Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

नोटांवर शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर?
- वृत्तसंस्था
Sunday, June 17, 2012 AT 03:31 PM (IST)
नवी दिल्ली - भारतीय चलनांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा असलेला एकाधिकार लवकरच कमी होण्याची शक्‍यता आहे. कारण, यापुढे भारतीय चलनांवर महात्माजींबरोबरच अन्य राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र छापण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे त्या प्रकारच्या सूचना गेल्या असून, रिझर्व्ह बॅंक त्यावर विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

महात्माजींच्या जागी अन्य छायाचित्रे प्रकाशित करण्यासाठी समाज सुधारक डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची नावे सुचविण्यात आली आहेत. असे झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. कारण, 1987 मध्ये महात्माजींचे छायाचित्रही अशाचप्रकारे प्रकाशित होण्यास सुरवात झाली होती. अशोक चक्राऐवजी महात्माजींचे छायाचित्र 1996 पर्यंत पाचशे नोटांवर छापले जायचे. नंतर ते अन्य नोटा आणि नाण्यांवरही छापण्यात येऊ लागले.

कोणत्याही महान व्यक्ती स्मरणात राहाण्यासाठी तसेच तिचा सन्मान करण्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रतिमा प्रकाशित करणे, सोसायट्या, रस्ते, शाळा- कॉलेजला त्याचे नाव देणे, ही सामाजिक परंपरा आहे. हीच परंपरा जपण्यासाठी रिझर्व्ह बॅंक अन्य राष्ट्रपुरुषांची छायाचित्र प्रकाशित करण्याच्या तयारीत आहे.
प्रतिक्रिया
On 17/06/2012 06:49 PM Chandrashekhar said:
फक्त अशोक चिन्हच नोटांवर असावे.
On 17/06/2012 06:21 PM mohan said:
कोणाचे हि फोटो छापू नयेत. त्यातून इतर अनेक समस्या उद्भवतील . लोकांची मेंतालीती अतिशय वाईट आहे . त्याआयेजी भारतचा नकाशा छापावा.
On 17/06/2012 06:07 PM avinash shete said:
samaj sudharakanchi photo thik ahe pan rajkarnychi kay avashakta
On 17/06/2012 06:01 PM Suresh Thorat said:
नोटवर कोन्त्याजी महापुरुषाचे फोटो न देता त्यावर फक्त आणि फक्त भारताचा नकाशा असावा . जर एखाद्या महापुरुषाचा फोटोला जर विकृत बनविले तर त्यातून दंगली होण्याचा जास्त संभावना आहे . कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मागील फोटोमुळे जे काही घडले तसे होऊ नये म्हणून नोटवर कोणत्याही महापुरुषाचा फोटो नसावा . हीच माझी विनंती आहे .
On 17/06/2012 06:00 PM sushil salvi said:
इतर कोणत्याही नेत्याचे चित्र नको , नोटा आहे तशाच राहू द्या , त्यात पण राजकारण करू नये,
On 17/06/2012 05:53 PM Adit said:
फारच उत्कृस्त कल्पना आहे शिवाजी राजे हे राष्ट्रपुरुष आहेत आणि डॉक्टर आंबेडकर देखील
On 17/06/2012 05:18 PM Santosh said:
शिवाजी महाराजांची राजमुद्रा, अशोक चक्र, बाबासाहेबांची राज्यघटना अशा वस्तू छापाव्यात. फोटो फक्त गांधीजींचाच असावा.
On 17/06/2012 05:11 PM kshitijakant said:
कृपया सध्या आहेत तश्याच चलानी नोटा राहू द्यात .जनता नवीन नोटा खिशात ठेवणार नाहीत.कारण ..माहितच आहे.
On 17/06/2012 05:00 PM YUVRAJ said:
नको फोटो कोणाचाच नको
On 17/06/2555 04:56 PM rahul shelar said:
वेरी गुड नोटांवर ही सगळी चित्रे आल्यावर आनंद च आहे पण कुठल्याही राजकीय वेक्ती पेक्षा राजे चित्रे चांगली
On 17/06/2012 04:45 PM Anand said:
I think Rahul suggested good think.Also Milind Jawale also telling right think. We need to think right way in this matter.
On 17/06/2012 04:42 PM pp said:
मी राहुलशी पूर्ण सहमत आहे भारतच नकाशाच नोटे वर असावा
On 17/06/2012 04:30 PM Amar Shinde said:
जर असे काही व्यक्तींचेच फोटो छापले तर काही दिवसांनी प्रत्येक जण उठून त्याच्या आवडत्या नेत्याचा फोटो छापायला लावेल. हे चुकीचे होईल, आधी व्यवस्थित कायदे करून मगच निर्णय घ्यावा....
On 17/06/2012 03:57 PM Rahul said:
व्यवहारात चलनी नोटांवरील चित्रामुळे नेत्यांचा अपमानही होतो!! उदा. अमुक अमुक रुपये द्या याऐवजी थट्टा मस्करी करीत लोकं हिरवा गांधी, निळा गांधी, लाल गांधी अशी भाषा वापरून नेत्यांचा अवमानाच करतात!!! त्यात आता आंबेडकर, इंदिरा यांची भर पडल्यास सार्वजनिक वातावरण गढूळ होऊन बसण्याचीच शक्यता जास्त आहे!!! तेव्हा आता नेत्यांऐवजी नोटांवर भारताचा अधिकृत नकाशाच तेवढा छापावा हे उत्तम!!!
On 17/06/2012 03:57 PM sanjay said:
१०० व ५०० च्या नोटा चलनातून बंद व्हायला हव्यात रुपया ची किमत वाढायला हवी ते करणे जास्त गरजेचे आहे.
On 17/06/2012 03:53 PM Milind Jawale said:
कृपया असे करू नये . चुकून एखादी नोट पायदळी आली किंवा फाटली तर दंगे धोपे व्हायचे
On 17/06/2012 03:53 PM shan said:
iकाही दिवसांनी सोनिया गांधींचे पण चित्र इंदिरा आणि नेहरू सोबत येईल..
On 17/06/2012 03:52 PM Sandeep Biramane said:
Very good idea because all members are very good work for our country & I am happy with that proposal given to Reserve Bank of India
On 17/06/2012 03:51 PM Rahul said:
गांधी आणि इतर सर्व नेत्यांची चित्रे, नावे आणि त्यांचे राजकारण आता बस्स झाले. जरी ते सर्व महान नेते असले तरी अशा सर्वांचेही योगदान मोठे आहे जे कोणी प्रसिद्धी पावले नाहीत किंवा चर्चेत फारसे नव्हते. आता इथून पुढे फक्त भारताचा नकाशा आणि सर्व भाषांमध्ये चलनाचे मूल्य इतकेच नोटांवर छापावे.. नकाशा छापल्याचा फायदा असा होईल कि जे वादग्रस्त नकाशे प्रसिद्ध करून भारताचा अपमान करतात त्यांना भारताच्या नोटेवरचा नकाशा अधिकृत आहे हा संदेश जगभर पोहोचेल. कुठल्याही नेत्याचे चित्र आणि नाव यांना आता पूर्णविराम द्यावा.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: