Majha Posiview
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

अमरावतीत रंगले "सकाळ गीतरामायण' (फोटो फिचर)
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 01, 2012 AT 04:24 PM (IST)
अमरावती - "सकाळ"चे "गीतरामायण" दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीच्या दिवशी आज (ता. एक) पहाटे सवापाच वाजता कॅम्प परिसरातील होटल महफिल इनच्या बंधन लॉनवर रंगले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, एस.एस.बी. इन्फ्रास्पेस प्रायव्हेट लिमिटेड, कुऱ्हेकर इन्व्हेस्टमेंट व श्रीनारायण कन्सल्टंट हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. होटल महफिल इनने सकाळ गीतरामायणासाठी विशेष सहयोग दिला. यंदा गीतरामायणाचे हे सहावे होते. गीतरामायणाची प्रत्यक्ष सुरवात जरी पहाटे सव्वा पाचला झाली, तरी पहाटे चार वाजेपासूनच अमरावतीकरांनी बंधन लॉन्सवर गर्दी केली होती. गीत रामायणाचे निवेदन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉ. मोना चिमोटे, रसिका वडवेकर, नितीन भट यांनी केले. तबल्यावर धीरेंद्र गावंडे, अजय महल्ले, व्हायोलिनवर शिरीष भालेराव, सिंथसायझरवर सचिन गुढे, बासरीवर रवी खंडारे, ऑक्‍टोपॅडवर प्रशांत ठाकरे यांनी साथ दिली. "सकाळ' समूहाच्या या अविस्मरणीय सोहळ्याची काही क्षणचित्रे.

(छायाचित्रे : चैतन्य मोहने, वैभव दलाल)


फोटो गॅलरीआजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: