Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो...
-
Sunday, July 01, 2012 AT 03:00 AM (IST)

सोलापूर - आषाढी एकादशीच्या पहाटे शनिवारी सोलापूरकर रसिक विठूरायाच्या भजनात चिंब न्हाहले. निमित्त होते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित क्षितिज प्रस्तुत पहाट गाणी कार्यक्रमाचे.

प्रारंभी माजी महापौर मनोहर सपाटे, गायक गिरीश पंचवाडकर, सुवर्णा दास, संयोजक आनंद मुस्तारे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश निकंबे, सुरेश फलमारी, लता फुटाणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. यानंतर क्षितिज ग्रुपच्या कलाकारांनी एकाहून एक सुंदर अभंग आणि भक्तिगीते सादर करून विठ्ठलभक्तांना ठेका धरायला लावले. ओम नमोजी आद्या ने कार्यक्रमाची सुरवात झाली. यानंतर समाधी साधन संजीवन नाम हे भक्तिगीत गिरीश पंचवाडकर यांनी सादर केले. "तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' हे गीत शीतल देशपांडे यांनी सादर केले. यानंतर सुहास सदाफुले यांच्या "जैसे ज्याचे कर्म तैसे' या गीताला भक्तांनी वन्स मोअरची दाद दिली. "माझी रेणुका माऊली' या आदिती पंचवाडकर यांच्या, एकतारी संगे एकरूप झालो' या गिरीश पंचवाडकर यांच्या गीतानंतरही विठ्ठलभक्तांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. शीतल देशपांडे यांच्या "तोरा मन दर्पण कहलाये, गिरीश पंचवाडकर आणि शीतल देशपांडे यांच्या "बाई मी विकत घेतला श्‍याम', आदिती पंचवाडकर यांच्या "मला हे दत्तगुरू दिसले', सुहास सदाफुले यांच्या "विठ्ठल विठ्ठल जय हरी' या गीतांनाही चांगली दाद मिळाली. कार्यक्रमाचे निवेदन कौस्तुभ गोडबोले यांनी केले. या वेळी संवादिनीवर गुरुराज कुलकर्णी, तबल्यावर शिरीष थिटे, पखवाजावर देवेंद्र अयाचित, सिंथेसायझरवर जब्बार मुर्शद तर तालवाद्यावर नंदकुमार रानडे यांनी साथ दिली.

पहाट गाणी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व रसिक भाविकांचे चंदन, गुलाल व बुक्का लावून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमामुळे हुतात्मा स्मृती मंदिराचा परिसर विठ्ठलमय झाला होता.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: