पक्षाची विरोधी बाकावर बसण्याची तयारी आहे,'' अशी माहिती मंगळवारी (ता. 21) नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.

""नियोजनबद्ध काम केले असते तर कॉंग्रेस पक्षाचे 20 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले असते; तसेच पंचायत समितीच्या जागा आणखी वाढल्या असता. दहा गटांत कॉंग्रेसचे उमेदवार 100 मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत, तर सहा गटांत 200 ते 300 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही कॉंग्रेस पक्षाला अडीच लाखांवर मते मिळाली. 16 जागांवर उमेदवार निवडून आले असले तरी विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवा,'' असेही आमदार सत्तार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

""औरंगाबाद जिल्हा परिषदेत सध्या कोणताही पक्ष छातीठोकपणे सत्ता स्थापन करण्याचे सांगू शकत नाही. कॉंग्रेस पक्षाच्या सत्ता स्थापनेसाठीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत अजून तरी मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची तयारी ठेवावी लागेल'', असेही त्यांनी स्पष्ट केले. ""सत्तास्थापनेत मनसेची भूमिका महत्त्वाची आहे. मनसेचे नेते सत्तेसाठी काय निर्णय घेतात,'' हे सांगणे अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले.

"माजी मंत्री' व "लकरच होणारे मंत्री'
नविर्वाचित कॉंग्रेस सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात "माजी मंत्री' व "लवकरच होणारे मंत्री' असा उल्लेख झाल्यानंतर आमदार सत्तार यांना मंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. त्यांनी ""अजूनही मंत्रीपद रिक्त आहे. ते कधी भरणार ते मुख्यमंत्री ठरवतील,'' असे सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव तालुक्‍यात चांगल्या यशानंतर लवकरच मंत्रीपद मिळेल काय, या प्रश्‍नांवर त्यांनी थेट बोलणे टाळले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: