Majha Posiview
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

अद्‌भुत स्वरमयी "सकाळ गीतरामायण'
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 01, 2012 AT 09:46 PM (IST)
Tags: ramnavmi,   kdmc,   sakal ,   geet ramayan,   amravati
अमरावती - श्रीराम नवमीचा दिवस... किर्रर्र अंधाराचे साम्राज्य संपून तांबडं फुटण्याच्या वाटेवर असतानाच हजारो अमरावतीकरांच्या मुखातून एकच गजर होत होता, "राम जन्मला गं सखे राम जन्मला....' चैत्रशुद्ध नवमीच्या पहाटे हजारो अमरावतीकर आज (ता. एक) साक्षी बनले "सकाळ गीतरामायण'च्या अद्‌भुत स्वरमयी सोहळ्याचे.

कॅम्प परिसरातील होटल महफिल इनच्या बंधन लॉनवर "सकाळ'च्या वतीने "गीतरामायण"चे आयोजन करण्यात आले होते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, एस. एस. बी. इन्फ्रास्पेस प्रायव्हेट लिमिटेड, कुऱ्हेकर इन्व्हेस्टमेंट व श्रीनारायण कन्सल्टंट या सोहळ्याचे प्रायोजक होते. होटल महफिल इनच्या विशेष सहयोगाने आयोजित या कार्यक्रमासाठी अमरावतीकरांनी पहाटे चारपासूनच गर्दी केली होती. सलग पाच वर्षांपासून "सकाळ' समूहातर्फे ग. दि. माडगूळकरांनी रचलेल्या आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या "गीतरामायण" या कार्यक्रमाचे श्रीरामनवमीला आयोजन करण्यात येते. आज झालेल्या या सोहळ्याला अमरावती शहरासह जिल्हाभरातील हजारोंच्या संख्येने अमरावतीकरांनी उपस्थिती नोंदविली होती.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: